२०१६व्या वर्षात आय डि/ डु आय डि मिळणे अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे....
बदलती मानसिकता: : लेखातील विचार पटत असतील तरच प्रतिसाद द्या. विचार वेगळे आहेत, पटत नाही असे वाटले तर वेगळे लेख लिहा, अशी संकल्पना रुजत आहे.
सामाजिक बदल : आज लेखक उच्चशिक्षित आणि वैचारिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी आणि माझे लेखन सक्षम आहे तर मी का प्रतिसाद लिहायचे, असे लेखकांचे म्हणणे असते.
बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात(लेखक-वाचक) दरी निर्माण होत आहे. तरुण लेखकांच्या-वाचकांच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही.
संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे लेखक-वाचक एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. मिपावरील केवळ राजकिय काथ्याकूटमुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात.
संपादकांचा हस्तक्षेप ः लेखकाला सर्व प्रतिसाद हवे तसेच मिळावे म्हणून लेखकाच्या कंपुतिल आय डि/ डु आय डिंचा हस्तक्षेप होतो आणि संपादकांणी आय डि बॅन करु नये म्हणून त्याच्या लेखात लेखकाच्या कंपुतिल आय डि सतत प्रतिसाद टाकतात.
अहंकार ः लेखक आणि वाचक दोघेही उच्चशिक्षित, वैचारिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे लेखामधे तणाव निर्माण होतो.
इतर कारणे ः एकमेकांबाबत गैरसमज/पुर्वग्रह, कंपुबाजी, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, सिलेक्टिव रिडिंग आदी कारणांमुळे लेखावर समस्या निर्माण होतात.
उपाययोजना:
आय डि टिकण्यासाठी : "रिस्पेक्ट फ्रोम इच रिडर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "रिस्पेक्ट इच रिडर' करायचे ठरवले तरच आय डि टिकू शकतात.
मनमोकळा संवाद : लेखक-वाचक यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.
स्पर्धा टाळावी ः मिपावर सर्वांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या ले़खावर नीट प्रतिसाद दिला नाहीस आता मीही तुझ्या ले़खावर चांगला प्रतिसाद देणार नाही.
स्वीकार महत्त्वाचा ः अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.
बदल करण्याची तयारी ः मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता लेखण सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.
जबाबदारीची जाणीव ः लेख झाल्यानंतर येणाऱ्या प्रतिसादंची जाणीव आणि ती स्वीकारण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत.
तडजोडीची तयारी ः कोणत्याही चर्चेमध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.
थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर मिपावर आय डि टिकवणे शक्य होते.
वर्गीकरण
वाचने
4301
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
बॉर्र
याच लेखात
हाहाहा!
In reply to याच लेखात by नाखु
हेमंत व्याख्यानमला ?
In reply to याच लेखात by नाखु
वाचतोय.
स-हेला रे
नंदन
In reply to स-हेला रे by नंदन
साहित्य आणि संस्कृती मंडळ
In reply to नंदन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला त्यांनी हा दुवा दिला होता.
In reply to साहित्य आणि संस्कृती मंडळ by नंदन
संपादकांचा हस्तक्षेप ः
काही तीन चार वर्षांपुर्वींचे
मी नुकताच माझा आय डी बदलून
आयडी टिकण्याचा सर्वात चांगला
.
हि आय डी तर नक्कीच टिकणार.
पगला गजोधर महाराज प्रणाम
sir
In reply to पगला गजोधर महाराज प्रणाम by कंजूस
एक, पारस्पारिक अनुबंध, दोन,
आय डी बद्दल २ वाक्ये....
खरा मिपाकर "योग्य ते भान ठेवून, टवाळगिरी करत असतो."
मुक्तविहारींचा प्रतिसाद अभ्यासल्यावर आलेले निष्कर्ष
एवढ्यावर पीएचडी द्यायला हरकत
खरे काय खोटे काय जालिंदर
In reply to एवढ्यावर पीएचडी द्यायला हरकत by अजया
शब्द का पैदा होतात ?
मारवासाहेब
In reply to शब्द का पैदा होतात ? by मारवा
मी तर 10वि नापास आहे!!!!