वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - फायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड
८ नोव्हेंबर १९८७
ईडन गार्डन्स, कलकत्ता
कलकत्त्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपची फायनल रंगणार होती. वास्तविक ही फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होईल असा अनेकांचा अंदाज होता पण 'बिली द किड' क्रेग मॅकटरमॉटने लाहोरला पाकिस्तानला धूळ चारली होती तर ग्रॅहॅम गूचच्या स्वीपने आणि चंद्रकांत पंडीतला एलबीडब्ल्यू देण्याच्या अंपायर टोनी क्राफ्टरच्या साफ चुकीच्या निर्णयामुळे भारताच्या वर्ल्डकपच्या आकांक्षांवर पाणी पडलं होतं!
मिसळपाव