आला पाऊस पाऊस.....
आला पाउस पाऊस
आल्या सरींवर सरी
त्यात न्हाऊन न्हाऊन
सुखावली धरती सारी
आला पाउस पाऊस
आकाशात ढग काळे
एक मल्हाराची धून
नभ आज हे आळवे
आला पाउस पाऊस
त्यात वा-याची ही मस्ती
धरणे, नद्या, नाले सारे
दुथडी भरुन वाहती
आला पाउस पाऊस
झाडे झाली ओली चिंब
हिरवा शालू पांघरुन
पाहतात प्रतिबिंब
आला पाउस पाऊस
डोंगर हिरवे नटले
सजणाला भेटायाला
मन प्रियेचे आतुरले
आला पाउस पाऊस
रस्ते पाण्याचेच झाले
धावपळीचे जीवन
दोन क्षण थांबलेले
आला पाऊस पाऊस
मुले काढतात खोड्या
कुणी डुंबती पाण्यात
कुणी सोडतात होड्या
आला पाउस पाऊस
ओले चिंब झाले पक्षी
तारेवरती विजेच्या
दिसे सुंदर ही नक्षी
आला पाउस पाऊस
माझ्या आवडीचा सण
धुंद बरसता तो
तृप्त झाले माझे मन
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
3480
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
साधी , सरळ
+१ असेच म्हणते!
In reply to साधी , सरळ by पक्या
सुरेख!
छान.
चिंब
धन्यवाद