Skip to main content

हॉटेल (रेस्टॉरंट) मधली टीप आणि सर्व्हिस चार्ज

लेखक अत्रन्गि पाउस यांनी मंगळवार, 03/01/2017 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
हॉटेल (रेस्टॉरंट) मधला सर्व्हिस चार्ज हा एक नवीन झोल का बर सुरु झालाय ?? रेस्टॉरंट चालकांनी मेनू कार्ड मधले दर सर्वकरसमावेशक करून जाहीर करणे आणि ग्राहकांनी खाल्लेल्या पदार्थांच्या मेनू कार्ड वरील दराबरोबर एकूण बेरीज जुळते आहे हे बघून बिलावर एक पै सुद्धा टीप न देता तिथून बाहेर पडणे हे इतके सोपे करता येणार नाही का ????

वाचने 2183
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

खरे तर असे वेगळे चार्ज लावणेच योग्य असायला हवे. म्हणजे मी एक डोसा खाला आणि त्याचा दर ५० रु अधिक टॅक्स असा असेल तर हॉटेलने तो ४० रुपये अधिक सर्विस चार्ज १० रुपये असा (उदाहरणार्थ) लावला पाहिजे. त्यानंतर ४० रुपयांवर व्हॅट आणि १० रुपयांवर सर्विस टॅक्स लावला पाहिजे. सध्या ५० रुपयांवर दोन्ही टॅक्स लावले जात आहेत.

In reply to by नितिन थत्ते

वस्तूच्या किंमतीवर व्हॅट आणि सर्विसच्या किंमतीवर सर्विस टॅक्स असे असायला हवे.

थत्ते सरांशी सहमत. वस्तू व सेवा यावर वेगवेगळा कर आकारला जातो तो तसाच ग्राहकांकडून वसूल केला गेला पाहिजे. त्याचबरोबर आपले बील किती व कसे येणार याची पूर्ण पारदर्शक माहिती ग्राहकाला आगावू दिल्या गेली पाहिजे. मॅक्डी, बर्गरकिन्ग, सबवे, इत्यादी ठिकाणी जे रेटकार्ड लावलेलं असते त्यात बेसरेट असतात, खरे बील वाढवून येते. असा प्रकारही चुकीचा आहे.