वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - सेमीफायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान
४ नोव्हेंबर १९८७
गद्दाफी, लाहोर
लाहोरच्या गद्दाफी स्टेडीयमवर यजमान पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल खेळली जाणार होती. न्यूझीलंडविरुद्धच्या ग्रूपमधल्या शेवटच्या मॅचमध्ये गावस्कर - श्रीकांत यांच्या आतषबाजीने ऑस्ट्रेलियाला दुसर्या स्थानावर ढकललं होतं. ग्रूपमधल्या आपल्या सगळ्या मॅचेस भारतात खेळणार्या ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने पाकिस्तानविरुद्ध आणि ते देखिल पाकिस्तानमध्ये खेळणं निश्चितच कठीण आव्हान होतं. या वर्ल्डकपनंतर आपण क्रिकेटमधून रिटायर होत असल्याची आणि लाहोरची मॅच ही पाकिस्तानमधली आपली अखेरची मॅच असल्याचं इमरान खानने जाहीर केलेलं होतं.
मिसळपाव