Skip to main content

गणेशवंदना

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 22/08/2009 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा मोरया! काही दिवसापूर्वी देवकाकांनी 'एखादी ५-६ ओळींची छोटीशी बंदिशीसारखी रचना केलीस का? असं विचारलं, आणि नुकतीच मशकूर अली खान यांची मालकौंसातली "मुरख मन मेरे" ही बंदिश ऐकून तिच्यात मराठी शब्द बसवता येतील का, असा विचार करता करता ही गणेशवंदना मनातून कागदावर उतरली. उद्या गणेशचतुर्थी, आणि मिपाचा वर्धापनदिन. त्यानिमित्त माझ्याकडून ही छोटीशी भेट. सकल कलांचा उद्गाता गुणेश गजानन भाग्यविधाता प्रथम पूज्य हा शिवगौरीसुत गणनायक शुभदायक दैवत या विश्वाचा त्राता विनायक या विश्वाचा त्राता आदिदेव ओंकार शुभंकर मी नतमस्तक या चरणांवर तू विद्येचा दाता गजमुखा तू विद्येचा दाता इथे देवकाकांनी दिलेल्या चाली ऐकता येतील. इथेही
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2663
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

देवकाकांनी लावलेल्या चाली इथे ऐकता येतील.
आम्हाला काही भेटल्या नाहीत ब्वॉ ऐकायला . तिथ पघायला भेटल. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

बाप्पांनी रंगी नाचता नाचता गडबड केली होती! आता ऐका. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

छान ओघवती रचना आहे. ऐकता मात्र येत नाहीये. बिपिन कार्यकर्ते