Skip to main content

मिपावर आय डि न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय

लेखक नया है वह यांनी शुक्रवार, 15/01/2016 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
२०१६व्या वर्षात आय डि/ डु आय डि मिळणे अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे.... बदलती मानसिकता: : लेखातील विचार पटत असतील तरच प्रतिसाद द्या. विचार वेगळे आहेत, पटत नाही असे वाटले तर वेगळे लेख लिहा, अशी संकल्पना रुजत आहे. सामाजिक बदल : आज लेखक उच्चशिक्षित आणि वैचारिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी आणि माझे लेखन सक्षम आहे तर मी का प्रतिसाद लिहायचे, असे लेखकांचे म्हणणे असते. बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात(लेखक-वाचक) दरी निर्माण होत आहे. तरुण लेखकांच्या-वाचकांच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत.

लग्न न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 11/01/2016 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणेच अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे.... बदलती मानसिकता: : दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे. सामाजिक बदल : आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते. बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत.

सोंदर्य प्रसाधने आणि अपाय

लेखक हेमंत लाटकर यांनी रविवार, 03/01/2016 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
सौंदर्य उजळविण्यासाठी बाजारातील महागडी सौंदर्य प्रसाधने वापरण्याएेवजी सहज उपलब्ध होणारी मेंदी, खोबरेल तेल, डाळीचे पीठ, रिठा, काळी माती, ताक, हळद, फळांचा रस, मुलतानी माती यांचा उपयोग केल्यास पैशाची बचत हाईल. तसेच बाजारातील स्वस्तात मिळणारी सौंदर्य प्रसाधने वापरल्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचीच शक्यता असते. खालील प्रसाधने नेहमी वापरली जातात आणि त्यांच्यापासून अपायही होण्याची शक्यता असते. 1. हेअर डाईज : आकर्षक आणि तरुण दिसण्यासाठी कलप वापरणारे बरेच जण असतात. या कलपांमध्ये फेनिल-अलानाईन-डायमाईन नावाचं द्रव्य वापरले जाते.

पास - नापास की नापास - पास

लेखक जानु यांनी गुरुवार, 31/12/2015 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
सन २०१२ च्या जुन महिन्यामध्ये सालाबादाप्रमाणे शिक्षक प्रशिक्षणे सुरु झाली होती. नवीन वारे कानावर पडलेले होते. पण जेव्हा आठवी पर्यंत कोणासही नापास करावयाचे नाही, असा आदेश वाचला आणि आम्हा शिक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाल्या. ९०% या निर्णयाच्या विरोधात होते. १०% याच्या बाजुने बोलत होते. माझेही मत या प्रकाराच्या विरोधातच होते. यामुळे गुणवत्ता न सुधारता ढासळणार हे नक्की वाटत होते.

खरीच गरज आहे का?

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 29/12/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदी समाधानी जीवन जगण्यासाठी.... पाच रूमचा वेल फर्निशर्ड फ्लॅट, महागडी कार, 40 इंची एलईडी टिव्ही, एेसी, मुलांना इंटरनॅशनल शाळेत अॅडमिशन. हे सगळे साध्य करण्यासाठी 8 ते 8 नौकरी. बायकोची नौकरी. एकत्र कुटुंब नसल्यामुळे मुलांना पाळणाघरात पाठविणे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जायची इच्छा नसणे. त्यामुळे नवरा बायकोत चिडचिड. मुलांना मागितले ते मिळाल्यामुळे नाही ऐकायची सवय नसणे. काॅलेजात गेले की मुलांना आय फोन, स्कुटी किंवा बाईक. वयाच्या चाळीशीला हार्ट, बीपी, मधुमेह हे आजार होणे. मग त्यावर डाॅक्टरी इलाज.

धुम्रपानविषयक धाग्याचा सिक्वेल.

लेखक शान्तिप्रिय यांनी बुधवार, 16/12/2015 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
मागील धाग्यात आपण धुम्रपान आणि चित्रपट याविषयी चर्चा केली. या धाग्यात धुम्रपानाविषयी अधिक विचारमंथन करुया. टीप: १. समाजात धुम्रपान कमी व्हावे हाच या चर्चेचा उद्देश असावा. २. अर्थातच मी स्वत: कधीही धुम्रपान केले नाही आणि करणार नाही. उलट धूम्रपानाचे वाइट परिणाम समाजाला सांगायचा माझा प्रयत्न असतो. ३. प्रतिसाद विषयाला धरून असावेत. ४.प्यासिव्ह स्मोकिंग घडवणे हे पाप असलेने, धुम्रपानाबद्दल माझी Hate the sin and not the sinner अशी भूमिका आहे. चर्चा: मी बऱ्याच वेळा असे निरीक्षण केले आहे की १. शेकडो मैल गाडी चालवणारे , रात्री गाडी चालवणारे लोक विरंगुळ्यासाठी धुम्रपानाचा आस्वाद घेतात.

संभाजीराजांच्या मुक्ततेसाठी एकही प्रयत्न ????

लेखक हेमंत लाटकर यांनी बुधवार, 09/12/2015 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो, मला एक प्रश्न सतावतोय, संभाजीराजे संगमेश्वर येथील मुख्य सरदारांची बैठक संपवून रायगडाकडे 1 फेब्रुवारी 1689 रोजी रवाना होत असताना औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संगमेश्वरवर हल्ला करून संभाजी महाराजांना व कवी कलशांना पकडले व त्यांचा छळ करून 13 मार्च 1689 रोजी हत्या केली. पण या 40 दिवसाच्या काळात एकाही मराठी सरदाराने, वतनदाराने व मंत्र्याने शंभुराजांना सोडवण्याचा एकही प्रयत्न केला नाही अथवा तहाची बोलणी करायला व शंभुराजांना सोडवायला एकही वकील औरंगजेबाच्या दरबारी पाठवला नाही. जनतेनेही कसलाही उठाव केला नाही. यामागचे काय कारण असू शकेल ?

धुम्रपान , चित्रपट्जगत आणि सरकार : एक समाजविग्घातक दाम्भि़क्पणा

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 08/12/2015 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
"धुम्रपान शरीरास अपायकारक आहे आणि या चित्रपटातील कोणतेही कलाकार धूम्रपानाचा प्रचार करत नाहीत". ह्या अर्थाचा संदेश आपल्याला प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला दिसतो. हा संदेश हि सरकारची आणि चित्रपट्जगताची दांभिकता आणि खोटारडेपणा आहे. या विषयावर येथे चर्चा करीत आहे. कोणतेही अभिनिवेश न बाळगता या चर्चेला प्रतिसाद द्यावा हि नम्र विनंती .

नायजेरियामध्ये नोकरी !

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 06/12/2015 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या एका मित्राला नायजेरियात उत्तम पगाराची नोकरी मिळत आहे. पॉवर distribution हे त्याचे कार्यक्षेत्र. तथापि बोको हराम वगैरे वाचून थोडे बिचकायला होते आहे ... तिथली काही माहिती / contacts आहे का ? काय सल्ला देता येईल

भारत आणि इन्डिया

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 01/12/2015 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो , आपल्या देशाच्या नावाबद्दल हा धागा उघड्तोय. आपली मते मांडावीत . वितंडवाद नसावा. नावात काय असते? हे मत देशाच्या बाबतीत तरी लागू होऊ नये असे माझे मत आहे. आपल्या देशाची दोन किंवा तीन नावे असणे आता सवयीचे झाले असले तरी माझ्या अंतरमनाला ते अजिबात पटत नाही. आजकालची पिढी देशाचे भारत हे नाव घ्यायला एकतर कमीपणाचे समजते किंवा त्यांना ते फारच छापील वाटत असावे. सगळीकडे इंडिया इंडिया नावाची चालती आहे.