Skip to main content

युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/01/2012 04:27 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले तो: ओठ गुलाबी काय नकळत बोलले ती: अं हं तुझ्यासाठीच ते रे नकळत विलगले तो: संध्या आज का फुलूनी आली रंग तांबडे सोनेरी ल्याली ती: दिवसा रातीच्या मिलनवेळी संध्या असली फुलूनी आली लाजलाजूनी बघ झाली वेडी त्या लाजेने गाल तिचे आरक्त रंगले तो: पाण्यावरचे तरंग का हालती डुलती तरंगातूनी काय कोणता संदेश वदती ती: शांत पाण्याला जीवन देण्या तरंग असले आले जन्मा जळात ते जवळी राहून लडीवाळ काही गोड गुपीत बोलले तो: फुले माळलीस तू या वेणी गंध तयांचा गेला रानी ती: भ्रमर झाला बघ तो वेडा जवळी आला रस घेण्या चुंबूनी भ्रमर कुणी का तो नसे काही वेडा बोल प्रितीचे मी त्यातून ऐकले - पाभे
काव्यरस

वाचने 1299
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया