Skip to main content

बाकड्यावर येतांना

Published on सोमवार, 12/12/2016
बऱ्याच उलथा पालथी नंतर कित्येक वर्षांनी (गेल्या २० २२ वर्षात बहुतेक पहिल्यांदाच) बाकड्यावर बसायची वेळ येतेय...पुढचे प्रोजेक्ट येऊ का नको येऊ का नको असं लाजतंय वाट्याला येतांना ... अनेक सल्ले ऐकून / विचार करून डोक्याची मंडई किंवा डोक्याला कल्हई चाललीये ....सल्ला /विचार आणि प्रतिक्रिया ह्यांचे एक प्रातिनिधिक द्वंद्व म्हणा किंवा आत्मसंवाद १. बाप रे बेंच वर ??? काळजी घे नवीन प्रोजेक्ट्स फारसे नाहीच येत आहेत त्यामुळे जे मिळतंय ते घे आणि गप पडून राहा ... अरे हो रे बाबा मला कळतंय हे... २. चाय्यला मस्त आराम कर रे १-२ महिने, पुष्कळ घासली आहे आत्ता पर्यंत काय फरक पडत नाही ... आं आणि नंतर ?....पण हे खरे आहे ...कुठेतरी मस्त ट्रीप मारून यावी का पट्कन ?? ३. अरे थोडे सर्टीफिकेशन वगैरे करून घे उपयोगी पडेल कसली/ किती ? च्यायला एकेक सर्टिफाईड नग बघितल्यावर ह्याचा नक्की उपयोग कुणाला हा प्रश्नच आहे ...पण ठीक आहे बघू ४. नवीन जॉब बघ, इथून लवकर रिलीज मिळेल आणि थोडं चेंज च्यामारी पुढचे वाक्य "पण मार्केट टाइट आहे" हे जरा नंतर टाकले असते तर नसते का चालले ??? ५. आपल्या हातात काही असत का ...ठेविले अनंते तैसेची राहावे ... नो कॉमेंट्स ६. जरा आत्मचिंतन कर (प्राण्या राम कथारस पी च्या चालीवर) आणि आपल्यात काय सुधारणा करायला हवी ते बघ कसले डोंबलाचे आत्मचिंतन, इथे २ तास जीवाला स्वस्थता नाही ...आत्मचिंतन म्हणे .... .....................अजून काही सुचतंय कुणाला ??

याद्या 6055
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

आमच्या कार्यालयात तर बाकड्यावर येणं म्हणजे त्रासच आहे. बाकड्यावर असलेल्याना फालतू काहीतरी काम दिली जातात. हे प्रोपोझल बनवा, ते डॉक्युमेंट बनवा...सगळं वैताग नुसता. तसं आमच्या नशिबात बाकडं कधी आलंच नाही :(

याकडे बघण्याचा तुमचा स्वतःचा दृष्टीकोन काय आहे यावर सगळं अवलंबून आहे. आकाश कोसळलंय असं वाटत असेल तर तसं. जो होगा देखा जायगा वाटत असेल तर तसं. आम्ही तिर्‍हाईत लोक तुमचा कल बघून हो का, अरेरे, काय होत नाही ओ, ठीक आहे, मिळेल दुसरा जॉब, यातलं काहीतरी म्हणणार आणि विसरून जाणार. फरक पडतो तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला.

आमच्याकडे ही अवस्था खूप कठीण समजली जाते. आपल्यालाच गरज आहे असे समजून प्रत्येक मॅनेजरकडे जाउन काही काम आहे का बघणे आणि स्वतःला बीलेबल करुन घेणे ही बाकड्यावर असणार्‍याची जबाबदारी समजली जाते. कंपनीकडे प्रोजेक्ट नाहीत यात बिचार्‍या बाकड्यावर बसलेल्याची काय चूक? दहा वर्षे बीलेबल राहून, एक महीना बाकड्यावर आल्यावर अस्प्रुश्याची वागणूक देतात ते पाहून खूप वाइट वाटते. काही कंपन्यांमधे डेस्कटॉप/लॅपटॉप काढून घेतला जातो. आजकाल आयटी कंपन्यांचा बफर स्टाफ कमी ठेवण्याकडे कल आहे. त्यामुळे बाकड्यावरल्या लोकांवर टांगती तलवार असते. सर्टीफीकेशन करायला तणावमुक्त मानसिकता लागते ती बाकड्यावर कधीच नसते. सतत धाकधूक. कधी एचार बोलावेल...

In reply to by खटपट्या

तुमच्याच क्षेत्रात नाही पण कोणत्याही क्षेत्रात अशी अवस्था कठिण असते. काम लवकर आवरले तर मीही जाऊन इतरांना दहशत बसेल इतक्यावेळा कामाबद्दल विचारणा केली आहे. अस्पृष्याची वागणूक दिली तर देऊदेत, कश्याला त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघायला हवं व त्यांच्या बोलण्यातील भावार्थ समजावून घ्यायला हवा? आज मला देण्यासाठी काही काम नाहीये किंवा जे आहे ते मला करायचे नाहीये. घरातील इतर चार कामे काढून बसलिये.

In reply to by खटपट्या

आमच्याकडे ही अवस्था खूप कठीण समजली जाते. आपल्यालाच गरज आहे असे समजून प्रत्येक मॅनेजरकडे जाउन काही काम आहे का बघणे आणि स्वतःला बीलेबल करुन घेणे ही बाकड्यावर असणार्‍याची जबाबदारी समजली जाते. कंपनीकडे प्रोजेक्ट नाहीत यात बिचार्‍या बाकड्यावर बसलेल्याची काय चूक? १००% सहमत ! काही काळापूर्वी ३ वर्ष एकाच प्रोजेक्टवर काम करुन नंतर प्रोजेक्ट बंद झाल्या कारणामुळे बेंचवर आलो होतो. नक्की आता काय करायचे आणि कुठे जायचे या बद्धल कोणीच सांगत नाही,आपण लगेच हातपाय हलवायला सुरु करायचे म्हणजे नक्की कुठल्या सेंटरला कुठल्या ठिकाणी कुठल्या बिल्डींग मधे आणि कुठल्या फ्लोअरवर आपले बस्तान बसवायचे ते आपणच शोधुन काठावयाचे, मग त्या फ्लोअरवर डेस्कटॉप आणि फ्लोअर अ‍ॅक्सेससाठी प्रयत्न करणे सुरु करायचे, सुरुवातीला काही दिवस लयं त्रास झाला ! एक तर मोकळं बसायची सवय नाही त्यात बसायला जागा नाही, जागा असेल तर डेस्कटॉप नाही ! आपल्याच कंपनीत जिथे इतके वर्ष घासली त्यात आपणच नवखे असल्या सारखे भासायला लागते. मग एका डेस्कचा कसाबसा जुगाड केला, तिथे बसणारा दुपारच्या शिफ्टला यायचा, त्यामुळे सकाळपासुन-दुपार पर्यंत निदान बसण्याची आणि डेस्कटॉपची तरी सोय झाली. तो त्याच्या शिफ्टला आला कि परत आता काय ? त्याची जागा मोकळी सोडुन अजुन कुठे बसता येइल का ? ते पहायचे ! सुरुवातीचे काही दिवस तर जाम पकलो, सरळ दुपारीच घरी निघुन येउ लागलो... पण सतत लक्ष मोबल्याकडे एचआरचा कॉल चुकुन { याची शक्यता फार कमी, तरी सुद्धा } आला तर ? मेल आले तर ? { याची शक्यता जास्त } नंतर बेंचवर आलेले माझ्यासारखे शोधुन काढले ! त्यांना आणि मला मित्र मिळाले ! :) त्यावेळी आमच्या कंपनीत वेगाने लोकांना कमी केले जात होते त्यामुळे आता आपला नंबर का ? अशी अनामिक भिती मनात कायम असायची ! काही मित्र होते जे बराच काळ बेंचवर होते, ते आधीच जाम फस्ट्रेट झाले होते आणि भयग्रस्त सुद्धा. एक ठराविक कालावधी नंतर जर तुम्हाला प्रोजेक्ट नाही मिळाला तर एक मेल अचानक प्रगट होते ज्यात प्रोजेक्टसाठी प्रयत्न करा किंवा अमुक एक कालावधी तुम्ही बेंचवर आहात असा काहीसा मजकुर असतो म्हणे { अजुन ते मेल माझ्यावर पाहण्याची वेळ इतक्या वर्षात आलेली नाही.} पण असेच काहीसे मेल माझ्या हापिसातल्या एका जुन्या मित्र सहकार्‍याला आले होते, तो चिंतेत होता. { त्यानंतर तो कसाबसा जुगाड करुन कुठल्याश्या प्रोजेक्ट मध्ये गेला, आता परत बेंचवर आला आहे असे हल्लीच चॅटवर बोलताना कळले ! } मग मी जरा सुट्टी काढुन बाहेर जाण्याचा विचार केला. { आठवा औंरंगाबादच्या माहितीची विचारणा } सध्याच्या काळात तुम्ही जर "बिलेबल रिसोर्स" नसाल तर तुम्हाला कधीही "नारळ" मिळण्याची शक्यता जास्त ! सुट्टीवर असताना मोबल्यावर नेट पॅक अ‍ॅक्टीव्ह मारले, त्यामुळे वेळ मिळेल तसे कंपनीचे मेल अकाउंट चेक करण्याची गरज भासली तर होउन जातय. सुट्टीवर जाण्या आधी माझ्या ओळखीतल्या मॅनेजशी भेटुन घेतले, रजा टाकली आहे, काही दिवस नसेन हे देखील सांगितले. { माझ्या सुदैवाने आत्ता पर्यंत माझे सर्व मॅनेजर चांगले मिळाले आहेत, ज्यांनी मला कठीण काळात समजुन घेतले,नेटवर्कींग मधुन एसएपी मध्ये स्वीच मारताना मदत केली,त्यात नविन असुन देखील सांभाळुन घेतले,सर्वात महत्वाचे म्हणजे हा काम करणारा माणुस असुन हा काही काळात शिकेल यावर पूर्ण विश्वास त्यांनी दाखवला. } सुट्टीवर असताना बहुतेक मेल किंवा कॉल आला { आता लक्षात नाही } नविन प्रोजेक्ट मिळाला होता,ज्यासाठी मी सुट्टीवर जाण्या आधी प्रयत्न केला होता. त्यावेळी तो एकमात्र प्रोजेक्ट होता जिथे "रिसोर्स" ची गरज होती, जी मी भागवु शकत होतो. त्या प्रोजेक्ट बद्धल बरीच माहिती समजली होती, त्यातली काही अशी... हा कंपनीचा सध्याचा काळातला एकमात्र मोठा प्रोजेक्ट आहे,कंप्लायन्सची बरीच मगजमारी आहे,त्या प्रोजेक्ट मध्ये जास्त वेळ कोणी टिकत नाही, तो प्रोजेक्ट म्हणजे जेल आहे,जे त्या प्रोजेक्ट मध्ये आहेत ते आधीच पिसाळले आहेत, बरेच जण पेपर टाकुन गेले आहेत. इंइंइं... माझा प्रवेश त्या प्रोजेक्ट मध्ये झाला, काही दिवस अ‍ॅक्सेस आणि आयडीज मिळण्यात गेले.केटी फक्त नावाला दिली तर काही तांत्रिक माहिती विचारली तर गुगल कर म्हणुन सांगणारे या नविन प्रोजेक्ट मधले सहकारी भेटले ! त्यातल्या एकाने पेपर टाकला आहे हे हळुच काही दिवसांनी कळाले. तो जाणार होता म्हणुन या प्रोजेक्ट बद्धल काही माहिती देत होता. काम सुरु झाले. मला काम करायला मिळालेले एसएपीचे सर्व्हर्स हे जगातल्या एका नामांकित फार्मा कंपनीचे होते. त्यात ते एचआर आणि पेरोलवाले क्रिटीकल सिस्टीम्स होते. काही काळाने काम वेगाने सुरु झाले, शिफट्स सुरु झाल्या मग त्या कश्याही अरेंज होउ लागल्या नंतर तर घरी मी झोपेतुन उठल्यावर क्षणभर समजायचेच नाही कि आता ऑफिसातुन येउन झोपुन उठलोय की आता आपल्याला ऑफिस मध्ये आता जायचे आहे, झोप कमी होत गेली, ती इतकी कमी झाली कि ४-५ तासा पेक्षा जास्त झोप मिळणे कठीण झाले... झोपेच्या गोळ्या घेउन झोपण्याचा प्रयत्न सुरु झाला, मग सेंकंड शिफ्ट करुन परत फस्ट शिफ्टला अशी सुद्धा शिफ्ट झाली. शेवटी माझ्या शरीराने माझ्या मनाची साथ सोडली. तिर्थरुप हास्पिटलात घेउन गेले, फक्त तिथे अ‍ॅडमिट झालो नाही इतकेच ! मग तिकडुनच सिनियर बॉसला व्हॉट्सअ‍ॅपवर हॉस्पिटल्चे कार्ड पिंग केले, सुट्टी टाकली ते कळवले ! सगळ्या टेस्ट केल्या त्यात कॅलॅस्ट्रॉलचे प्रमाण माझ्या तिर्थरुपांच्या प्रमाणा पेक्षा अधीक निघाले ! मग काही दिवस घरी आराम करुन कंपनीत परत गेलो, मॅनेजमेंटशी बोललो, त्यांना विनंती करुन त्या प्रोजेक्ट मधुन बाहेर पडलो आणि मग नविन प्रोजेक्ट वेगळ्या लोकेशला मिळाला ज्यात अजुन तरी टिकुन आहे ! बेंचवर असताना काय करावे ? वरती सुनीलरावांनी सांगितले आहे ते करु शकता, या आधी जेव्हा बेंचवर आलो होतो तेव्हा कंपनीच्या पोर्ट्ल्सवर असणारे ऑनलाइन कॉर्स व्हिडियो ऐकत बसायचो, त्यातले शष्प देखील पुढे कामात आले नाही, किंवा त्या संबंधी प्रोजेक्ट देखील मिळाला नाही हि वेगळी गोष्ट ! मी तरी सध्या अशी वेळ आला तर बाहेर फिरुन येण्याचा पर्याय स्विकारतो... ऑनलाईन जगातुन रिअल जगात भटकतो... मेंदुचा फुकटचा स्पेस अजुन त्यात माहिती भरुन वाया घालवत नाही. बराच काळ ताणात जात असल्याने स्वतःला ताणमुक्त ठेवण्याचा माझा प्रयत्न राहतो. घरच्यांन बरोबर वेळ अधिक घालवा. काम करताना वेळ- काळ राहत नाही,सुट्टीच्या दिवशी देखील कामास बोलवणे येत असल्याने बेंचवर संधी मिळाल्यास अजुन आयुष्य भरुन जगण्याचा प्रयत्न करा... थेटर मध्ये जाउन चित्रपट पहा, जे काही करायला वाटते ते बिनधास्त करा. :) गेलेली वेळ परत येत नाही आणि तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे ते तुम्हाला सांगता येउ शकत नाही, तेव्हा बेंचची काळजी घेउ नका,फक्त तुमच्या बाजुने प्रयत्न कमी पडुन देउ नका.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Coldplay - Hymn For The Weekend (Official video)

In reply to by मदनबाण

"बराच काळ ताणात जात असल्याने स्वतःला ताणमुक्त ठेवण्याचा माझा प्रयत्न राहतो. घरच्यांन बरोबर वेळ अधिक घालवा. काम करताना वेळ- काळ राहत नाही,सुट्टीच्या दिवशी देखील कामास बोलवणे येत असल्याने बेंचवर संधी मिळाल्यास अजुन आयुष्य भरुन जगण्याचा प्रयत्न करा... थेटर मध्ये जाउन चित्रपट पहा, जे काही करायला वाटते ते बिनधास्त करा. :)" हे मात्र नक्की करिन सुरुवातीला

हे सगळेच आम्हाला वेगळे विश्व आहे अपा साहेब, एका अर्थाने आम्हीही सध्या बेंचवरच आहोत (कूलिंग ऑफ पोस्टिंग, फॅमिली पोस्ट) पण आमच्याकडे त्याला(च) सौभाग्य मानतात, कूलिंग मध्ये प्रशासकीय कामे शिकायला मिळतात हा अजून एक फायदा (कारण एकतर कितीही शिस्त अन वॉर फुटींग म्हणले तरी लोकशाही म्हणजे काही प्रमाणात कागदी घोडे नाचावणे आलेच ओघाने, शिवाय, आम्हीच आमचेच एचआर अन आम्हीच आमचे पीएम त्यामुळे शिकावे लागते) तरी तुमचे अनुभव, तुम्ही त्यातून काय शिकलाय, कसे बाहेर पडलाय हे वाचायला अजून आवडेल आम्हाला :)

तुमचे सध्याचे स्किल काय आहे याचा लेखात उल्लेख नाही. परंतु, अप किंवा क्रॉस स्किलिंग करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे असे समजा आणि त्याचा उपयोग करा. प्रोजेक्टवर असताना अशी संधी फारशी मिळत नाही. ट्रेनिंग अथवा एचार शी संपर्क साधून काही ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत काय याची चौकशी करा अथवा बाहेरून सर्टिफिकेशन करून घ्या. स्वतःला अपडेट करा, ही सुसंधी आहे, बाकड्यावर आल्यामुळे मिळालेली!

वीस बावीस वर्षं काम केल्यानंतर असं झालय ना, मग ठीकच आहे की! तुमच्यापेक्षा कमी वर्षं काम केलेले लोक्स, ज्यांना बाकड्यावर लवकर, जास्त दिवस, जास्तवेळा बसावं लागलय त्यांच्याकडे बघा. त्याने तुमचा प्रश्न सुटणार नाही पण धीर येईल. आता तुम्हाला असे लोक्स माहितच नसतील तर ही संधी आहे. आपण आपल्या जीवनात रममाण असताना आजूबाजूला काय चाललेलं होतं हे या निमित्ताने कळेल. तुमच्या क्षेत्रातील सर्टिफिकेशचे काही कळत नसल्याने पास. आता या वयापर्यंत निदान एवढे तरी नक्की माहित असते की आयुष्य म्हटले की कधी यश तर कधी अपयश किंवा कधी तरंगल्यासारखी विचित्र परिस्थिती! त्याला तोंड द्या. यापुढेही मार्केटात असेच चालू राहणार आहे. तुम्ही, आम्ही हे थांबवू शकत नाही. चिडचिड होणे, वैताग येणे यामुळे अपराधी वाटून घेऊ नका. स्वत:शी सतत बोला. डोळ्यात पाणी आलं तर लाज वाटून घेऊ नका. ही काही कायमची परिस्थिती नाही. लोक वाट्टेल त्या परिस्थितीत सर्व्हाईव होतात. तुमचं त्यामानाने बरय. महत्वाचं म्हंजे एरवी बाजूला पडलेली कामं करून घ्या. ;) पुन्हा अशी संधी मिळणार नाही.

वाह वाह अभिनंदन !! बायदवे , टेक्निकली स्पीकिंग , आम्हीही आज बेंचवर आलेलो आहोत ( सोमवारी लगेच दुसर्‍या क्लायंटचे काम सुरु होणार आहे ही बात अलहिदा.) आता जरा निवांत मोकळा वेळ आहे तर निव्वळ प्रतिसादांच्या पिंका टाकत फिरण्यापेक्षा बरेच दिवस तुंबुन राहिलेले लेखन पुर्ण करावे म्हणतो ! :)

सगळे प्रतिसाद वाचतोय, सल्ले नोंदवतोय ... सध्या हातातले प्रोजेक्ट संपवत आणले आहे ८ १५ दिवस आहेत हातात ...पण सगळ्यात पहिल्यांदा थोडा विश्राम घेईन म्हणतो ...रेवती ताई म्हणताहेत त्याप्रमाणे जरा आजूबाजूला बघीन ....पुढचे पुढे

In reply to by श्रीगुरुजी

आहे ती हुरहूर ....'करायचं काय दिवस भर' हा प्रमुख प्रश्न आहे ... २० २२ वर्षात रिटायर ??? कल्पनाच करवत नाही ..

In reply to by अत्रन्गि पाउस

आम्ही तर ६-७ वर्षांतच निवृत्तीचा विचार करतोय... :D टंकाळा आला आता या क्षेत्राचा...काहीतरी दुसरं कार्य करावं असा विचार आहे.

In reply to by अत्रन्गि पाउस

तुम्ही आयटीत आहात असं गृहीत धरतोय. आयटीत प्रगती अत्यंत वेगाने होते. अक्षरशः ५-६ वर्षे काम केलेली तरूण मुले वरीष्ठ प्रकल्प व्यवस्थापक अशा पदावर असतात. साधारणपणे वयाच्या पस्तिशीला कर्मचारी सर्वोच्च पदावर पोहोचलेला असतो. ४०+ वय झाले की आयटीत भवितव्य नाही. प्रगती खुंटलेली असते. पदोन्नतीची संधी अत्यल्प असते. फक्त खूप टॉपच्या पोस्टचा विचार करू शकता (उदा. बिझनेस युनिट हेड, क्वालिटी हेड इ.). अशी जागा एकच असते व इतर ९९ जण रांगेत असतात. त्यामुळे अशा जागेवर बढती मिळणे खूप अवघड आहे. कामाचा ताण मात्र प्रचंड असतो. रोजचे किमान ११-१२ तास राबावे लागते. एका ठराविक आकड्यानंतर उत्पन्नाचे देखील काहीही महत्त्व वाटत नाही. ४०+ वय असलेल्यांना बरीच व्यक्तिगत बंधने असतात. ज्या शहरात काम करतात तिथून दुसर्‍या शहरात जायला तयार नसतात. ऑनसाईट जायला तयार नसतात. वेगळे काम करण्याची इच्छा नसते. झपाटून काम करण्याची उर्जा कमी झालेली असते. परंतु वरिष्ठतेमुळे वेतन खूप जास्त असते. त्यामुळे अशा लोकांना शक्य तर घालवून द्यावे अशीच कंपनीची मानसिकता असते. ४०+ वयाचा माणूस जे काम करतो तेच काम त्याच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेला कर्मचारी निम्म्यापेक्षा कमी वेतनात करू शकतो. त्यामुळे वयाच्या चाळीशीनंतर आर्थिक व्यवस्थापन करून निवृत्त होणे उत्तम. योग्य आर्थिक व्यवस्थापन केले असले तर निवृत्तीनंतर पैशाची अजिबात काळजी न करता स्वतःच्या आवडीच्या विषयात मन गुंतविता येते. माझ्या परीचयातील किमान १० जणांनी ४०-४५ या वयात कायमस्वरूपी निवृत्ती स्वीकारून स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. काही जण एनजीओ मध्ये काम करतात, एकाने शेती घेऊन हौशी शेतकरी झाला आहे, काही जण आठवड्यातून काही वेळ शिकविण्याचे काम करतात, काही जण स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करतात, काही जण काऊन्सलिंगचे काम करतात. काही जण निवांत आराम करतात. प्रत्येकाने पुढील २५-३० वर्षे पुरतील इतकी आर्थिक व्यवस्था केली आहे व त्यामुळे ते निवांत आहेत. कस्टमरच्या काळज्या व जोखीम स्वतःच्या डोक्यावर घेऊन मानसिक ताण घेउन जगण्यापेक्षा सर्वजण निवांत, ताणरहीत आयुष्य जगत आहेत. मी स्वतः ८ वर्षांपूर्वी आयटीतून कायमस्वरूपी निवृत्ती घेतली व गेली ६-७ वर्षे एकदम वेगळ्या क्षेत्रात आहे. एका आयआय-टीजेईई प्रशिक्षण संस्थेत फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकूण ८ तास मी गणित हा विषय शिकवितो. आयटीतून मला आज मिळाले असते त्या तुलनेत जेमतेम १०-१५% उत्पन्न मिळते. परंतु योग्य ते आर्थिक व्यवस्थापन केल्यानंतरच निवृत्ती घेतल्यामुळे उत्पन्नाची चिंता नाही. काम आटवड्यातून फक्त ८ तास असून कामाचा ताण अजिबात नाही. उलट शिकविणे ही अत्यंत आनंददायी गोष्ट आहे. समजा हे कामही काही कारणाने बंद करावे लागले तर एखादे वाद्य व एखादी नवीन भाषा शिकण्याचा विचार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

असे नियोजन करण्यासाठी धडपडतोय पण बहुधा वयाच्या ५० पर्यंत होईल असे वाटत नाही. तुम्ही खरोखरीच तुमचे आयुष्य तुम्हाला हवे तसे स्वत: घडवू शकलात याचा आनंद वाटतो. अवांतर : गुर्जींचे भाजपा सोडून इतर विषयांवरचे प्रतिसाद एकदम चांगले व दोन्ही बाजूकडच्यांना तसेच कुंपणावर बसलेल्यांना देखील आवडत असणार याची खात्री वाटते. :)

In reply to by धर्मराजमुटके

गुरुजींचा प्रतिसाद आवडला. २०-२२ वर्षांनंतरही बेंचची काळजी म्हणजे अवघड आहे. (गुर्जींचे भाजपा सोडून इतर विषयांवरचे प्रतिसाद एकदम आवडत असणारा) आजानुकर्ण

In reply to by श्रीगुरुजी

वास्तवदर्शी प्रतिसाद. वयाच्या चाळीशीत आयटीमधील करीयर संपतं हे अतुल कहाते यांच्या एका आयटी विषयावरील पुस्तकात वाचले होते.

In reply to by सतिश गावडे

आयटीतच नव्हे तर इतरही ठिकाणी हीच परिस्थिती असावी असे वाटते. त्याच स्किलसेटची माणसं अगर कम दाममें मिले तो कोई ये क्यूं ले, वो न ले अशी विचारसरणी साधारण आढळत आहे. एक्स्ट्रॉआर्डिनरी टॅलेंट अपवाद असतात मात्र याबाबतीत.

In reply to by सतिश गावडे

चाळीशीनंतर इंटरेस्ट संपतो हे मान्य. पण करणार काय. श्रीगुरुजी म्हणतात त्याप्रमाणे आर्थिक व्यवस्था करणे सर्वांना जमत नाही. आणि घरी एकटा कमावणारा असेल तर जरा जड जाते. इतर प्रतिसाद बघता, अशा मानसिकतेचा मी एकटा नाही हे बघून बरे वाटले.

In reply to by सतिश गावडे

चाळीशीनंतर इंटरेस्ट संपतो हे मान्य. पण करणार काय. श्रीगुरुजी म्हणतात त्याप्रमाणे आर्थिक व्यवस्था करणे सर्वांना जमत नाही. आणि घरी एकटा कमावणारा असेल तर जरा जड जाते. इतर प्रतिसाद बघता, अशा मानसिकतेचा मी एकटा नाही हे बघून बरे वाटले.

In reply to by खटपट्या

श्रीगुरुजी म्हणतात त्याप्रमाणे आर्थिक व्यवस्था करणे सर्वांना जमत नाही. आणि घरी एकटा कमावणारा असेल तर जरा जड जाते. अगदी ! सध्या आयटीत घडणार्‍या आणि येणार्‍या टेक्नॉलॉजित कसे फिट बसता येइल ते पहायला हवे ! १०+ वर्ष आयटीत घाल्यावर मला समजलेली गोष्ट म्हणजे साल ९६-९८ ते २००६-०७ आयटीचा बेस्ट कालखंड होता,त्या काळात जे ऑनसाईट पोहचुन सेटल किंवा लाँग ड्युरेशन राहु शकले शकले ते बर्‍या किंवा उत्त्म पैकी आर्थिक स्थिती मिळवु शकले, यानंतरच्या कालखंडात मात्र कुठेतरी वेगळेपणा जाणवतो... तुम्ही जी-मेल वापरता म्हणजे तुम्ही क्लाउड टेक्नॉलॉजी वापरता,आता ऑटोमेशन आणि आयओटी बरोबर पुढील टप्पा कसा घडतो ते येणार्‍या काळात दिसुन येइल. २०१४ साली भारतीय आयटी कंपन्या मिडल एज मध्ये पोहचल्या... सध्य परिस्थिती पाहता ३५ + वरील लोकांना यापढे वाटचाल करताना अधिक कठीण जाईल असे वाटते,कारण आपल्या आयटी कंपन्यांना ऑटोमेशन बरोबरच तरुण रक्ताची गरज जास्त भासणार आहे.आजच्या काळात क्लायंट्सची रिक्वांरमेंट अधिक अग्रेसिव्ह झाली आहे, जिथे काही क्लायंट्स आता नविन प्रोजेक्टसाठी इंटरव्हूव देणारा "रिसोर्स" सिलेक्ट न झाल्यास कंपनीला पेनल्टी आकारु शकतो, त्यांच्याकडे फक्त सिलेक्ट होउ शकेल अश्याच रिसोर्सच्या इंटरव्हूसाठी वेळ असेल. संदर्भ :- India's $108-billion IT industry enters middle age

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Coldplay - Hymn For The Weekend (Official video)

योगायोग कसा. आजच माझ्या बाकावरच्या मित्राशी बोललो. सॅड होता. म्हणाला नुसतं बसणं पहिले चार दिवस मस्त वाटतं. मग जिमच्या आरशातही बॉस दिसायला लागतो.

सांप्रत काळात आयटीमध्ये बाकड्यावर येणे अतिशय धोकादायक झाले आहे. जर विशिष्ट कालावधीत नवीन प्रकल्प मिळाला नाही/ मिळवू शकलो नाही/ घेतला नाही तर ते घातक ठरु शकते.