Skip to main content

५. सोनेरी क्षणांची राजभेट...

लेखक गणेशा यांनी बुधवार, 11/01/2012 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
नशिल्या गंधपहाटेस आज दवबिंदू हलकेच स्पर्शितो पर्णअलंकारीत शृंगार गर्द धुक्यात सळसळतो तरंगीत स्पंदणे रेखीव त्रीवेणी स्तब्ध निळीशार मखमली पाकळ्यांची येथे अनामिक निशब्द थरथर वसुंधरेची नितळ कांती हलकीच वळणदार बट मदमस्त किरणांची वेल सोनेरी क्षणांची राजभेट गोड सतेज या गारव्यात आयुष्याची नवप्रभात नाजुक रेशिम वाटेवरती सौख्य दाटले मिठीत --------- शब्दमेघ (८ डिसेंबर २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ) ४. कोवळे झुंबर: http://www.misalpav.com/node/19685 ३. स्पर्शगंध: http://www.misalpav.com/node/19398 २. स्वप्नमेघातील चांदणं: http://www.misalpav.com/node/18888 १. पहिल्या भेटीचा सुगंध: http://www.misalpav.com/node/18628
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5279
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

छान बहरलिय कविता - नशिल्या गंधपहाटेस आज दवबिंदू हलकेच स्पर्शितो पर्णअलंकारीत शृंगार गर्द धुक्यात सळसळतो मस्त .खूप पु.ले.शु.

"वसुंधरेची नितळ कांती हलकीच वळणदार बट मदमस्त किरणांची वेल सोनेरी क्षणांची राजभेट" खुपच आवड्लय्....छान

In reply to by अन्या दातार

आधी टॅह्यॅ करेल ना कशावरून..? असं हसरं सुद्धा असेल.. चित्र.. अंजावरुन साभार...

शादी के साईड इफेक्टस म्हणतात ते हेच काय ? शुद्धलेखनाचं का बलिदान देता रे, उगा ते चुंबन घेताना हेलमेट मध्ये आल्यासारखं वाटतंय की. तरंगीत स्पंदणे रेखीव त्रीवेणी स्तब्ध निळीशार मखमली पाकळ्यांची येथे अनामिक निशब्द थरथर

In reply to by ५० फक्त

'अनामिक' हा शब्द गणेशाचा खास आवडता दिसतोय. अनामिक भटकंती, अनामिक निशब्द थरथर इ.इ.

In reply to by प्रचेतस

त्याला 'नावं ठेवायला' आवडत नसेल किंवा नाव दिल्यानं 'पोलखोल' होत असेल.... ;)

नशिल्या गंधपहाटेस आज दवबिंदू हलकेच स्पर्शितो पर्णअलंकारीत शृंगार गर्द धुक्यात सळसळतो
सुदंर कडवं!!

नशिल्या गंधपहाटेस आज दवबिंदू हलकेच स्पर्शितो पर्णअलंकारीत शृंगार गर्द धुक्यात सळसळतो
भन्नाट कल्पनाविलास मालक!! सुंदर रचना!! वाचनखुण साठवलेली आहे. :)

गणेशाची माफी मागून....... डचमळलेल्या अपरात्री या मी लडखडतच येतो अडखळत्या ह्या पावलांनी मी अंधारातच धडपडतो झिंगलेल्या मेंदूच्या ह्या धुंदित डोके कसे सुन्न सुन्न तर्राट झालेल्या डोळ्यांमधुनी नशा पाझरे झिम्म झिम्म मद्याने झिम्माड होऊनी जाहल्या सुरु वांती जडावलेल्या या डोळ्यांनी निस्तेज जाहली कांती आंबट चिंबट या वासात होई नंतर नवप्रभात परत ताजा होवुनी जाई मी मद्यालयात.

In reply to by प्रचेतस

वल्ली ... दारुबाज विडंबन केलेले मला आवडत नाहि .. याची शिक्षा म्हणुन उद्या पुण्यात भेट

In reply to by प्रचेतस

माझेही चार आणे अर्थातच कवी गणेशा यांची माफी-बिफी मागूनच हं! नशिल्या भांगपहाटेस आज पोलिस हलकेच झोडीतो तर्र्र अलंकारित गटार भल्या सकाळी मळमळतो तरंगित रस्त्याने रेखीव बाटली स्तब्ध निळीशार मखमली कागदांची येथे असंबद्ध आकडी मरमर काचेची नितळ कांती हलकाच वळणदार कट मदमस्त सायंकाळची वेळ सोनेरी वारुणीची राजभेट कडू निस्तेज या थंडाव्यात नेहमीचा ठरला बार टोकदार काटे वाटेवरती मद्य दाटले उदरात

In reply to by अन्या दातार

अन्या, खाल्लीस ना माती, बघितले नाहीस का गणेशा वर काय म्हणालाय ते. आता उद्या सकाळीच पकड विमान कुठलेतरी आणि पोच पुण्यात.

In reply to by अन्या दातार

आता काय बोलु ... चालुद्या .. बघु एखादे विडंबन मलाच जमते आहे का काय .. तुमच्या उत्साहाने मुळ कविता लिहिण्यापेक्षा त्यावर विडंबन्च देतो आता ... [:)] बाकी छान जमले आहे तरी एक वेळ ताटली धरा पण बाटली सोडा

In reply to by प्रचेतस

आंबट चिंबट या वासात होई नंतर नवप्रभात परत ताजा होवुनी जाई मी मद्यालयात :drunk: वल्लीदा..मेलो... ;-) टांगा पल्टी... घोडे फरार...

In reply to by अत्रुप्त आत्मा

तरी सांगत होतो, मद्यालयात घोड्यांना घेउन जाउ नका, आता हुडका कुठं गेले सगळे ते...

In reply to by ५० फक्त

@मद्यालयात घोड्यांना घेउन जाउ नका, आता हुडका कुठं गेले सगळे ते...>>> हुडकायला कशाला पायजे...ते गेले त्यांच्या माद्या-लयात ;-)

बहुत ही हसीन होती है वोह कहता ये जमाना था.. हमे भी तो पहली बार उसे आजमाना था.. बस्स.. घुंघट ही उठा सके हम केवल.. आगे..ढेर सारा शरमाना था.... बाकी 'बाल गणेशा' ची मिपाकर आतुरतेन वाट पाहत आहेत. ;)