Skip to main content

अष्टावधानी

लेखक भटकीभिंगरी यांनी बुधवार, 08/03/2017 15:37 या दिवशी प्रकाशित केले.

लोण्याहुन मुलायम कठोर वज्राहुन !
स्त्री हे खरोखर अजब रसायन ! !

दुर राहिलेल्या आपल्या घरात!
भुकेने रडणार्‍या पिलाची आठवण येउन ,
कड्यावरुन स्वत:ला झोकुन देते !
तीचे मातृप्रेम खरेच अनुपम !!

स्वत:च्या बाळास बांधुन पाठीवर !
खंबीरपणे स्वार होते घोड्यावर !!
पराक्रम करते युध्दभूमीवर !!!
तीची विरश्री करते चकीत ! ! ! !

परदेशातील कडाक्याच्या थंडीत !
ज्ञानसाधनेची उपासना करीत ! !
भारतातील पहीली डॉक्टर होते ! ! !
तीचा निश्चय करतो अचंबित ! ! ! ! !

कधी ऑलिंपिक मेडल आणते!
कधी अवकाशी भरारी घेते ! !
सायंटीस्ट, पोलिस ऑर्मीमध्धे,
तीचा पराक्रम अचंबित करतो ! ! ! !

लोण्याहुन मुलायम कठोर वज्राहुन !
स्त्री हे खरोखर अजब रसायन ! !

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 839
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया