Skip to main content

लेख

लंपन, वानरांच्या फौजा आणि थोडं पाल्हाळ

लेखक नंदन यांनी शुक्रवार, 19/10/2007 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
काही फायदा होतो म्हणून वाचन करु नये, हे जरी खरं असलं तरी त्यातून वेगवेगळे अनुभव आपण लेखकाच्या दृष्टीतून घेऊ शकतो. नाहीतर एका आयुष्यात असे घेऊन घेऊन अनुभव तरी किती घेणार? बसल्याजागी वेगवेगळे अनुभव - व्हिकॅरियसली म्हणजे दुसऱ्याच्या उसन्या दृष्टीतून का होईना, आपण पुस्तकाच्या वाचनातून घेऊ शकतो. 'का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रु प्रकटिता', असं कमलिनीबद्दल ज्ञानेश्वरीत म्हटलंय तसंच काहीसं. अर्थात कुणाला कुठला अनुभव, कुठला विचार आवडेल हे सांगणं अवघड. त्या त्या व्यक्तीच्या पिंडावरती ते अवलंबून.

गांधी जी

लेखक विकास यांनी मंगळवार, 02/10/2007 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज गांधी जयंती. गांधीजींच्या बाबतीत कायमच टोकाचे दोन्हीकडून बोलणे ऐकायला मिळते. त्यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणार्‍यांनी खरा गांधीवाद कधी पाळल्याचे दिसले नाही. (अर्थातच नियमाला अपवाद असतील). असो. म.टा.च्या भारतकुमार राऊत यांचा खालील लेख वाचनात आला, समतोल वाटल्याने आवडला (तोच जर "सुमार साहेबांनी " लिहीला असता तर त्यात हिंदूत्व, संघ, भाजप वगैरेंना शिव्या आणि महात्म्याच्या ऐवजी सोनीयाच्या ओव्या वाचायला लावल्या असत्या!). आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. शिळी कढी म्हणजे नक्की कोणची?

उगवला...चंद्र सुगीचा

लेखक नंदन यांनी गुरुवार, 27/09/2007 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
Harvest Moon [आजच्या पूर्णचंद्राचे छायाचित्र.] आज भाद्रपद पौर्णिमा. पाश्चात्य परिभाषेत 'हार्वेस्ट मून'. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात साधारण २३ सप्टेंबरच्या सुमाराला ऑटम्नल इक्विनॉक्स असतो. (याला मराठीत शरद-संपात किंवा शारदीय विषुवदिन म्हणता येईल.

स्वगत

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 25/09/2007 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
''दांडेकरांच्या राज्यात होळकरांची फौज आल्यावर कस काय व्हायचं?`` असा प्रश्न एकानं थोडं चिंतातूर होउन विचारल्यावर त्याला दुसरा म्हणाला, ''अरे त्यात काय? इथंच सोय झाल्यावर बाहेर धुंडत बसायला नको. साली पन साहेब लोकांची मज्जा !`` 'हित कशाला चांगल्या घरातल्या पोरीबाळी येताहेत. अहो इथं तसल्याच बाया येणारं. एकीकडं हे बी चालू दुसरीकडे नोकरी बी चालू` पोलीस खात्यात महिला पोलीस भरती मोठया प्रमाणात भरती जेव्हा होणार होत्या त्यावेळी उमटणारी ही स्पंदन. शिव्यांना ओव्या समजणाऱ्या संस्कृतीत स्त्रिया कशा रुजणार? अशी चिंता काही वर्गाला पडली होती.