मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बातमी

250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक

पराग१२२६३ ·
PBG1 राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.

क्लिक : कथासंग्रह प्रकाशन

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रानो मला आनंद होत आहे. माझ्या कथांचा संग्रह हेडविग मिडीया या प्रकाशनसंस्थेतर्फे या ३ सप्टेबरला प्रकाशित होत आहे. Klik1 क्लिक करून फोटोत साठवलेले क्षण आपण पुन्हा पहातो तेंव्हा आपण ते नुसते पहात नसतो तर पुन्हा अनुभवत असतो. मनाने क्लिक केलेले काही आल्हाददायक, हवेहवेसे क्षण पुन्हा जिवंत करणा-या कथांचा संग्रह... क्लिक.

माणसाच्या क्षमतेची गरूडझेप!

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ चांद्रयान ३ च्या उपलब्धीसंदर्भात युट्युबवर मुलाखत ✪ भारत देश म्हणून खूप मोठी उपलब्धी ✪ हजारो प्रक्रियांवर अचूक कार्यवाही आणि अनेक दशकांची मेहनत ✪ डोळ्यांनी साथ सोडली तरी जिद्द न सोडणा-या मुलाखतकार वेदिकाताई ✪ Visually impaired असूनही उच्च शिक्षण घेऊन समाजात योगदान ✪ ISRO आणि अशा जिद्दी व्यक्तींकडून खूप काही घेण्यासारखं सर्वांना नमस्कार. सध्या आपण सगळे चांद्रयान- ३ ला मिळालेलं यश बघतो आहोत आणि वैज्ञानिकांचं कौतुक करतो आहोत. चांद्रयान- ३ ने गाठलेली मजल ही खूप मोठी गोष्ट आहे.

पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे

पराग१२२६३ ·
pune पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले.

अंतर्गत सीमावाद (भाग-२)

पराग१२२६३ ·
ईशान्येकडील राज्यांमधील सीमावाद स्वातंत्र्यानंतर ईशान्येकडील आसाम, नागालँड, त्रिपुरा इत्यादी प्रदेशांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण झाले. मात्र त्यात आसाममध्ये अनेक भाषिक, वांशिक, धार्मिक गटांचा समावेश असल्यामुळं हे सर्वात मोठं आणि वैविध्यपूर्ण घटकराज्य बनलं होतं. कालांतरानं स्थनिक समुदायांची मागणी आणि भाषावार प्रांतरचनेचं सूत्र यांच्या आधारावर आसाममधून विविध घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. तसं होत असताना सर्व घटकराज्यांनी एकमेकांच्या प्रदेशावर आपापले दावे करण्यास सुरुवात केली.

Silver Trumpet and Trumpet Banner

पराग१२२६३ ·
ऱाष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली.

आकाशातील गमती जमती- ८/११/२०२२ चे चंद्र ग्रहण!

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ ८ नोव्हेंबर रोजी चंद्र ग्रहण- पूर्ण भारतातून दिसणार ✪ सहजपणे उघड्या डोळ्यांनी बघता येईल ✪ चंद्राच्या जवळच युरेनस- बायनॅक्युलरमधून सहज बघता येईल ✪ सौ फॉरवर्ड नॉलेज की, एक खुद के अनुभव की! ✪ मनोरंजक अनुभवातून विचारांना चालना ✪ ग्रहणात चंद्र लाल का दिसतो? ✪ माझं दु:ख सर्वांत मोठं! नक्की ना? सर्वांना नमस्कार. मागच्या आठवड्यात झालेल्या सूर्यग्रहणानंतर येत्या पूर्णिमेला- ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी चंद्र ग्रहण दिसणार आहे. ह्या निमित्ताने सतत स्पर्धा आणि परफॉर्मंसचं दडपण असलेल्या मुलांना आणि मोठ्यांनाही एक वेगळा अनुभव घेण्याची संधी आहे.

माझ्या कथा

भागो ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपाचा दिवाळी अंक येण्यास वेळ लागत आहे . ठीक आहे, तोपर्यंत दुधाची तहान ताकावर भागवा. माझ्या पाच कथांचा रंगीबेरंगी कथा संग्रह https://drive.google.com/file/d/1AZIkBa-18Q4w-rQIvh8fhnG7Emkwn9mQ/view? usp=sharing इथे आहे. विनामूल्य डाउनलोड करू शकता.

महिला क्रिकेट, आशिया कप, T-20

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजपासून, महिला क्रिकेट, आशिया कप, T-20, बांगलादेश येथे सुरू होत आहे भाग घेणारे संघ खालील प्रमाणे भारत श्रीलंका पाकिस्तान थायलंड बांगलादेश मलेशिया युएई हाॅटस्टार वर, ह्या खेळाचा आनंद घेऊ शकता.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

पाषाणभेद ·
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.