बर्लिनचा 'सिटी पॅलेस' अवतरला नव्या रुपात
- Read more about बर्लिनचा 'सिटी पॅलेस' अवतरला नव्या रुपात
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
जर्मनीची राजधानी बर्लिनच्या मधूनच वाहणाऱ्या स्प्रे नदीच्या किनाऱ्यावर ‘स्टाड्टश्लोस’ (सिटी पॅलेस) म्हणजेच ‘हम्बोल्ड्ट फोरम’ (Humboldt Forum) उभारण्यात आलेला आहे. या नवनिर्मित राजवाड्याचा उर्वरित भागही 20 जुलै 2021 पासून सामान्य लोकांसाठी उघडण्यात आला आहे. बर्लिन शहराच्या स्थापनेला 2012 मध्ये 775 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकेकाळी बर्लिनची ओळख असलेल्या या राजवाड्याची पुन:उभारणी करण्याची योजना जर्मन सरकारने आखली होती.
‘स्टाड्टश्लोस’ला ‘बेर्लिनर श्लोस’ म्हणूनही ओळखले जात होते. याच्या पुन:उभारणीचा विचार मांडला जाऊ लागला तेव्हापासूनच ही संपूर्ण योजना सतत वादात सापडत राहिली.
भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, पानिपतावर झालेल्या, मराठे आणि अब्दाली यांच्यातील युद्धाचा १४ जानेवारी २०२१ हा २६० वा स्मृतिदिन. "स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति" असं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणल्याप्रमाणे या युद्धाचे धडे आणि या युद्धाची स्मृती आजच्या काळातही उपयोगी आहे, त्यामुळेच आज पानिपत या विषयावर लिहिलेले, गेल्या १० वर्षातील माझ्या संशोधनाचे फलित असे " Battle of Panipat, in light of rediscovered paintings" हे इंग्रजी पुस्तक या स्मृतिदिनाच्या आधी पूर्ण करताना मला आज खूप समाधान वाटते आहे.