Skip to main content

भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत.

लेखक हेमंत लाटकर यांनी बुधवार, 02/09/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत. ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील.

चला चर्चेद्वारे महाभारताचे ज्ञान वाढवू......

लेखक हेमंत लाटकर यांनी गुरुवार, 27/08/2015 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वार्ध महाराजा प्रतीपने गंगेला दिलेल्या वचनानुसार आपला पुत्र शान्तनुला गंगेशी विवाह करण्याचा आदेश दिला व स्वत: स्वर्गाकडे प्रस्थान केले. वडिलांच्या आदेशानुसार महाराज शान्तनु ने गंगेशी विवाह केला. पण गंगेने महाराज शांन्तनु कडून एक वचन घेतले., कोणत्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही. महाराज शान्तनु ला आठ पुत्रे झाली. त्यातील सात पुत्रांना गंगेने गंगेत सोडुन दिले. (हे सात पुत्र म्हणजे मानव लोकात राहण्याचा शाप मिळालेले अश्विनी कुमार, त्यांना गंगेने गंगेत सोडून शापमुक्त केले) पण आठव्या पुत्राच्या वेळेस महाराज शान्तनुने हस्तक्षेप केल्यामुळे गंगा आठव्या पुत्रासोबत गुप्त झाली.

पगार आठवड्याप्रमाणे मिळाला तर.......

लेखक हेमंत लाटकर यांनी गुरुवार, 20/08/2015 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
आठवड्याप्रमाणे पगार झाला तर...... भारतात पगार दर महिन्याला देण्याची पद्धत आहे, जर पगार आठवड्याला झाला तर 1 महिना जास्तीचा पगार मिळेल. आठवड्याप्रमाणे पगार केला तर वर्षात 52 आठवडे होतात. 4आठवड्यांचा एक महीना धरला तर वर्षामध्ये 13 पगार मिळायला हवेत. वर्षात (365/7) - 52.1428571 – 52 आठवडे महिन्यात आठवडे 4 च धरावे लागतील, उदा. महिन्याचा पगार ₹ 100 आठवड्याचा पगार ₹ 25 महिन्याप्रमाणे वर्षाचा पगार 100 x 12 – ₹ 1200 आठवड्याप्रमाणे वर्षाचा पगार 25 x 52 – ₹ 1300 बघा कोणाला बरोबर वाटते का? चुक वाटत असेल तर का वाटते?य

अलाहाबाद न्यायालयाचे सामाजिक भान

लेखक नमकिन यांनी बुधवार, 19/08/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला हा आगळावेगळा निर्णय- Allahabad HC orders UP officials, politicians to send their kids to government schools http://a.msn.com/r/2/BBlQU4H?a=1&m=EN-IN श्री म्हात्रे यांच्या नेमाडे बडबडले या धाग्यावरील प्रतिसादातुन येथे स्वतंत्र धागा काढण्याचे प्रयोजन शीर्षक. तेच लिहिलंय न्यायाधीश ने की सरकारी कर्मचारी चे मुले सरकारी शाळेत गेली की आपोआप धोरण आखणी, अंमलबजावणी, शालेय वस्तु पुरवठा, पुस्तक छपाई, वितरण, शिक्षक निवड व नेमणूक, निवडणूक व तत्सम गैर शैक्षणिक कामातुन सुटका, सर्व सुरळीत होईल. येथे टीकाकार न्यायाध

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वाद

लेखक डायवर यांनी मंगळवार, 18/08/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिध्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला अन लगेच वादाला तोंड फुटले. वृत्तवाहिन्या अन वृत्तपत्रांमधून बरीच मत मतांतरे बघावयास अन वाचावयास मिळत आहेत. बराच काळ वाट पाहून इथे शेवटी या विषयावर काथ्याकुट टाकतो आहे. बाबासाहेबांनी त्यांचे अख्खे आयुष्य शिवरायांच्या जीवनपटावर लोकउद्बोधक कार्यक्रम व शाहिरी करण्यात व्यतीत केले. "जाणता राजा " या लोकप्रिय कार्यक्रमामुळे शिवराय लहान मोठ्यांना अधिक सुलभतेने समजण्यास मदत झाली. पण पुरस्कार विरोधकांचा मुख्य आक्षेप हा आहे कि बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास कथन केला.

फूटबॉल (इंग्लिश प्रीमियर लीग)

लेखक अनुप७१८१ यांनी मंगळवार, 11/08/2015 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो... गेल्या आठवड्यात इंग्लिश प्रीमियर लीग (फूटबॉल) चा २०१५-१६ सीझन सुरू झाला. मिपाकरांपैकी कोण कोण इंग्लिश प्रीमियर लीग बघतं? कुठल्या टीम्/क्लब ला तुम्ही फॉलो करता? तुमचे आवडते खेळाडू कोण? एकंदरितच प्रीमियर लीग संबंधित चर्चेसाठी म्हणून हा धागा काढत आहे.

नवीन स्टिकर्स पाहिजेत.

लेखक संदीप ताम्हनकर यांनी शनिवार, 01/08/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन स्टिकर्स पाहिजेत. Whatsapp ने सर्वाना काबीज केलंय. गम्मत अशी की या मध्ये एकही शब्द न वापरता केवळ स्टीकर वापरून संवाद करता येतो. थोडा वेळ लागतो पण परंपरागत लिखाणापेक्षा मजेशीर प्रकार आहे. त्यामध्ये खास भारतीयांसाठी काही नवीन स्टिकर्स Whats app कंपनीने बनवून द्यावेत अशी मागणी आहे. काही विशेष भावना जोरकसपणे समोरच्यापर्यंत पोचवण्या साठी असे स्टिकर्स अत्यंत गरजेचे आहेत. भारंभार शब्द टायपिंग करण्याचा त्रास आणि वेळ वाचवून अस्सल देशी पर्याय हवा आहे. नवीन स्टिकर्स ची मागणी यादी पुढीलप्रमाणे: - १. पाया पडणे २. वाकून नमस्कार ३. साष्टांग नमस्कार ४. स्वतःच्या गालफडात मारून घेणे ५.

बाहुबलीच्या निमित्ताने …

लेखक अभिदेश यांनी मंगळवार, 21/07/2015 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
कालच आंतरजालावर बाहुबली (हिंदी) बघितला आणि ज्या scale वर तो चित्रपट बनवला आहे ते पाहून आवक झालो. नकळत मराठी चित्रपटाची तुलना करायचा मोह अनावर झाला. मराठीमध्ये एवढ्या मोठ्या scale चा चित्रपट कधी बनणार ? आपण फक्त story आणि containt वरचा किती दिवस तरणार ? आपली मराठी मानसिकता कधी बदलणार? TP2 च्या वेळेस त्याच्या promotion वर टीका झाली . हीच आपली कोती मनोवृत्ती आपल्याला घातक आहे . बाहुबली हा regional फिल्म असूनही तो एवढ्या मोठ्या scale वर बनवला गेला आणि जगभर प्रदर्शित झाला .

इन्फोसिस व विप्रो (नारायण मूर्ती आणि अझीम प्रेमजी ) यांनी अभियंत्यांचे नुकसान केले कि फायदा ?

लेखक दा विन्ची यांनी सोमवार, 20/07/2015 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
इन्फोसिस व विप्रो (नारायण मूर्ती आणि अझीम प्रेमजी ) यांनी अभियंत्यांचे नुकसान केले कि फायदा ? मी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. गेली अकरा वर्षे या व्यवसायात आहे व त्या आधी १० वर्षे उद्योग क्षेत्रात होतो. माझ्या व त्या आधीच्या काळी अभियंते कोअर ( ज्या क्षेत्रातली पदवी, त्याच क्षेत्रातली) कंपनी मिळवण्यासाठी अतिशय उत्सुक असत. सध्या मात्र जवळपास सर्व अभियंते थोडा जास्त पैसा, मोठ्या शहरातील राहणीमान, परदेश गमनाची संधी या व अश्या अनेक कारणासाठी माहिती व तंत्रज्ञानं क्षेत्रातील नोकरीला सुवर्णसंधी समजून त्या क्षेत्रात नोकरी करत आहेत .

स्त्रीधन

लेखक शंतनु _०३१ यांनी बुधवार, 15/07/2015 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीधन " भेंडीच्या भाजीत कांदा ?? " ठेवणीच्या स्वरातील प्रश्न वजा नावड दर्शवणारे वाक्य "तिला " उद्देशुन तोंडातून निघून गेले, आता संसार सुरु झाला अस आईचे खोचक ( की सूचक ?) वाक्य आणि तिची अतीव प्रेमाच्या नजरेला एकाच वेळेस तोंड द्यावा लागलं. पुढच्या गंभीर परिणामांची कल्पना घेवून थोडा मावळ सूर आवळला आणि उसन (धाडसी ) अवसान आणून " हि अशी भाजी मी आजपर्यंत खाल्लीच नाही ” असा स्वत: चा बचाव केला. " पण आमच्याकडे अशीच करतात हो " ( बिटवीन द लाईन : खावून घ्या असा धमकी वजा प्रेमळ सल्ला ) मिळाला. अरे खा की तिनं तिच्या पद्धतीने केलीये टेस्ट तर कर .