एकदा तरी

अज्ञातकुल जे न देखे रवी...
तुटल्या तार्‍याची उल्का मी मी एक शलाका जलणारी राखेतिल सुप्त निखारा मी पाण्यातिल ज्वाला झुरणारी का व्हेट दिली का ओढ मला आशा अभिलाषा भाव उरी एकांत क्लांत विरही रात्री स्वप्नात होतसे गाठ जरी ह्या ध्यासाचे नच मोल तुला टांगते सदा मन अधांतरी मज आस प्रभाती रोज असे आलिंगशील एकदा तरी ..........................अज्ञात
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

3 टिप्पण्या 1,322 दृश्ये

Comments

मिसळलेला काव्यप्रेमी नवीन

तुटल्या तार्‍याची उल्का मी मी एक शलाका जलणारी राखेतिल सुप्त निखारा मी पाण्यातिल ज्वाला झुरणारी
.............................!!!

गणेशा नवीन

तुटल्या तार्‍याची उल्का मी मी एक शलाका जलणारी राखेतिल सुप्त निखारा मी पाण्यातिल ज्वाला झुरणारी
जबरदस्त ... पुढील २ हि कडवी मात्र या कडव्यापुढे कमी वाटत आहेत...

रघु सावंत नवीन

' ह्या ध्यासाचे नच मोल तुला टांगते सदा मन अधांतरी ' ही ओळ या पोरिंना एकदम शोभते पहिले कड्वे छान च आहे, कविता आवड्ली रघु सावंत