Skip to main content

भारांच्या जगात... २

लेखक अजिंक्य विश्वास यांनी बुधवार, 01/08/2018 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
भटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत भटांच्या वाड्यातील भुतावळ भूत म्हणले की, आजपण आपले कान टवकारले जातात. ह्या भुतावळीचे नाव वाचल्यावर माझे देखील तसेच झाले होते.

भारांच्या जगात... १

लेखक अजिंक्य विश्वास यांनी मंगळवार, 31/07/2018 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्यावर स्वारी? - भा रा भागवत. . माझा प्रिय मित्र सागर ह्याने माझ्या डोक्यात काही वर्षांपूर्वी भागवतांच्या संक्षेपाचे मूळ रूप शोधायचे खूळ डोक्यात घातले, त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार आणि उपकार कमीच आहेत!

चुलीवरचे जेवन...

लेखक मुकेश चौधरी मेळघाट यांनी सोमवार, 16/07/2018 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
चुलीवरील जेवणाचा घरगुती आस्वाद.... धकाधकीच्या दैनंदिन जीवनातला आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय खास राहिला. सकाळीच दिपकदादांचा (आमचे पुणे येथील मोठे बंधु) फोन आला. माईंना खास वैदर्भीय खणखणीत डाळभाजी आणि पोळी चुलीवरचं जेवण करायचे आहे म्हणुन. आमच्या माई सौ. सिंधुताई सपकाळ यांना आज अमरावती आल्यावर खास वर्हाडी जेवणाचा आस्वाद घ्यायचा होता. मग लागलो तयारीला. सरोज चौकातील रुक्मिणी वल्लभ झुणका भाकर केंद्रात ऑर्डर दिली. माई, दिपकदादा, शामराव दादा, विनय दादा, मी, अधिक्षिका मॅडम, पांडा भाऊ, चालक नितीन दादा, असे आम्ही सर्व एकसाथ जेवायला बसलो.

४ गोष्टींच्या निमित्ताने!

लेखक लई भारी यांनी रविवार, 15/07/2018 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
'लस्ट स्टोरीज' च टायटल सार्थ असलं तरी मला त्यात मार्केटिंगचा भाग जास्त वाटतो. नेटफ्लिक्स आताशी भारतीय वेब-सेरीज घेऊन येतंय त्यामुळे कितीही आधुनिकतेचा आव आणला तरी ह्या माध्यमाची बलस्थानं(पक्षी: सेन्सॉरमुक्ती) वापरून चांगल्या मालिकांमध्ये सुद्धा 'बिनधास्त' माल भरपूर टाकला आहे. कथेची गरज आहेच म्हणा पण त्यानिमित्ताने प्रसिद्धी पण होतेच. खरतर या मालिकेतल्या छोटेखानी ४ कथा या रूढार्थाने 'कथा' म्हणण्यापेक्षा, त्या पात्रांच्या जीवनातले काही प्रसंग आहेत. सरधोपट शेवट-सुरुवात न करता त्यांच्या जीवनातला एक तुकडा दिग्दर्शकांनी आपल्या समोर मांडला आहे. किमान पहिल्या ३ कथांमध्ये तरी हे अगदी प्रकर्षानं जाणवत.

सेक्रेड गेम्स

लेखक बार्नी यांनी रविवार, 08/07/2018 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
सेक्रेड गेम्स sacred games काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्स विक्रम चंद्रा च्या कादंबरीवर टीवी सिरीज बनविणार म्हणून समजले आणि मी उडालो. इंजिनीरिंग ला असताना मला विक्रम चंद्रा चे हे पुस्तक प्रचंड आवडलेले .

उन्हाळी दुपार आणि पित्ज्झा बॉय

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 04/07/2018 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारचे १ वाजले होते, पित्ज्झा बॉयला अर्ध्या तासात ३ पित्ज्झे डिलिवर करायचे होते. उशीर झाला तर ग्राहक पैसे देणार नाही आणि मालिक पगार हि नाही. पित्ज्झा बॉयच्या नौकरीत वेळेचेच महत्व. बाईक स्टार्ट करून तो निघाला. तापलेल्या गरमागरम सीटचे चटके त्याला बसू लागले. आजीने सांगितलेली गोष्ट आठवली, "कोल्होबा-कोल्होबा बोरोली पिकली, नाही नाही आजीबाई ढुंगोली शेकली". मनात विचार आला गाव सोडून आपण या शहरात पैसे कमवायला आलो कि ढुंगोली शेकायला. चौरस्त्यावर पोहचतात समोर रेड लाईट दिसली. दिल्लीची रेड लाईट, च्यायला आता चक्क ५ मिनिटे थांबावे लागेल.

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 02/07/2018 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
सोना, सोSSना, सोनुSSटली, काहीच उत्तर नाही. शेवटी आबा जोरात ओरडले गधडी बहरी आहेस का, ऐकू येते कि नाही. जोर-जोरात पाय आपटत ११ वर्षाशी सोनुटली दोन्ही हात कमरे वर ठेऊन आबासमोर उभी ठाकली. मोठे-मोठे डोळे वटारून बेंबीच्या देठाने ओरडली आSSबाSS, ओ द्यायला थोडा उशीर का झाला, मी बहरी, मी गधडी. आता कुकल बाळ नाही मी. मोठी झाली आहे. ६वीत शिकते. गधडी म्हंटलेले मला मुळीच खपणार नाही. एवढी वर्ष सहन केले, आता मुळीच सहन करणार नाही. येउ ध्या ममाला ऑफिसातून, कशी वाट लावते तुमची, बघाच. आबाही तेवढ्याच त्वेषाने म्हणाले, "एवढ्या आवाज देतो, तू ऐकूनहि न ऐकल्यासारखे करते, आणि वर मला धमकी देते.

बागेतले आवाज

लेखक जेडी यांनी शनिवार, 09/06/2018 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
रोज सकाळी बागेत फिरायला जायचे म्हणून पाचचा कर्कश गजर लावते पण गजर ऐकून परत बंद करून एखादी डुलकी काढावी वाटतेच मग सकाळी सकाळी जाता येत नाहीच . मग सव्वा सातला बागेत पाऊल पडते . गेट समोरच एक कारंज्या आहे . त्याचा सरसर आवाज येत असतो . पण काही केल्या हा आवाज मला शब्दात पकडता येतच नाही म्हणून "सरसर" हा शब्द शोधला मी . तिथून पुढे गेले कि बऱ्याचशे लोक गोलाकार उभे असतात . आणि त्यांचा हे हे हु हु हो हो चाललेले असते . त्यांची हि ह ची बाराखडी किती किती वळणे घेते .

अ का पेला - A cappella

लेखक राघवेंद्र यांनी शुक्रवार, 08/06/2018 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
अ का पेला - A cappella हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत नव्या पद्धतीने हा प्रकार प्रचलित झाले. या मध्ये शाळा -कॉलेजमधील विदयार्थी समुहात गाणी म्हणु लागली. वाद्याऐवजी टाळ्या, पायाचा ठेका याचा वापर सुरु झाला.

स्वैपाकघरातून पत्रे २

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 25/05/2018 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अन्नपूर्णा, जसे शहरात अपार्टमेंट, तसे किचनमध्ये आम्ही. एकावरएक चार, पाच, सहा किंवा आणखी कितीही मजली. तुझ्या choice प्रमाणे. घरातील माणसांच्या संख्येवर लोक माझी खरेदी करतात. तुझ्या घरात आमचे सहा मजले आहेत. पण तू त्यातलेही एक दोन काढून ठेवतेस. म्हणतेस, ‘घरात इतकी कमी माणसे, कशाला सगळे मजले चढवत बसा?’ मग आमच्यातला वरचा मजला काढून ठेवतेस किंवा रिकामा तरी ठेवतेस. मग उरलेल्या सगळ्यांना कुकरमध्ये बसवतेस. आम्ही सहसा बाहेर येतो, ते सुट्टीच्या दिवशी. तो दिवस आमच्या outing चा.