Skip to main content

रजा घेणे हक्क, पाप का गुन्हा ??

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 06/05/2016 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
पोलिसांच्या राजेबद्द्ल ची हि बातमी वाचून एक सलत असलेला विषय मांडावासा वाटतोय. आपल्या कडे एकूणच रजा घेणे हे काहीतरी चूक, पाप, अनैतिक किंबहुना अनावश्यक आहे ...नाईलाज म्हणून रजा हा प्रकार अस्तित्वात आहे अशी काहीशी मानसिकता आहे. रजा देणारा, स्वत:च्या खिशातून काहीतरी मेहेरबानी म्हणून दिल्यासारखी रजा देतो आणि घेणारा रजा मिळाली कि 'हुश्श' करतो असे सर्वसाधारणपणे दिसते.

सर...सर...सर--- मराठी भाषा दिनाच्या निमीत्ताने

लेखक सामान्यनागरिक यांनी शुक्रवार, 15/04/2016 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली ’सर’ ह्या शब्दाचा चुकीचा उपयोग होतांना दिसतो / ऐकु येतो. अनेक ठिकाणी तसेच टीव्हीवरील कार्यक्रमातुन सुद्धा हा शब्द अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापरला जातो. माझ्या माहितीप्रमाणे ’सर’ हे विशेषण ( पदवी) हे व्यक्तीच्या नावानंतर लावले जाते. ब्रिटीश काळी सर, रावबहादूर ह्या पद्व्या दिल्या जात. त्यासुद्धा नावाच्या आधी लावल्या जात. उदा. रावबहादुर अमुक तमुक, सर सोमनाथ गोमनाथ ई. इंग्लीश लोक सुद्धा सर ही पदवी नेहमी नावाच्या आधी लावतात. उदा. सर डॉन ब्रॅड्मन. डॉन ब्रॅड्मन सर असे केणीही म्हणत नाही. हल्लीच एखाद्या व्यक्तीला आदरार्थी संबोधन करण्यासाठी सरचा वापर व्हायला लागला आहे.

शाश्वत विकासाचा पर्याय - मच्छीमारांसाठी

लेखक चैतन्यकुलकर्णी यांनी सोमवार, 04/04/2016 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
एक लेख नुकताच वाचनात आला. सध्या महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार व संबधीत संस्थांकडून मासेमारीबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातील प्रमुख बाब घटलेले मस्त्योत्पाद्न आहे. परदेशी ट्रेलर्स, प्रचंड प्रमाणात वाढलेले जल प्रदुषण आणि हवामान बदल अशी प्रमुख कारणे सांगितली जातात. खालील लिंक एका प्रयोगाची माहिती देते. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

केस रंगवण्यातील एक प्रयोग.

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 21/03/2016 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच वर्ष न्हाव्याकडे केस रंगवतांना एक प्रश्न छळत असे ....इतका रंग हे का लावतात .... बारकाईने निरीक्षण करतांना एक लक्षात आले कि ते एक ठराविक इतका मुद्देमाल काहीही करून घेतातच ... तो एकावर एक थर असे चढवत जातातच ...उरला तर सावडून सावडून ब्रश वर घेऊन आधीचा रंगच रंगवतात (केस कधीचेच त्या थरांमध्ये लुप्त असतात).. शेवटी घरीच एक प्रयोग करावा असे ठरवले : - लोरीय्ल चे रंग, व्हॉल्यूम, अस्त्रीन्जंत, एक बाउल, आणि रबरी ग्लोव्हज असे घेतले.

सतावणारे खाद्यविषयक प्रश्न

लेखक अत्रन्गि पाउस यांनी गुरुवार, 17/03/2016 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
कॉफी घालून केक किंवा आईस्क्रीम बनवलेले ठाऊक आहे ....brandy वाईन वगैरे वापरून काही पदार्थ बनवलेले सुद्धा पहिले ऐकले वाचले आहेत ... परंतु काही प्रश्न मला नेहेमी सतावतात
  1. कॉफी घालून केक किंवा आईस्क्रीम बनवलेले ठाऊक आहे ....brandy वाईन वगैरे वापरून काही पदार्थ बनवलेले सुद्धा पहिले ऐकले वाचले आहेत ...परंतु 'चहा' किंवा चहा पावडर वापरून (पिण्याच्या चहा व्यतिरिक्त) काही पदार्थ करतात का ?
  2. कॉफीन फ्रॉम HongKong मध्ये बेगर्स चिकन म्हणून पदार्थ वर्णन केला होता तो खरोखर असतो का ? कुणी खाल्ला आहे का ?

मोदींच्या काही चुका

लेखक तिमा यांनी गुरुवार, 10/03/2016 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान, नरेंद्र मोदी, यांनी त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत ज्या चुका केल्या त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा मोदीद्वेष्टा, दोन्हीही नसल्यामुळे, एका सामान्य नागरिकाच्या नजरेने जे वाटते, ते लिहित आहे. यांत सर्वच मुद्द्यांचा परामर्ष घेतला आहे, असा माझा दावा नाही. मिपाकर त्यांत मोलाची भर घालू शकतात. १. बीफ प्रकरणांत, भाजपातले अतिरेकी देशभर गोंधळ घालत असताना, मोदींनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता आणि इतके दिवस जे धोरण चालू आहे तेच यापुढेही चालू राहील, हे स्पष्टपणे सांगायला हवे होते.

मदत/सल्ला हवा आहे- नवीन फरशी/लाद्या बसवणे आणि रंगकाम

लेखक साधा मुलगा यांनी रविवार, 14/02/2016 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सध्या घरातल्या hall आणि बेडरूम अशा दोन खोल्यांसाठी नवीन लादी/फरशी घालणे आणि रंग काढणे असे काम करायचे आहे. त्याच्यासाठी Contractor ला contract देऊनच करून घेणार आहोत, तरीही या संबंधी आपल्याला संपूर्ण माहिती असावी या दृष्टीने हा धागा काढत आहे. नेहमीप्रमाणे मिपाकर मंडळी योग्य मार्गदर्शन करतील याची खात्री आहे. याआधी या विषयावर चर्चा झाली असल्यास त्या धाग्याचा दुवा द्यावा. काही प्रश्न : १) सध्या घरात साध्या फारश्या आहेत, त्याजागी मार्बल टाकायचा विचार आहे, जे खर्चिक आहे, या मार्बल ची जाडी किती असावी, कारण दिसायला आणि पुसायला चांगल्या असल्या तरी त्या पुरेश्या मजबूत असतात का?

उपाय सुचवा(!)

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 11/02/2016 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा उपाय सुचवाल ? मी एका सहकारी सोसायटीत राहतो. (२ बी एच के) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक मुलगा पाळला आहे. तो मुलगा कधीच बांधलेला नसतो. दुपारी तो माझ्या गाडीच्या कव्हर मध्ये हात घालून खेळतो. त्यामुळे गाडीच्या दाराला , पत्र्याला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहीच उपयोग नाही. त्या मुलाला पकडायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब) यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?

हेल्मेटसक्ती हेल्मेट्सक्ती आणि हेल्मेट्सक्ती....!!!

लेखक शैलेश भोसले यांनी बुधवार, 10/02/2016 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार...!!! कालच एक बातमी वाचली ...मुम्बईत दुचाकीवर मागे बसणार्यालाही हेल्मेट्सक्ती.... ऐकुन जरा गोन्धळलोच...आता हे काय नवीन..??? गाडी चालवणार्याला हेल्मेट्सक्ती योग्य आहे..त्याबद्दल वाद नाही पण आता मागे बसणार्यालाही हेल्मेट्सक्ती... आता समजा गाडी चालवताना वाटेत एखादा मित्र वा अन्य कोणी भेटला आणि त्याला लिफ्ट द्यायची झाली तर काय त्यासाठी घरुन निघतानाच दोन दोन हेल्मेट घेउन निघायचे का... हेल्मेट आवश्यक आहे हे मान्य हो..म्हणुन उद्या रस्त्याने पायी चालणार्यालाही हेल्मेट्सक्ती करणार कि काय.... याबद्दल मिपाकराना काय वाटते जाणुन घ्यायला आवडेल... ( तळ टिप : मिपावर पहिल्यादा लिहीत आहे..

आरक्षणाशी निगडीत काही संदर्भ

लेखक बार्नी यांनी मंगळवार, 02/02/2016 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
आरक्षणामुळे झालेला शैक्षणिक परिणाम http://imgur.com/I2E4HdO संपूर्ण PDF http://mhrd.gov.in/sites/upload_files/mhrd/files/statistics/EAG2014.pdf आरक्षणामुळे गुणवत्तेवर परिणाम होत नाही http://www.thehindu.com/news/national/quotas-do-not-hurt-efficiency-say… private सेक्टर मधील नोकर्या ह्या नेहमीच गुणवत्तेमुळे मिळत नाहीत Research Details Caste Discri