Skip to main content

भारतीय सैन्य आणि प्रांतिक सीमेचे शिक्के ...

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 21/08/2016 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज टीव्हीवर १६ मराठा बटालियनच्या जवानांचे मनोगत ऐकत होतो तेव्हा एक गोष्ट जाणवली की भारतीय सैन्य हे मराठा गोरखा जाट अशा अनेक रेजिमेंटमध्ये विभागलेलं आहे...आपल्या लढाईत सगळे एकत्र येतात पण मग असे वर्गीकरण का ?देशाच्या सैनिकाला प्रांतिक सीमावादाच्या पलीकडे असायला हवं....अशा रेजिमेंटमुळे नक्की काय साध्य होतं ? मुळात जर सैन्य भरतीसाठी हे वर्गीकरण असेल तर सैन्यात आल्यावर ते तसे असता कामा नये...कारण प्रांतिक सीमा मागे टाकून तो सैनिक भारतीय म्हणून आलेला असतो.... ब्रिटिशांनी जर हे रेजिमेंट बनवले असतील तर ते अजूनही हद्दपार का करण्यात आलेले नाहीत? जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत !

बलम पिचकारी कि केशर कि बारीशे.

लेखक पाटील हो यांनी शुक्रवार, 12/08/2016 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक काय द्यायचा हीतून सुरवात करतो. बलम पिचकारी.... कि.... केशर कि बारीशे. परवा ऑफिस ला येतेवेळीची किस्सा आहे . सकाळी मस्त आवरुन बस स्थानकावर बस ची वाट पाहत थांबलेलो . तशी ऑफिस बस कधी वेळेत येत नसल्यामुळे थोडा वेळ थांबव लागतो . तेवड्यात अजून दोन तीन टाळकी जमतात, माज्यासाखी ऑफिस ला जाणारी. मग बस येऊपरीयंत गप्पा चालू होतात . हे तर रोजचच आहे. तर त्या दिवशी अस्याच गप्पा चालू होत्या अचानक "पच्चकन अंगावर काहीतरी आलं, पटकन पहिला तर लक्ष्यात आलं कि कोणीतरी जाणाऱ्या दुसऱ्या गाडीतून सरळ माज्या अंगावर पान /गुटखा खाऊन थुंकुकलंय" ..... .......

५ वर्षा च्या मुलीचा हट्टीपणा कसा कमी करू?

लेखक जोशी पुण्यात दन्गा यांनी रविवार, 07/08/2016 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमची 5 वर्षांची मुलगी प्रचंड हट्टी आहे. ती कुठल५ही गोष्ट इतकी ताणते की शेवटी माझा संयम सुटतो आणि त्याची परिणिती तिला फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला फार वाईट वाटते. तिला म्हणे मी रागावते आणि फटके देते याची भीती वाटते. हे असं बोलून ती तिच्या बाबाची आणि आज्जीची सहानुभूती मिळवते,आणि शेवटी सगळं तिच्या मनासारखे होते मला वाटते की माझी मुलगी भयंकर नाटकी आहे. तिला खरचं भीती वाटत असती तर तिनी ताणण्याची पुनुरावृत्ती नसती केली. १. मी नक्की काय करावं की ज्यांनी मुलीचा हट्टीपणा कमी होईल? २. माझ्या तिच्याशी वागण्यात काय बदल करु? (नवरा आणि सासूबाईंना फार काही सांगून फायदा नाही.)

पावसात भिजलेली बाईक चालू कशी करावी ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 09/07/2016 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी.... आताच चांगला तासभर बाईकला किका मारून आलो आहे... गेले २ आठवडे तिला चालू केले नव्हते...पावसात स्पार्क प्लग भिजल्याने आता ती अजिबात चालू व्हायचे नाव घेत नाही.... कंपाउंडमध्ये तिला पळवलं...अगणित किका मारल्या पण जैसे थे ! अनुभवी मंडळींनी मार्गदर्शन करावे जेणेकरुन तिला सुरु करता येईल.... अवांतर- यात मी प्रचंड घाम गाळल्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम झाला आहे !

महिला वायुदल पायलटस

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शनिवार, 18/06/2016 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
३ महिलांनी भारतीय वायुदलात फायटर जेट पायलट म्हणून जबाबदारी स्वीकार्लीये. त्या युवतींचे मनापासून कौतुक, आदर आणि अभिमान. तथापि ह्या युवतींना काय प्रकारच्या कामगिऱ्या पार पाडाव्या लागतील हा प्रश्न सतावतोय. विशेषत: उद्या युद्ध सुरु झाल्यास ह्या महिलांना हम्म घ्या हे विमान आणि जाऊन करा बॉम्बिंग सिमेपलीकडे असा आदेश पार पडावा लागेल का ? सौरभ कालिया वगैरे आठवले कि अशा जागी एखादी स्त्री असेल तर काय होईल असे वाटते. आर्मी आणि नेव्हीत काय परिस्थिती आहे ? प्रत्यक्ष युद्धमैदानावर स्त्रिया जातात का ?

थोडेसे ज्वलनशील

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 04/06/2016 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझं गाव सोलापूर. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा इतर मोठ्या गावाप्रमाणेच बोजवारा उडालेलं. अर्थात खाजगी वहाने बेसुमार. पुण्यानंतर कदाचित जास्त टूव्हीलरचं गाव सोलापूर असावे हे सतत बदलत्या आरटीओच्या सिरिजमुळे लक्षात येतंय. लहान खड्डेमय रस्ते असलेले गाव आता बदलतय. काही रस्त्यांचे काम चालूय पण गावातील बरेच रस्ते खूप चांगले झालेले आहेत. अगदी पुण्यामुंबईच्या तोडीस तोड असे. एमेमआरडीए ची कृपा. पण ह्यासाठी आम्हाला इतर शहरापेक्षा जास्त सेस भरावा लागतो. पेट्रोलच्या भावात तो वसूल केला जातो. त्यामुळे इतर शहरांपेक्षा सोलापुरात पेट्रोल महाग आहे.

अशावेळी तुम्ही काय कराल

लेखक कोंबडी प्रेमी यांनी रविवार, 29/05/2016 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
शेजारी कम मित्र गावाला जातांना म्हणाला माझ्या सार्थी गाडीची किल्ली देईल ती ठेऊन घे प्लीज - अस्मादिक ओके म्हणाले नंतर विचारले किती दिवस ? तर उत्तर आले ५-७ - हे हि ठीक ५-६ दिवसांनी सारथी फोन करता झाला, सा : कल सुबह साहब अने वाले ही मै चाबी लेके जाऊंगा. मी : ठीक है कब आओगे ? सा : रात को ८ /९ तक मी : ठीक, फोन करके आना रात्रौ ८ वाजता मी : कब आओगे ? सा: मुझे देर होगी १० ११ बजेंगे मी : १०:३० मै सो जाऊंगा जल्दी आओ सा : नाही तो मै सुबह ४ बाजे आऊंगा मी : आपका दिमाग खराब हुवा है क्या ?

ब्रेडमुळे कॅन्सर होऊ शकतो

लेखक प्रणित यांनी मंगळवार, 24/05/2016 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रेडमुळे कॅन्सर होऊ शकतो भारताच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या चौकशीनुसार ब्रेड व इतर बेकरी उत्पादनामध्ये कर्करोगकरक रसायने वापरली जात असल्याचे दिसून आले आहे. पोटॅशियम ब्रोमेट व पोटॅशियम आयोडेटचा सढळ हस्ते वापर केला जातो या रसायनावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली या पुढे मिसळ-पाव न खाता फक्त मि़सळ खावी लागणार http://www.bbc.com/news/world-asia-india-36366141

बाल संगोपनातील एक वास्तव

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शनिवार, 21/05/2016 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली नवपालकांमध्ये एक कॉमन आचार विचार दिसून येतो लहान मुलांना काहीही करतांना, वागतांना, बोलतांना अडवायचे म्हणून नाही.

आचरट प्रोपोगंडा

लेखक अत्रन्गि पाउस यांनी गुरुवार, 12/05/2016 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
९२.७ एफेम वर हल्ली बरेच दिवस एक आचरट प्रोपोगंडा चालू आहे लखनौ ते आग्रा हायवे .....होणार आहे पोलिसांचे आधुनिकीकरण ....होत आहे आणि म्हणून भरपूर नोकर्या ....येणार आहेत ह्या मध्ये तिथले गुन्हे एरवी आवरता येणारच नाहीत अशी स्पष्ट कबुली पर्यटनाची अद्ययावत सुखसोयी ... झालच आहे जवळपास ह्याचे कारण युवा नेतृत्व वगैरे वगैरे .....सगळीकडची भाषा कसलीही ठोस सत्य नं सांगणारी पण वस्तुस्थिती काय कुणास ठौक निलेश मिस्रा ह्यांच्या एरवी अतिशय हळव्या सोप्या आणि तरल कथांमध्ये सुद्धा अलीकडे - अमुक एक नंबर आणि त्यावर online रक्त मिळाले आणि कुणाचासा जीव वाचला