मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुलपाखरू

मन्या ऽ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
फुलपाखरू एक होते रंगेबेरंगी फुलपाखरू .. त्याचे 'मन' ऐसे नाव.. ईवलेसे नाजुक पंख तयाचे त्यावर सुंदर नक्षी संस्कारांची. फुलपाखराच्या पंखावरचे काही रंग लाल-गुलाबी स्वप्नांचे बालपणीच्या आठवणींचे उमलणार्या फुलांचे चांदण्या रातींचे तर काही रंग आहेत.,मात्र निळे-काळे नको त्या कटु आठवणींचे भळभळत्या जखमांचे चुलीतल्या विस्तवाचे.. त्याच कटु आठवणींने बळ तयाच्या पंखास दिले संकटावर मात करुन त्यास नव्या उमेदीने जगण्यास शिकवले!.. -दिप्ती भगत (१३जून, २०१९)

वाचने 5611 वाचनखूण प्रतिक्रिया 6

गणेशा Tue, 06/09/2020 - 18:21
फुलपाखराच्या पंखावरचे काही रंग लाल-गुलाबी स्वप्नांचे बालपणीच्या आठवणींचे उमलणार्या फुलांचे चांदण्या रातींचे
खूपच छान कविता.. जैसे सादगी हि सुंदरता...

मन्या ऽ Sat, 06/13/2020 - 18:30
गणेशदा, पाभे, कोस्तुभ, संदीप, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! :) वाचकांचे आभार! :)