सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ४ )
आपल्या जीवनाच्या प्रवासात आपण एक मात्र निमीत्त असतो.(जीवन प्रवासातल्या आठवणी)
दिवसामागून दिवस जात होते,वर्षामागून वर्ष.गुरूनाथचा आणि सुम्याच्या कुटूंबाचा सहवास वाढत होता. एक दिवशी अचानक गुरूनाथला कोकणातून त्याच्या आईवडीलांकडून निरोप आला.त्याच्या वडलांना बरं वाटत नव्हतं तू लागलीच निघून ये.
गुरूनाथचे आईवडील त्याला वरचेवर सांगायचे की तू लग्न करून घे.तुझेही पुढलं आयुष्य सुखकर जाईल आणि आमच्या म्हातारपणी तुझ्यावर जास्त ताण पडणार नाही.पण तो त्यांचं एकून घेऊन वेळ मारून न्यायचा.वडील आजारी झाल्याचं समजल्याने त्याच्या मनात विचार यायला लागला की लग्नाचा विचार करायला हवा होता.
मिसळपाव
आबिदा परवीन. एक विलक्षण आर्तता असणारा हा आवाज जेंव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेंव्हाच त्यातलं वेगळेपण कळलं. जाणवलं वगैरे नाही, स्पष्ट होतं ते.