Skip to main content

तिथे ओठंगून उभी...

तिथे ओठंगून उभी...

Published on शुक्रवार, 25/05/2018 प्रकाशित मुखपृष्ठ
रानपाखरांची घरे अंगीखांदी जे माळते असे झाड फुलताना पान पान किल्बिलते क्षितीजाशी विझताना चांदणे जे उसासते त्याचे पहाटे पहाटे जीवघेणे गीत होते रानावनातून नदी जेव्हा खळाळत जाते ऐलपैलतीरी तिचे पाण-पैंजण वाजते फुफाटल्या मातीवर मृग शिंपण घालते तेव्हा अत्तराची कुपी आसमंती ओसंडते नाद-शब्द-ताल-गंध जिथे काळजा भिडते तिथे ओठंगून उभी.. ...एक कविता असते
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 2467
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

विशेष काही टाळक्यात शिरले नाही... पण जे काय आहे ते छान आहे ! [ अत्तर कुपी प्रेमी ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanati