Skip to main content

व्हॉट्सॅपिय दावे

लेखक Nitin Palkar यांनी सोमवार, 20/02/2017 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉट्सॅपिय दाव्यांची इतकी दखल घेऊ नका.--- डॉ सुहास म्हात्रे या वरून सहज सुचलं ...... मुंबई पोलीस, डॉ. अमुक अमुक रामभरोसे हॉस्पीटल अथवा मेजर सो and सो अशांच्या नवे प्रसारित होणारे खोटे संदेश. प्लीज हे वाचा... तुम्हांला माहित आहे का? जर का तुम्हांला तुमच्या एटीएम (ATM) कार्डासमवेत तुमचं अपहरण केलं तर काही काळजी करू नका, तुम्ही त्यास अजिबात विरोध करू नका, अपहरणकर्त्याच्या सांगण्यानुसार ATM मशीनमध्ये तुमचं ATM कार्ड टाका.

मोबाईल घेण्यासंदर्भात मदत हवी आहे.

लेखक अव्यक्त यांनी बुधवार, 15/02/2017 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
… त्याचे झाले असे माझा भ्रमणध्वनी गेली दोन वर्षं आपल्या धन्याची इमाने इतबारे त्याच्या वकुबाप्रमाणे चाकरी करत होता…पण अचानक गत आठवड्यात असहकाराचे निशाण उगारले… आता झाली का पंचाईत ! आता कसं करायचं आणि काय करायचं असा यक्षप्रश्न अस्मादिकासमोर उपस्थित झाला ? येत्या मराठी दिनाच्या निमित्ताने नवीन भ्रमण ध्वनी घेण्याचे योजत आहे… तरी कोणता भ्रमण ध्वनी घ्यावा हा गहन पेच अस्मादिकांस पडला आहे… तरी मिपाकर हा गुंता सोडवण्यास नेहमी प्रमाणे मदत करतील हीच आशा बाळगतो… माझे budget रु. १३०००/- आहे. तरी मिपाकरांनी विविध पर्याय सुचवावे. भ्रमण ध्वनीत प्रगत तंत्रज्ञान असणे अपेक्षित.

हे पण छळ-कपट वाले कॉल

लेखक अत्रन्गि पाउस यांनी गुरुवार, 09/02/2017 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडे http://www.jobishh.com/ किंवा http://www.clickjobs.com/ सारख्या काही ठिकाणांहून अचानक बरेच कॉल्स येताहेत ... थोडक्यात सांगायचे तर तुम्ही काही पैसे ६ ते ९ हजार भरा आणि ते तुमच्यासाठी इंटरव्ह्यू (निश्चित नंबर किंवा कालावधी नाही) अरेंज करतील त्यांच्याशी जेव्हा रोकडी बातचीत करावी आणि जर का रिफँड साठी तुमच्या अटी शर्ती काय आहेत असे विचारले तर अत्यन्त गोलमाल उत्तरे देतात ... योगायोग म्हणजे हे सगळे कॉल्स दिल्ली हुन येताहेत आणि बराच अक्सेंट मारून बोल्ट असले तरी इंग्रजीचा दर्जा बघता अत्यन्त संशयास्पद व्यवहार वाटतो

हे राजा आम्ही असे चुकत तर नाहीयोत नं

लेखक अत्रन्गि पाउस यांनी मंगळवार, 10/01/2017 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
हे राजन अत्यंत गांजलेले आम्ही मोठ्या विश्वासाने तुझ्याकडे बघतोय ...सतत आणि नेहेमीच तुझ्या प्रत्येक कृती कडे मोठ्या कौतुकाने बघतोय त्याचा काहीतरी सकारात्मक अर्थ लावतोय ....प्रामाणिकपणे .. तुझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतोय ...डोळे झाकून तू सज्जनांच रक्षण करशील त्याचं दु:ख नाहीसे नाही तरी निदान कमी करशील अशी आशा लावलीये आम्ही ...ती वेडी आशा तर नाहीयेना राजन ? वेगवेगळ्या सुख, सुविधा सवलतीनचा त्याग म्हणजे काहीतरी उदात्त अशी स्वातंत्र्य पूर्व काळातील मानसिकता आम्ही पण मोठ्या उत्साहाने अंगिकारली ...सगळ्यांनी नाही पण बऱ्याच जणांनी वेगवेगळे तज्ञ उलट सुलट बोलतात तुझ्या प्रत्येक गोष्टींवर ...आ

नाशिक शिर्डी हॉटेल्स

लेखक अत्रन्गि पाउस यांनी गुरुवार, 05/01/2017 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवसात ठाणे नाशिक शिर्डी आणि परत असा प्रवास करायचे योजले आहे सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता करण्यासाठी काही विशेष उत्तम चवीचे पदार्थ देणारे ढाबे/ हॉटेल्स सुचवू शकाल का ? मुख्य महामार्ग फारसा लांब न सोडता जाता आले तर फारच उत्तम .. धन्यवाद ...

हॉटेल (रेस्टॉरंट) मधली टीप आणि सर्व्हिस चार्ज

लेखक अत्रन्गि पाउस यांनी मंगळवार, 03/01/2017 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
हॉटेल (रेस्टॉरंट) मधला सर्व्हिस चार्ज हा एक नवीन झोल का बर सुरु झालाय ?? रेस्टॉरंट चालकांनी मेनू कार्ड मधले दर सर्वकरसमावेशक करून जाहीर करणे आणि ग्राहकांनी खाल्लेल्या पदार्थांच्या मेनू कार्ड वरील दराबरोबर एकूण बेरीज जुळते आहे हे बघून बिलावर एक पै सुद्धा टीप न देता तिथून बाहेर पडणे हे इतके सोपे करता येणार नाही का ????

बाकड्यावर येतांना

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 12/12/2016 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच उलथा पालथी नंतर कित्येक वर्षांनी (गेल्या २० २२ वर्षात बहुतेक पहिल्यांदाच) बाकड्यावर बसायची वेळ येतेय...पुढचे प्रोजेक्ट येऊ का नको येऊ का नको असं लाजतंय वाट्याला येतांना ... अनेक सल्ले ऐकून / विचार करून डोक्याची मंडई किंवा डोक्याला कल्हई चाललीये ....सल्ला /विचार आणि प्रतिक्रिया ह्यांचे एक प्रातिनिधिक द्वंद्व म्हणा किंवा आत्मसंवाद १. बाप रे बेंच वर ??? काळजी घे नवीन प्रोजेक्ट्स फारसे नाहीच येत आहेत त्यामुळे जे मिळतंय ते घे आणि गप पडून राहा ... अरे हो रे बाबा मला कळतंय हे... २.

ठाण्यातले भोजनालय

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शनिवार, 12/11/2016 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
अन्नाला नावं ठेऊ नये हा हाडीमाशी रुळलेला संस्कार आणि अतिशय भावलेले मूल्य ...एखाद्या अनुभवावरून एखाद्या नवीन उत्साही उद्योगाला नाउमेद करणे हा सुद्धा उद्देश नाही पण तरीही उपहारगृहातले अनुभव लिहिल्याशिवाय राहवत नाही तर ठाण्यात अलीकडेच सुरु झालेले नवीन पेंडसे भोजनालय, नामांकित शेफ चे नाव जोडून गाजावाजा करून अतिशय जोरदार जाहिरात करून सुरु झालेले.

टाटा समुहाचे अध्यक्ष पायउतार!

लेखक अनंत छंदी यांनी सोमवार, 24/10/2016 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
टाटा समुहाचे अध्यक्ष पायउतार! टाटा ग्रूप या औद्योगिक साम्राज्याचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या संचालक मंड्ळाने अध्यक्षपदावरून हटविले असून त्यांच्या जागी काळजीवाहू अध्यक्ष म्हणून श्री. रतन टाटा यांची निवड करण्यात आली आहे. टाटा सन्सच्या घटना व नियमावलीस अनुसरून नवा अध्यक्ष चार महिन्यात निवडण्यात येणार आहे, त्याकरिता निवडसमिती तयार करण्यात आली आहे. या समितीत स्वत: रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्र, रोनेन सेन व लॊर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे. भारतातील या अग्रगण्य उद्योग समुहातील या खळबळजनक घटनेचा उद्योग क्षेत्रावर नेमका काय परिणाम होईल?

शेळीपालन (गोट फार्मिंग)

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 20/10/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
इथे कोणी शेळीपालन ह्या व्यवसायात आहे का? किंवा कोणाच्या परिचयातील व्यक्तींचा गोट फार्म आहे का? मी त्या व्यवसायात पदार्पण करत आहे त्यासाठी प्रत्यक्ष अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे म्हणतोय. तसेच कोणी ह्या व्यवसायात असतील तर त्यांच्याकडून खरेदी देखील करता येईल.