अन्नाला नावं ठेऊ नये हा हाडीमाशी रुळलेला संस्कार आणि अतिशय भावलेले मूल्य ...एखाद्या अनुभवावरून एखाद्या नवीन उत्साही उद्योगाला नाउमेद करणे हा सुद्धा उद्देश नाही पण तरीही उपहारगृहातले अनुभव लिहिल्याशिवाय राहवत नाही
तर ठाण्यात अलीकडेच सुरु झालेले नवीन पेंडसे भोजनालय, नामांकित शेफ चे नाव जोडून गाजावाजा करून अतिशय जोरदार जाहिरात करून सुरु झालेले. एकंदरीत खास ब्राम्हणी पदार्थांचा आस्वाद घ्यायचे अजून एक नवीन ठिकाण म्हणून मोठ्या अपेक्षेने आणि मोठ्या उत्साहाने आज गेलो आणि एकूण सेटप बघताच एक्स्टेंडेड पोळीभाजी केंद्राचा फील आला ...
जेवणाचा मोजका मेनू कसलेही ऑप्शन्स नाहीत ....पण पानात आलेले पदार्थ खालीलप्रमाणे
-घडीची चपाती (पोळी का म्हटले नाही कुणास ठौक)....अत्यंत जाड पोळी ..आधीच करून ठेवलेली समोर तव्यावर 'गरम' करून घडी करून वाढली (घडी हि कणकेची घालतात जेणे करून पोळी ४ पदरी होऊन सुद्धा लुशलुशीत होते)
-तोंडली बटाटा भाजी : कुकर मधी अति शिजवलेली तोंडली (पांढरी दिसणारी)...कमालीची तिखट
-चवळीची उसळ : उकडलेली चवळी, कांदा, मसाले स्वतंत्र शिजवून एकत्र केल्यासारखे ..हि वरच्या भाजीसार्खीच तिखट ..मिरच्या वेचून बाहेर काढाव्या लागल्या
-अळूची पातळ भाजी : कसलीच स्पेसिफिक चव नाही ...
-आमटी : त्यातल्या त्यात बरी ...
-मक्याची कोशिंबीर : उकडलेले मक्याचे दाणे वर थोडेसेच लिंबू कोथिंबिरीचे १०-१५ अणू
मोजून २ भजी, नैवद्याच्या एका वाटीत दही व दुसऱ्या वाटीत शेवयाची खीर (ठीक ठीक)
ह्या सगळ्याचे वट्ट २०० रुपये मोजून ...बाहेर
कुणी आवर्जून काही वेगळे अनुभव घेतलेले थेट सांगत नाही तोवर .....येथे पुन्हा जाणे होईलसे वाटत नाही
| लेख वर्गीकरण |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्र.
अर्र.
ठाण्यात काय खाताय? पुण्यात या
ठाण्यात काय खाताय? पुण्यात या. ;-)
प्रचंड सहमत. मी मुंबईत
In reply to ठाण्यात काय खाताय? पुण्यात या by एस
प्रचंड सहमत. मी मुंबईत आल्यावर MAC-D किंवा मित्राच्या घरी जेवतो.
अरे हाय काय नाय काय. ....
In reply to प्रचंड सहमत. मी मुंबईत by Rahul D
अरे हाय काय नाय काय. ....
मिसळवेडा राऊ..
नामांकित शेफ?
कोण हो?
पराग कान्हेरे
In reply to नामांकित शेफ? by बोका-ए-आझम
पराग कान्हेरे
रस्सा रोडीज वाला?
In reply to पराग कान्हेरे by आदूबाळ
त्याने मुळात व्हेज हाॅटेल काढलंच कशाला? हा मेनू जेवायला बाहेर जाणं जरा कठीणच आहे. हेच पदार्थ घरी कितीतरी चांगले बनतात.
ते माहीत नाही. हा इसम एकेकाळी
In reply to रस्सा रोडीज वाला? by बोका-ए-आझम
ते माहीत नाही. हा इसम एकेकाळी आमचा सहठेलेकरी होता. तो सेलिब्रिटी शेफ वगैरे आहे हे बऱ्याच काळानंतर अपघाताने समजलं.
अरेरेरे, पराग कान्हेरे !
In reply to पराग कान्हेरे by आदूबाळ
अरेरेरे, पराग कान्हेरे !
ह्या इसमाने पुण्यात देखील (कल्याणी नगर परिसर) 'कॅंडीज' नावाचं रेस्टॉरंट काढलं होतं (बर्याच लोकांना ते होतं आणि आता नाही हे काही ठाऊक नाही). आम्ही फार उत्सुकतेने गेलो होतो. एकही पदार्थ धड नव्हता. पीनट राईस अश्या काहीतरी नावाचा एक पदार्थ तेवढा आठवतो, रेशिपी काय तर अगदी साबुदाणा खिचडीच फक्त साबुदाण्याऐवजी शिजलेला भात त्यात घातला होता. बेक्कार वाईट होतं ते प्रकरण. शेवटी आमचे वैतागलेले तोंडं पाहून आम्हाला एक व्हाईट फॉरेस्ट पेस्त्री फ्री दिली, ती छान होती, अर्थात ती फुकट होती म्हणून छान ;)
त्यामुळे आता असं झालं आहे कि, पराग कान्हेरे, अरेरेरे!
ठाण्यात कुठे सुरू झालेय हे
ठाण्यात कुठे सुरू झालेय हे भोजनालय ?
गोखले रोड
In reply to ठाण्यात कुठे सुरू झालेय हे by मार्मिक गोडसे
कलानिकेतन च्या जवळ
उषाकिरण हॉटेल च्या जवळ
यावरून आठवण झाली ,मिपावर
यावरून आठवण झाली ,मिपावर भलामोठा काकु झालेले ठाण्यातले हाॅटेल मेतकूट का?
ते कसे सुरु आहे?
२ मेतकूट आहेत, तुम्हाला नेमके
In reply to यावरून आठवण झाली ,मिपावर by अजया
२ मेतकूट आहेत, तुम्हाला नेमके कुठले म्हणायचे आहे
पण दोघांचे व्यवस्थापन, आचारी
In reply to २ मेतकूट आहेत, तुम्हाला नेमके by टवाळ कार्टा
पण दोघांचे व्यवस्थापन, आचारी एकच आहेत ना?
जेव्हा जावं तेव्हा गर्दी असते.
मेटकुट म्ह्टले की
In reply to २ मेतकूट आहेत, तुम्हाला नेमके by टवाळ कार्टा
मेतकुट बद्दल मिपावरील एक अनुभव.
https://misalpav.com/node/29987
हा माझा अनुभव मायबोलीवर आधीच लिहीला होता.
तुमची ही लिंक वाचण्यापुर्वीच मी काल ठाण्यातील घंटाळी कॉर्नरला असलेलया 'मेतकुट' या उपहारगृहात जाऊन आलो.
अश्विनी के, यांनी लिहील्याप्रमाणे जागा खुप लहान आहे, माणशी प्रमाण पाहता एकावेळेस २० माणसेच बसु शकतात. पदार्थांचे मेन्युकार्ड जास्त भरगच्च नाही, मोजकेच आणि फक्त पारंपारिक मराठी पदार्थांचा भरणा आहे. त्यात कोकणी, वर्हाडी, खानदेशी आणि पश्विम महाराष्ट्रातील पदार्थ दर्शविलेले आहेत. दर जरा जास्तच वाटले, कारण यातील काही पदार्थ दादरच्या आस्वादमध्ये याहीपेक्षा कमी दरात आहेत. मी एकटाच असल्यामुळे माझ्याकडे जास्त पर्याय नव्हते, शेवटी मी झुणका भाकरीवर शिक्कामोर्तब करण्याचे ठरवलं. पण इथे झुणका भाकरी असा पर्याय नाही, म्हणजे तुम्हाला झुणका वेगळा घ्यावा लागतो आणि भाकरी वेगळी. झुणका १२०/- रूपये आणि एक भाकरी २०/- रूपये, तरी मी झुणका भाकरीच घेण्याचे ठरवलं. झुणका १२०/- रूपये का आहे हे माझ्या पुढ्यात झुणका आल्यावर कळले, कारण तो दोन/तीन माणसांना पुरेल एवढा होता. मी ज्वारीची भाकरी मागविली होती तिला भाकरी म्हणण्यापेक्षा ज्वारीची चपाती म्हटले तरी चालेल एवढी पातळ होती.
माझ्या घरी माझी आई किंवा पत्नी बनवते त्याच चवीचा झुणका होता. झुणक्यासोबत मिर्चीचा ठेचा, चटणी किंवा कांदा देण्याचे सौजन्य वेटरने दाखविले नाही मी आठवण करून दिल्यानंतर त्याने फक्त कांदा(बारीक चिरलेला) एक वाटी आणुन दिला. दोन ज्वारीच्या चपात्या आणि थोडा झुणका खाऊन आणि एक ग्लास मठ्ठा पिऊन मी निघण्याचे ठरविले. निघताना उरलेला झुणका पार्सल घेतला. बाहेर आल्यावर मनातल्या मनात स्वत:ला दोन शिव्या हासडल्या कारण झुणका भाकरीपेक्षा नागपुरी वडेभात किंवा तुप मेतकुट भात मी मागवले पाहिजे होते असे मला वाटले.
सकाळी ८ ते १२ यावेळेत फक्त न्याहारीचेच पदार्थ मिळतात आणि दुपारी १२ ते ३ यावेळेत फक्त जेवणाचेच पदार्थ मिळतात. ३ ते ५ उपहारगृह बंद असते, सायंकाळची वेळ आठवत नाही. थाळी आहे पण दर आहे रूपये २२५/- मात्र, अजुन आठवणारे दरपत्रकातील पदार्थ डाळिंबी उसळ रूपये १५५/-, काळ्या वाटाण्याचा रस्सा रूपये १३५/-, परतलेली भेंडी रूपये ९०/-, वाग्याचे भरीत रूपये १२०/-. पदार्थांचे प्रमाण मात्र जास्त असण्याची शक्यता आहे.
यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ठ झुणका भाकरी मी स्वतः दादरच्या तांबे आरोग्य भुवन आणि शिवखेडापुरला खालेल्ली आहे आणि ती ही याच्या पेक्षा वाजवी दरात आणि ज्वारीच्या भाकरी सोबत जिला आपण भाकरीच म्हणु शकतो. इतर पदार्थांची चव घेतली नसल्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही. अजुन कोणाचे ह्या उपहारगृहाबाबतीत अनुभव असतील त्यांनी जरूर कळवावे.
यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ठ
In reply to मेटकुट म्ह्टले की by नरेश माने
तुम्हाला खेड शिवापूर म्हणायचे आहे का?
हो खेड शिवापुरच म्हणायचे आहे.
In reply to यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ठ by पांथस्थ
हो खेड शिवापुरच म्हणायचे आहे.
हेच खायचं तर घरीही मिळतंच की
हाटिल कशाला हवं ?
काय मिळत हे
In reply to हेच खायचं तर घरीही मिळतंच की by माम्लेदारचा पन्खा
काय मिळत हे आत गेल्यावर, मेनू कार्ड नाही आणि फळ्यावर लिहिलेलेच मिळते हे समजले
आणि एरवीही कधी कधी हॉटेलात साधं सोपेही बरं वाटते खाऊन ...मुख्य मुद्दा हा कि आहेत तेच पदार्थ नीट असते तरी चालले असते (अर्थात किंमत तरीही वाईट आहेच)
च्यायला हाच मेन्यू खायचा असेल
च्यायला हाच मेन्यू खायचा असेल तर घरातच सांगायला काय हरकत आहे.
मुळात हॉटेलमध्ये घरची चव चाखायच्या इराद्याने कधीच जाऊ नये, तोंडघशी पडायची वेळ येते.
वट्ट बोललास भावा! ऍग्रिड
In reply to च्यायला हाच मेन्यू खायचा असेल by पिंगू
वट्ट बोललास भावा! ऍग्रिड
@ : उकडलेले मक्याचे दाणे वर
@ : उकडलेले मक्याचे दाणे वर थोडेसेच लिंबू कोथिंबिरीचे १०-१५ अणू ›››
अणूबॉम्ब! 
:):)
In reply to @ : उकडलेले मक्याचे दाणे वर by अत्रुप्त आत्मा
:):)
बरं आहे कळलं. पैसे आणि
बरं आहे कळलं. पैसे आणि मनस्ताप वाचला.
स्वाद थाळी यापेक्षा चांगली.
+11
In reply to बरं आहे कळलं. पैसे आणि by गवि
+11
स्वाद थाळी यापेक्षा चांगली.
In reply to बरं आहे कळलं. पैसे आणि by गवि
स्वाद अप्रतिम आहे .. किती तरी वेळा खाल्लेलं आहे अजिबात कंटाळा येत नाही वर समाधान सुध्दा होत
तुम्ही त्या हॉटेल मॅनेजर ला
तुम्ही त्या हॉटेल मॅनेजर ला तुमचा फीडबॅक सांगितला का?
नाही
In reply to तुम्ही त्या हॉटेल मॅनेजर ला by मोदक
तिथे तसं कुणी नव्हतंच ....
पैसे घेणाऱ्याला सांगायचे
In reply to नाही by अत्रन्गि पाउस
पैसे घेणाऱ्याला सांगायचे किंवा आता त्या शेफ ला ट्विट किंवा मेल करा
बरे झाले सांगीतलेत. २०० रुपये
बरे झाले सांगीतलेत. २०० रुपये वाचले.
माहितीबद्दल धन्यवाद. रच्याकने
माहितीबद्दल धन्यवाद. रच्याकने स्वाद थाळी व्यतिरिक्त ठाण्यात इतरत्र कुठे मिळते का ब्राम्हणी पद्धतीचे जेवण?
कूट
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. रच्याकने by किसन शिंदे
कूट कूट मेतकूट
त्या वरच्या २ पैकी एक थाळी आहे ....तथापि मी स्वत: चाखलेली नाही ...
ठाण्यात ब्राम्हणी चवीची थाळी अन्य कुठे ठौक नै ब्वा
मेतकूट थाळी चांगलीये असं
In reply to कूट by अत्रन्गि पाउस
मेतकूट थाळी चांगलीये असं सुचवायचंय का?
मेतकूट हे नक्कीच चांगलं हॉटेल
मेतकूट हे नक्कीच चांगलं हॉटेल आहे , सुरवातीला उलट सुलट चर्चा झाल्याने हे दोन्ही हॉटेल मिपा वर थोडी बदनाम झाली आहेत पण मी दोन्ही चांगली वाटली
स्वाद कुठे आहे?
हे ठाणेकर असलेच. फक्त हे चांगलं - ते चांगलं असं सांगतात. लगे हाथ पत्ता द्या की.
हा पत्ता घ्या
In reply to स्वाद कुठे आहे? by बोका-ए-आझम
हा पत्ता घ्या
Kamala Smruti, Sane Guruji Road, Near Santoshi Mata Temple, Naupada, Thane West
सोप्प्या शब्दात सांगायचं तर बी-के-बिन वरून ब्राह्मण सोसायटी कडे एक आतला रस्ता जातो त्या रस्त्यावर आहे
धन्यवाद माशँ!
In reply to हा पत्ता घ्या by माझीही शॅम्पेन
शनिवारी चेकवण्यात येईल. कार्ड घेतात ना?
कार्ड घेतात. तिथली डाळिंबी
In reply to धन्यवाद माशँ! by बोका-ए-आझम
कार्ड घेतात. तिथली डाळिंबी उसळ बरी लागते.
रच्याकने पुढच्या शनिवारी आलात तर कट्टा करू तुमच्यासोबत, हाकानाका!
तिथे गेल्यावर
In reply to कार्ड घेतात. तिथली डाळिंबी by किसन शिंदे
मसाला साबुदाणा खिचडी (त्यात मिरची ऐवजी लाल तिखट वाप्ररतात)...थोडं बटाटा जास्त आणि बरोबर २-४ वाट्या दही अस मागवाव ...
आणि
स्वादसमाधी लावावी ....
व्य.नि. करतो.
In reply to कार्ड घेतात. तिथली डाळिंबी by किसन शिंदे
नक्कीच जमवू.
जा जा....माजी संपादक भेटतील..
In reply to व्य.नि. करतो. by बोका-ए-आझम
जा जा....माजी संपादक भेटतील...आम्च्याब्रोब्र येत नैत ते
नक्की कल्पना नाही
In reply to धन्यवाद माशँ! by बोका-ए-आझम
नक्की कल्पना नाही
अगोदर विचारून घ्या नाहीतर भांडी घासायची वेळ यायची (कृ ह घ्या ) :)
शी! असं असेल तर त्यापेक्षा
शी! असं असेल तर त्यापेक्षा मेतकूटही बरं म्हणायचं. नाहीतर सरळ दादरच्या जिप्सी कॉर्नर, आस्वाद, यांना भेट द्यावी.
असं असेल तर त्यापेक्षा
In reply to शी! असं असेल तर त्यापेक्षा by वेल्लाभट
होय अगदी, दुपारच्या शिळ्या भाकरी मायक्रोव्हेवमध्ये गरम करून देतात म्हणजे बरेच म्हणायचे. फक्त पोटात दुखल्यानंतर त्यांच्या नावाने शंख करायचा नसतो. अशा आणखी छोट्या मोठ्या गोष्टी सोडल्या तर मेतकूटसारखे दुसरे हॉटेल शोधून सापडायचे नाही ठाण्यात.
हॉटेलच्या सुरूवातीच्या काही भेटीत "आम्ही आमच्या सर्व्हिसमध्ये अजून जास्त सुधारणा करू" असे सांगणारे सनी पावसकर मालक सध्या कुठे हरवलेत कुणास ठाऊक.?
शंख करणारे आम्ही नव्हेच
In reply to असं असेल तर त्यापेक्षा by किसन शिंदे
शंख करणारे आम्ही नव्हेच किसनभाऊ. बाकी इतक्यात जाणं नाही झालं तिथे.
अर्रर्र! तुम्हाला नाही म्हणत
In reply to शंख करणारे आम्ही नव्हेच by वेल्लाभट
अर्रर्र! तुम्हाला नाही म्हणत हो. ते भाकर प्रकरण स्वानूभवावरून सांगतोय. त्यामुळे शंख आम्हीच करतोय असं समजा. ;)
दादरच्या जिप्सी कॉर्नर,
In reply to शी! असं असेल तर त्यापेक्षा by वेल्लाभट
प्रकाश विसरलात?
आता प्रकाश आणि आस्वाद
In reply to दादरच्या जिप्सी कॉर्नर, by बोका-ए-आझम
आता प्रकाश आणि आस्वाद,जिप्सीच्या मध्ये एकादशीपण या तिघांना टक्कर द्यायला उभं राहिलंय,केतते भंडारी हॉलच्या तिथे.
भाऊबीज
पेंडसेत गेलो होतो ५+२ (५वर्ष वयाची मुल).
भाजी ढब्बूस मिरची कुकरमध्ये शिजवलेली तिखट होती, चपात्या २, पसरट व मऊ तर गोड बासुंदी नैवेद्याच्या वाटीत होती (एका घोटात गट्टम ) पण पुन्हा वाढले नाहीं. भजी फक्त २ नग. १ पापड. वरण-भात/पुलाव (पैकी दोन्हीचा तांदूळ सारखाच व तुटका होता, त्यात पुलाव बेचव.
ताक वेगळे २०/ग्लास.
एरवी १६० असणारे ताट सणावारी २००/- विकतात.
वाढपी नाहीं, पूर्ण ताट सजवून टेबलावर येते. मागाहून काही मागितले तर तेवढेच वाटीतून पुढ्यात, एसी वर असल्याने ये-जा करेस्तोवर बसा.
आनंद नाहीं मिळाला पण एक नमूद करतो की बालकांना आमच्याच ताटातले जेवू घालण्यास मुभा दिली व त्याला वेगळा भार नाहीं लावला.
राजधानी /पंचवटी/भगत इ थाळी पासून कोसो दूर. स्वाद ला पर्याय म्हणून गेलो पण स्वादला जाईन फिरुन.
खूप मोठी स्पेस आहे मराठी -भट चवीत धंदा करायला
एक अत्यंत दुर्लक्षीत गुजराती
एक अत्यंत दुर्लक्षीत गुजराती भोजनालय आहे. स्टेशनजवळचे जे टीपटॉप आहे त्याच्या मागे. हॉटेल म्हणावे असे नाही. पत्र्याच्या खोलीत चालते. अनलीमीटेड थाली असते. तव्यावरुन गरम गरम फुलके येतात ताटात. अगदी तट्ट फुगलेले. चार प्रकारच्या भाज्या असतात. कीतीही पोळ्या मागवा. नंतर कीतीही भात मागवा. दोन प्रकारच्या डाळी/वरण असते.
स्टेशन परीसरातील बहूतेक गुजराथी व्यापारी इथे येउन जेवतात. कट्टा करु शकत नाही पण एकदा अवश्य अस्वाद घ्यावा असे ठीकाण आहे. अप्रतीम स्वाद. मी दोन वेळा गेलो होतो तेव्हा १६० रुपये ताट होते. आता जास्त असावे. खूप भूक लागली असल्यास इथे जावे.
अवांतर - मी माझ्या १३० कीलो मित्रास इथे घेउन गेलो होतो. पैसे वसूल केले त्याने :)
कट्टो प्लान कर मरे!! ;)
In reply to एक अत्यंत दुर्लक्षीत गुजराती by खटपट्या
कट्टो प्लान कर मरे!! ;)
दोन दीवस उपाशी र्हावन
In reply to कट्टो प्लान कर मरे!! ;) by सूड
दोन दीवस उपाशी र्हावन कट्ट्याक येउक व्हया... :)
राजस्थानी भोजनालय का?
In reply to एक अत्यंत दुर्लक्षीत गुजराती by खटपट्या
पुरोहित नाव आहे मला वाटतं त्याचं.
बहूतेक
In reply to राजस्थानी भोजनालय का? by बोका-ए-आझम
बहूतेक
पुरोहीत भोजनालय आहे ते.
In reply to एक अत्यंत दुर्लक्षीत गुजराती by खटपट्या
पुरोहीत भोजनालय आहे ते.
पुढल्या भेटीत गोखलेऐवजी इथे
In reply to पुरोहीत भोजनालय आहे ते. by किसन शिंदे
पुढल्या भेटीत गोखलेऐवजी इथे जायचा प्लान करु.
वोक्के मालक.
In reply to पुढल्या भेटीत गोखलेऐवजी इथे by सूड
वोक्के मालक.
मला पण सांगा ....
In reply to वोक्के मालक. by किसन शिंदे
विसरू नका
हजर असेन तर मीही येइन
In reply to मला पण सांगा .... by अत्रन्गि पाउस
हजर असेन तर मीही येइन
असं ठरवून नाय हो भेटत आम्ही,
In reply to मला पण सांगा .... by अत्रन्गि पाउस
असं ठरवून नाय हो भेटत आम्ही, ते काम त्या मध्यवर्ती ठिकाणात राहणार्या लोकांचं. तरी प्रयत्न नक्कीच करु कळवायचा.
थाळीच खायची असेल तर डोंबोलीत
थाळीच खायची असेल तर डोंबोलीत सुयोग, पुण्यात सुकांता आणि ठाण्यात स्वाद. एरवी काय मजा नाय.
ठाण्यात स्वाद.
In reply to थाळीच खायची असेल तर डोंबोलीत by सूड
हे ठाण्यात कुठे आहे ?
कौपिनेश्वर भोजनालय
ठाणे-आलोक हॅाटेल समोरील पॅरेडाइज टॅावर, १ माळा येथे अनलिमिटेड राजस्थानी थाळी चालु होती कैक वर्ष, कौपिनेश्वर मंदिर तर्फे. सद्या सुरु आहे की नाहीं माहित नाहीं.
गोगा भोजनालय पण असेच एक हरिनिवास परिसरात थोडे आत आहे.
गोगा सोल्लिड होत
In reply to कौपिनेश्वर भोजनालय by नमकिन
पण आता नाही बहुतेक ...
//ह्या सगळ्याचे वट्ट २००
//ह्या सगळ्याचे वट्ट २०० रुपये मोजून ...बाहेर//
तुलनाच केली तर बटाटावडापाव सात रुपये होता तेव्हा थाळी १२०रु होती हाटिलात, तर आता वडापावच १६-२० झाल्यावर थाळी कितीला असावी?