Skip to main content

रामायणातील लंका म्हणजे श्रीलंका नव्हे.

लेखक हेमंत लाटकर यांनी शुक्रवार, 27/11/2015 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
दैनिक भास्कर मधील बातमी. 5 आक्टाेबर 1971 या वर्षी प्रख्यात इतिहासकार एच. डी. संकलिया यांचा एक रिपोर्ट अंग्रेजी दैनिक 'द स्टेट्समैन' मध्ये प्रकाशित झाला होता. या रिपोर्ट नुसार रामायणातील लंका म्हणजे "श्रीलंका" नसून झारखंड मधील छोटा नागपुर हे क्षेत्र आहे. अयोध्या ते कन्याकुमारी हे अंतर रस्त्याने अंदाजे 3000 किमी आहे, कन्याकुमारी ते श्रीलंका अंतर 290 किमी आहे. आता रस्ते असल्यामुळे इतके अंतर जाणे सोपे आहे. त्याकाळी रस्ते नव्हते, वाहने नव्हती, घनदाट जंगले होती. श्रीरामाने इतके पार केले असेल असे वाटत नाही. तुम्हाला काय वाटते......

भाषांची गंमत

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 24/11/2015 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपावर प्रथमच लिहितोय. चुकल्यास समजून घ्यावे. १. मराठीत आपण दात घासतो व धुतोही. पण म्हणताना फक्त दात घासतो. भांडी सुद्धा. २. पेपर तपासणे हा शब्द मनोरंजक आहे. गुन्ह्याचा सुद्धा तपास करतात. ३. कन्नड आणि हिंदीत 'शिकणे' म्हणजे फक्त वाचणे (हिंदी - पढना, कन्नड - होद) ४. बंगाली भाषेत चहा खातात. ५. तर्कारी हा शब्द हिंदी आणि कन्नड मधे भाजीसाठी वापरतात. ६. बातम्या देताना इंग्रजीमधे बातम्या वाचतो असे सांगतात, मराठीमधे देत आहे असे सांगतात, आणि हिंदीमधे ऐका अशी विनंती करतात. ७. कन्नडमधे शेवटचा आकार लुप्त असतो.

टिपू सुलतान - इतिहास

लेखक sagarpdy यांनी बुधवार, 11/11/2015 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
कालच कर्नाटकात टिपू सुलतान जयंती वादातून वरून दुर्दैवी घटना झाली. त्यात गिरीश कर्नाड यांनी "टिपू जर हिंदू असता तर त्याला आज कर्नाटकात ज्याप्रमाणे शिवाजीस महाराष्ट्रात मान मिळतो तसा मान मिळता" अशी प्रतिक्रिया दिली. या घटनेवर तसेच कर्नाडांच्या वक्तव्यावर विविध राजकीय भाष्ये येत आहेत व पुढील काही दिवस येतीलच. या घटनेमुळे व कर्नाडांच्या वक्तव्यांमुळे काही प्रश्न पडले : १. टिपू सुलतानाचा इतिहास काय ? मुख्य राजकीय व सामाजिक कर्तबगारी काय ? (सिरियल फार लहानपणी पहिली, आठवत नाही. शालेय अभ्यासक्रमात तितकासा उल्लेख नाही). शक्य असल्यास संदर्भ कळवणे. २.

मूर्ती तुम्हीपण

लेखक भंकस बाबा यांनी रविवार, 01/11/2015 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
खरोखर आता तर वाटायला लागले आहे की अल्पसंख्यकावर खुपच अत्याचार होउ लागले आहेत. अगदी मोदी त्या आबु बाकर नामक क्रुरकरम्याचा भारतीय अवतार आहेत की काय अशी शंका आमच्या छोट्याशा भेजात घुसु लागली आहे. निमित्त आहे नारायण मुर्तिनी केलेले भाष्य. मूर्ति साहेब एकतर तुम्ही मालवणी , भेंडीबाजार, बेहरामपाड़ा, अशा वस्तीत राहात नाहीँ. सहिष्णुता ही फ़क्त हिन्दुनि दाखवायची वस्तु आहे ऎसे वाटते का तुम्हाला? किलोच्या मापाला २५ ग्राम कमी पडली की तुम्ही ग्राहक कोर्टात खेचनार का हिंदुत्ववादी संघटनाना ? साहेब या एरियात येऊन बघा एकदा . अज़ान चा टायमाला युद्धात जसे भोंगे वाजतात तसे हे बोम्बलत असतात.

अध्यात्म-विज्ञान समन्वय ?

लेखक यनावाला यांनी सोमवार, 26/10/2015 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
[नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आहे हे प्रतीत होते. इथे माझ्यासारख्या ज्येष्ठ (वयाने) सदस्याने लिहिणे म्हणजे शिंगे मोडून वासरात शिरण्यासारखे आहे हेही कळते. पण एक पद्यलेख (ओवीरचना) दिला आहे.

क्रोमबुक घ्यायचा आहे, मार्गदर्शन पाहिजे.

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 19/10/2015 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
क्रोमबुक घ्यायचा आहे. मार्गदर्शन करा. 1. chrome os की windows os चा घ्यावा. 2. engg. प्रोजेक्ट, प्रोग्रॅमिंगसाठी वापरता येईल का? 3. आॅनलाईन वर्क अॅट होम कामे करता येतील का? 4. कोणत्या कंपनीचा घ्यावा.

डिग्री नसलेले बिलिनिअर्स

लेखक हेमंत लाटकर यांनी शुक्रवार, 16/10/2015 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
काॅलेज डिग्री नसलेले बिलिनिअर्स 1. बिल गेटस - मायक्रोसाॅफ्ट 2. पाॅल अॅलन - मायक्रोसाॅफ्ट 3. मार्क झुकेरबर्ग - फेसबुक 4. डस्टिन माॅस्कोव्हिटस - फेसबुक 5. स्टिव्ह जाॅब्स - अॅपल 6. जाॅन कोम - व्हाॅटसअॅप 7. जॅक डोरसे - व्टिटर 8. इव्हान विल्यम - व्टिटर 9. मायकेल डेल - डेल काॅम्प्युटर 10. लॅरी इलिसन - ओरॅकल 11. अझीम प्रेमजी - विप्रो यावरून हे लक्षात येते की उच्चपदी पोहचण्यासाठी डिग्रीच असली पाहिजे असे नाही तर कुशाग्र बुद्धी, चिकाटी, ध्येय या गोष्टी आवश्यक असतात. यावर मिपाकरांचे मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा धागा टाकला. तरी प्रत्येकाने आपला अमुल्य प्रतिसाद द्यावा.

आरत्यांचे आणि स्तोत्रांचे रिंग्टोन

लेखक सामान्यनागरिक यांनी बुधवार, 07/10/2015 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नुकताच गणेशोत्सव येऊन गेला. त्या काळात तसेच ईतरही वेळी, अनेकांच्या मोबाईलवर गनेशस्तवन, आरती आणि इतर पवित्र स्तोत्रांचे रिंगटोन ऐकण्यात आले. अनेक लोक अमक्या देवाचे नांव असणाररेरिंगटोन आपल्या मोबाईलला लावतात. ती व्यक्ती चौघांत बोलत असतांना अचानक कुठल्यातरी देवाची आरती सुरु होते आणि ती व्यक्ती मोबाईल घेउन कानाला लावते. बरे देवाची आरती ऐकल्याने त्यात काही फरक पडत नाही. मोबाईल कानांला लावुन ते धडधडीत खोटे बोलत असते. ' नाही, मी येई शकत नाही मी ऑउट ऑफ स्टेशन आहे...' वगैरे . मला या विषयी असे वाटते : १.

वन रंक वन पेंशन ...

लेखक सत्य धर्म यांनी बुधवार, 09/09/2015 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरानो , मी सुद्धा तुमच्या पैकीच एक सामान्य माणूस आहे .. वडील शेती करतात शाळेत असल्या पासून सांगितला जात आहे कि सीमेवर रक्षण करणारे सैनिक , विविद व्यवसाय करणारे व्यावसायिक उदा. डॉक्टर, वकील, शेतकरी इ. हे एक प्रकारे देशाची सेवा करतात.

इच्छामरण

लेखक हेमंत लाटकर यांनी गुरुवार, 03/09/2015 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
इच्छामरण ह्याचा अर्थ ’युदेन्शिया’ (ग्रीक शब्द) "चांगले मरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्याची सुरवात आणि शेवट चांगल्या रितीने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’इच्छामरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांची सेवा करणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु नवरा किंवा बायको वृद्ध असली आणि मुलगा-सुन दोघेही नौकरी करणारे असतील तर मात्र अशा वृद्धाची किंवा रूग्णाची अवस्था खुप दयनीय होते.