सोंदर्य प्रसाधने आणि अपाय
सौंदर्य उजळविण्यासाठी बाजारातील महागडी सौंदर्य प्रसाधने वापरण्याएेवजी सहज उपलब्ध होणारी मेंदी, खोबरेल तेल, डाळीचे पीठ, रिठा, काळी माती, ताक, हळद, फळांचा रस, मुलतानी माती यांचा उपयोग केल्यास पैशाची बचत हाईल. तसेच बाजारातील स्वस्तात मिळणारी सौंदर्य प्रसाधने वापरल्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचीच शक्यता असते.
खालील प्रसाधने नेहमी वापरली जातात आणि त्यांच्यापासून अपायही होण्याची शक्यता असते.
1. हेअर डाईज :
आकर्षक आणि तरुण दिसण्यासाठी कलप वापरणारे बरेच जण असतात. या कलपांमध्ये फेनिल-अलानाईन-डायमाईन नावाचं द्रव्य वापरले जाते. बऱ्याच जणांना कलप वापरल्याने चेहेरा सुजणं, लाल होणं, तसेच टाळू, चेहेरा आणि डोळ्यांची आग होणं अशा व्याधी सूरू होतात. तसेच त्वचेचा कॅन्सर झाल्याचीही उदाहरणं आहेत.
2. शांपू :
अनेक सुगंधी शांपूच्या सतत वापरानं डोक्याच्या त्वचेला गंभीर स्वरूपाचे अपाय होऊ शकतात. तसेच शांपूमुळे केसांची चमकही नाहीशी होते आणि केस गळायला लागतात.
3. साबण :
बहुतेक साबणांमध्ये कॉस्टिक सोडा व जंतू प्रतिबंधक द्रव्ये वापरलेली असतात. या द्रव्यांमुळे त्वचेला कोरडेपणा येतो. त्यातून पुढं त्वचेचे विविध विकार उद्भवू शकतात.
4. केसांचे सुगंधी तेल :
सुगंधी द्रव्यांची ऍलर्जी असल्यांनी अशी तेलं वापरल्याने डोक जड होणं, दुखणं, अशी दुखणी सुरू होतात.
5. टिकली :
निरनिरळ्या रंगाची कुमकुम बाजारात मिळतात. त्यात अनिलाईन डाईन आणि मधमाशांचं मेण वापरलेले असते. अशा कुंकवांच्या वापरामुळे आगपेणं आणि कोडसुद्धा होऊ शकतं.
6. मस्कारा व आग शॅडोज :
या प्रसाधनांमध्ये विविध धातूंचा उपयोग केला जात असल्यामुळे त्वचेचा रंग कायमचा बदलू शकतो. डागही पडू शकतात.
7. लिपस्टिक :
लिपस्टिकच्या वापरामुळं ओठ आकर्षक दिसत असले तरी काही जणींना यातील मेण आणि रंग अपायकारक ठरू शकतात.
8. फेस पावडर क्रीम :
फेस पावडर क्रीम्स आणि फाऊंडेशन्समध्ये असे काही पदार्थ वापरलेले असतात की त्यांची अनेकांना ऍलर्जी असते. त्यामुळं त्वचा लाल होते. आग करणारं पुरळ उमटतं तर कित्येकदा चेहऱ्यावर चट्टेही पडतात.
9. जीवनसत्त्वांचा वापर :
आपली प्रकृती तंदुरुस्त ठेवण्यासाठी जीवनसत्त्वयुक्त औषधांचा तात्पुरता वापर केला केला तर त्वचा ठीक राहतेही पण सततच्या वापरामुळं त्वचा कधीही दुरुस्त होऊ शकणार नाही इतकी खराब होऊ शकते.
10. ब्लिचिंग एजंटस :
आपल्या त्वचेच्या काळ्या, सावळ्या रंगावर नाराज होऊन बऱ्याच स्त्रिया ‘ब्लिचिंग’ करून गोरे बनण्याचा अट्टाहास करतात. या ब्लिचिंग एजंटसमध्ये अमोनियाकरण केलेला पारा वापरलेला असतो. त्याच्यामुळं त्वचेला अपायच होत असतो.
11. नेल पॉलिश :
सर्वसामान्यपणे नेलपॉलिशमध्ये "फॉर्मलडिहाईड लिकर" या द्र्वाचा वापर केलेला असतो. त्यामुळं पैरानोसिया म्हणजे नखांचा विकार होऊ शकतो.
वर्गीकरण
वाचने
6343
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
चांगली माहिती.
केवळ ऍलर्जी आहे
In reply to केवळ ऍलर्जी आहे by सुबोध खरे
कोणतीही गोष्ट हर्बल किंवा जडी
डाॅ खरेंशी सहमत.
येथे सरसगटीकरण नाही.
इथं लिव्हलं नाय
असहमत
खरे आणि अजया यांच्याशी सहमत.
लेखातील पूर्णत्त्व.
लेखाशी थोडंफार सहमत, पूर्णपणे
आशा करते की तुमच्या घरातील
आपल्या शरीरातील मेलोनिन
In reply to आपल्या शरीरातील मेलोनिन by हेमंत लाटकर
आशा करते की तुमच्या घरातील
In reply to आपल्या शरीरातील मेलोनिन by हेमंत लाटकर
फेअरनेस क्रिम मधील
अमुक वाइट आहे हे ठीक आहे .
हेलाकाका - तुम्हाला नाही आवडत
In reply to हेलाकाका - तुम्हाला नाही आवडत by प्रसाद१९७१
"कुठल्याही गोष्टीत खोड
चान चान
आपली
डॉ. साहेब काय म्हणतात त्यावर
In reply to डॉ. साहेब काय म्हणतात त्यावर by असंका
दैनिक संध्यानंद फार मनाला
लिखाणाची / शब्दाची