एप्रिल फळ (७)
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about एप्रिल फळ (७)
- 14 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
द्राक्षे खाण्याची आणखी एक गंमत आहे. त्या घडातला एखादा सुट्टा मणी जो थोडासा मऊ झालेला असतो. एखादा जर्रा वाळलेला असतो. तोंडात टाकला की त्याला अशी जादुई चव आलेली असते सांगताच येत नाही. गोड आणि आंबट एकामागोमाग चव येतच रहाते.
द्राक्षाची ही तर्हा तर कलिंगडाची तर्हा आणखी वेगळीच . काही लोक त्याला टरबूज म्हणतात. म्हणु देत बिचारे पण कलिंगडाला टरबूज म्हणुन आपण त्याची बूज राखत नाही .
खरबूज , टरबूज , साखर काकडी, चिबूड हे सगळे एकाच वर्गातले विद्यार्थी.
प्रत्येकाचे काही वेगळे वैशिष्ठ्य. खरबूज कसे वाळूच्या सागरातुन थेट उचलून आणले आहे असे दिसते.खरबूजा चा मातकट सोनेरी रंग पटकन डोळ्यात भरत नाही.