लेख
घर
एक घर असतं. अगदी नेहमीच्या घरांसारखं. खिडक्या, भिंती, कुंपण असणारं.
बाहेरून जरी बाकीच्या घरांसारखं दिसत असलं तरी आतून मात्र अगदी वेगळं. कोणतीही वस्तु नाही किंवा सामान नाही. आणि घरात कोणी माणसंही नाहीत. फक्त खूप खोल्या. काहींमध्ये भीती निर्माण करणारा अंधार तर काहींमध्ये डोळे दिपवणारा उजेड आणि काहींमध्ये आल्हाददायक मिणमिणता प्रकाश. घराच्या खिडकीतून फुलांचे काटे दिसतात तर कधी घनदाट झाडांमध्ये अदृश्य होणारी वहिवाट. ह्याला समजुतीची बाजू घेणारा गार वारा आणि घणाघाती घाव घालणाऱ्या कटू विजांची साथ.
घरातलं वातावरणही काहीसं तसंच. प्रत्येक खोली मधून एक विशिष्ठ सूर असलेलं.
न्यूयॉर्क शहरातील ‘ थॅंक्स गिव्हींग डे परेड ‘
न्यूयॉर्क शहरातील ‘ थॅंक्स गिव्हींग डे परेड ‘
अमेरिकेच्या २०१३ च्या पहिल्या भेटीत ४ जुलैच्या ' अमेरिकन स्वातंत्र्य दिनानिमित्त " MACY “ या अमेरिकन डिपार्ट्मेंटल स्टोअर्स कंपनीतर्फे सादर केला जाणारा, हडसन नदीच्या कांठावर, न्यूयॉर्क शहरातून ' FIRE WORKS '
( आकाशात केली जाणारी शोभेच्या-दारुची आतिषबाजी ) पहाण्याचा योग आला होता.
अमेरिकेच्या दुसर्या भेटीत, त्याच कंपनीतर्फे २४ नोव्हेंबर २०१६ रोजी न्यूयॉर्क शहरात मोठ्या दिमाखात " थॅंक्स गिव्हींग डे परेड " समक्ष पहाण्याची संधी चालून आली होती.
सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ९ )
सुम्याला वाटणार्या जीवघेण्या आठवणी.
आजकाल...
सकाळी उठल्यावर आवराआवर ही सगळ्यांची नित्याची सवय. मग office, collage, शाळा, काम, इत्यादी गोष्टींसाठी धावणे सुरु होते. ह्या सगळ्या व्यापात दिवस कसा जातो हे काळतच नाही. थकुन भागुन घरी आल्यावर घरची कामे, कर्त्तव्य हयात वेळ जातो. मग तोपर्यंत रात्रीच्या जेवाणाची वेळ होते. उरला सुरला वेळ हा tv पाहण्यात जातो. मग तोपर्यंत उद्याची तयारी bag अवरुन ठेवणे, कपड़े इस्त्री करून ठेवणे, इत्यादि... तोपर्यंत झोपायाचि वेळ येतेच् मग काय झोपा. सकाळ झाली की परत तेच चालू... असे दिवसा मागे दिवस निघुन जातात. ह्या सगळ्यात आपण स्वतःसाठी जगायाच विसरुनच जातो.
आजकाल स्वतःसाठी जगण सगळे विसरलेत बहुतेक.
एक स्वप्न पूर्ण झाले!
जगज्जेता मॅग्नुस कार्लसन आणि आव्हानवीर सेर्गे कार्याकिन यांच्यातला जागतिक बुद्धीबळ विजेतेपद सामना नोवेंबर ११ ते ३० दरम्यान न्यू यॉर्क इथे होईल अशी घोषणा फिडेने एप्रिल २०१६ मध्ये केली आणि सामना बॉस्टनपासून तीन तासांच्या अंतरावर होतोय आणि तो प्रत्यक्ष बघायला जाता येणे शक्य आहे या विचाराने माझ्या आनंदाला पारावार उरला नाही! विशी यावेळच्या सामन्यात असता तर 'आनंद' द्विगुणित झाला असता हे खरेच परंतु हेही नसे थोडके!
कंट्रोल रूम - २
(जुनाच ढिस्क्लेमर: या लेखातील घटना जरी खरया असल्या तरी पात्रांची नावे बदलली आहेत आणि विनोदनिर्मितीसाठी काही प्रसंगांना तिखटमीठ लावण्यात आलेले आहे!)
०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०
कंट्रोल रूम
०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०
"नमस्कार, कंट्रोल रूम, काय मदत करू शकते आपली?"
"हॅलो, म्याडम, ते याडं टाकीवं चलडय... उडी माराय."
"पत्ता सांगा, कुठून बोलताय तुम्ही"
"प...त्ता... हां लिहून घ्या ॲड्रेस...
विदाऊट अ ट्रेस - २ - स्टार टायगर आणि स्टार एरीयल
Without A Trace 2 - Star Tiger and Star Ariel
१९४८ सालचा जानेवारी महीना..
पोर्तुगालची राजधानी असलेल्या लिस्बन इथल्या विमानतळावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची लगबग सुरु होती. नुकत्याच आटपलेल्या दुसर्या महायुद्धात पोर्तुगालचा सत्ताधारी सालाझारने जर्मनी आणि दोस्त राष्ट्रांकडून येणार्या दडपणांना बळी न पडता पोर्तुगाल तटस्थ राखण्यात यश मिळवलं होतं. महायुद्धात तटस्थ राहील्याप्रमाणे युरोपातल्या इतर राष्ट्रांप्रमाणे पोर्तुगालला युद्धाची झळ बसली नव्हती. त्यातच लिस्बन हा पोर्तुगालमधला सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने देशोदेशीचे - मुख्यतः युरोपातले प्रवासी इथे मोठ्या प्रमाणावर दिसत होते.
मायग्रेन साठी सहज सोपी योगासने
सहज सोपी योगासने
मूळात योगासने ही संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी उत्तम असतातच, पण काही विशिष्ट आजारांसाठी, काही ठराविक आसने थोडा अधिक काळ केल्यास, त्यांचा त्या व्याधीपासून आराम मिळण्यासाठी फायदा होतो. अशा काही आसनांची येथे माहिती दिली आहे.
डोकेदुखी व मायग्रेन
मनावर येत असलेला वा घेत असलेला प्रमाणाबाहेरचा ताण, तणाव यातून डोकेदुखी उद्भवते. नियमित वेळेवर जेवण
न घेणे, पुरेशी झोप न होणे, शरीराला पुरेशी विश्रांती न मिळणे, ही सुद्धा कारणे आहेत. डोकेदुखी जास्त व वारंवार होत असली तर मायग्रेनचा त्रास सुरु होतो.
सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ८)
सुम्याच्या काळजी वाटण्याच्या आठवणी
फोनवर म्हटल्याप्रमाणे सुम्याची मुलगी थोड्या दिवसासाठी कोकणात आली होती.तिचा मुलगा आता कॉलेजात जात असल्याने तो आपल्या आपण स्वतंत्रपणे रहात होता.नवर्याला आणि मुलाला तिने सांगीतलं की,मी आईकडे असे पर्यंत तुम्ही दोघं संभाळून रहा.
इकडे कोकणात आल्यावर आईची प्रकृती पाहून तिची मुलगी खूपच अचंबीत झाली.आपली आई जास्त दिवस काढणार नाही असं तिला वाटूं लागलं.एकदा तिच्याशी सवित्सर बोलून तिला विचारावं की तू आणि गुरूकाका मुंबईला माझ्याबरोबर यायला तयार अहात का?माझ्या डोळ्यासमोर तुम्ही रहाल आणि मलाही माझी कामं करता येतील.नाहीतर तुमची काळजी करून माझं लक्ष कामापासून सतत विचलीत ह
मिसळपाव