मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृंगार

प्रचंड गारठा

प्रशांत उदय मनोहर ·
------ भाग १: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! बर्फ़च घेऊन जणु बाहेर वाहतोय सुसाट वारा ! सूर्यकिरणांनी चकाकतोय दवबिंदू... की पारा? निसर्गाने उघडलाय बघ! सौंदर्याचा गाभारा.... माझ्या हातात तुझा हात उबदार जरा... तुझ्यासवे चालत चालत सरावा जन्म सारा.... प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! तुझ्यासह घालवलेला क्षण क्षण न्यारा....! ------ भाग २: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! झोपावे जरा, अजून कामाचा शीण नाही गेला सारा.... पहाटे पहाटे पेपरवाल्याने बेल वाजवली कराकरा.. सकाळी सकाळी "ही" का आवरतेय आज घरातला पसारा? आज रविवार!

रेखीव

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
घडे काय हे; ना कळे योजना ही उभा ज्येष्ठ रावा; कुणी हाक मारी मिळे कोपर्‍याला नव्याने उभारी उधाणून ऊर्मी उमलली दुपारी गाभ्या तळाशी किती रत्नराशी लयधुंद वलये तरीही उराशी अंगी दुरावा कसा हा म्हणावा रेखे कुणी पापणी-आत नक्षी स्मिताची कळी अंगणी अंग जाळी नयनी खुळी ओढ नवती निराळी अव्हेरू कसे आवरू वा कसे गुंतला व्याध पाशात भुलला अवेळी .....................अज्ञात

थंडी माघाची

पाषाणभेद ·
काव्यरस
थंडी माघाची थंडी पडलीया माघाची राया माघाची घाई करा तुमी येण्याची ||धृ|| लवकर या हो जवळ घ्या हो जरातरी फिकीर करा वेळेची || नका नका आसं करू नका जिव माझा फुका जाळू नका एकटेच का दुर र्‍हाता तिथं पेटवा शेकोटी माझ्या ज्वानीची || थंडीनं जिव केला येडापिसा उन उन उबेला जवळी बसा हातावर हात आन पायावर पाय पहा चोळून राहिलेय मी केव्हाची || कालचा दिस आठवा ना रुसवा गोडीनं मिटवा ना आणलय काय दावून जरा मुठ उघडा हाताची || - पाभे

स्वरकिंचित

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
शब्द एक पडला कानी उठल्या कुठल्या लहरी रानी चाळवले रुधिरामधले रण अमृतमय झाले पाणी कंठ कोरडा गहिवरला ओघळले यमुनाजळ नयनी वात कोंडला उरी हुंदका फुटला श्वासामधुनी भिजले काजळस्वप्न लोचनी उत्सव काहुर मन सदनी भेट दाट घडली स्वरकिंचित बहर पावली अवनी ............................अज्ञात

एकदा तरी

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
तुटल्या तार्‍याची उल्का मी मी एक शलाका जलणारी राखेतिल सुप्त निखारा मी पाण्यातिल ज्वाला झुरणारी का व्हेट दिली का ओढ मला आशा अभिलाषा भाव उरी एकांत क्लांत विरही रात्री स्वप्नात होतसे गाठ जरी ह्या ध्यासाचे नच मोल तुला टांगते सदा मन अधांतरी मज आस प्रभाती रोज असे आलिंगशील एकदा तरी ..........................अज्ञात

प्रीत दे ना मजला ...

ajay wankhede ·
लेखनविषय:
काव्यरस
मंद वारा रात्र चांदनी धुंद मी मधुमती का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला || स्वप्न तुझेच सजविले स्वप्नातच रंगविले तुजला स्वप्नातच मी रमले स्वप्न वेडी वृषला का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||१|| प्रीत तुझी हवी हवीशी रोज मला वाटते दिस न रात तुझी संगती होय मला भासते प्रीतीच्या भावना शरदा त ही चिंब चिंब भिजल्या का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||२|| मन धुंद धुंद वाट पाहते तुझी कशी राहू सांग मी एकटी ? हे विरहाच्या वाळूतील मृगजळा का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||३|| मंद वारा बोचतो स्पर्श तुझाच हा धगधगले अंतःमन घे जवळ घे मजला रात्र चांदनी मिठीत घेउनी चुकवू नको रे क्षणा का देतोस रे

युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले

पाषाणभेद ·
काव्यरस
युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले तो: ओठ गुलाबी काय नकळत बोलले ती: अं हं तुझ्यासाठीच ते रे नकळत विलगले तो: संध्या आज का फुलूनी आली रंग तांबडे सोनेरी ल्याली ती: दिवसा रातीच्या मिलनवेळी संध्या असली फुलूनी आली लाजलाजूनी बघ झाली वेडी त्या लाजेने गाल तिचे आरक्त रंगले तो: पाण्यावरचे तरंग का हालती डुलती तरंगातूनी काय कोणता संदेश वदती ती: शांत पाण्याला जीवन देण्या तरंग असले आले जन्मा जळात ते जवळी राहून लडीवाळ काही गोड गुपीत बोलले तो: फुले माळलीस तू या वेणी गंध तयांचा गेला रानी ती: भ्रमर झाला बघ तो वेडा जवळी आला रस घेण्या चुंबूनी भ्रमर कुणी का त

अर्धसत्य

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
मंतरलेली शीळ कुठुनशी चित्तसदन मन होते मंथर अंदोलत उलगडते प्रतिमा झुळुक मिटविते पुरते अंतर कोष रेशमी लय कांचनमय रात्र झुलविते रास निशाचर गोत्र मिरविते मोरपिसांचे अमानवी संस्कार शिरावर मिटल्या डोळ्यां-आंत सरोवर झुरते काजळ उभय तिरांवर जाग मत्सरी येते अवचित अर्धसत्य मग होते गोचर ..............अज्ञात

आकाशलक्षी

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
चंद्रिका आकाशलक्षी; कूस छाया पावली त्या प्रभाती, नांदणार्‍या; जागल्या अन चाहुली मंद वारा गंधमंडित छंदला गात्रांतुनी धुंदल्या हृदयी; स्वरांच्या; आर्द्र ओल्या मैफिली तेच गाणे ते उखाणे पापण्यांची सावली सुप्तशा वर्मास छेडे, गोत, हलक्या पाउली डोहजळकुंभात फुलल्या; तलम कोमल कमलिनी आर्त रात्रीचे विखुरले, स्वप्न भरले लोचनी .......................अज्ञात