Skip to main content

मी शोधात आहे अशा कवितेच्या,

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 04/09/2017 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी शोधात आहे अशा कवितेच्या, तारे, वारे, रिमझिम, फुलं, वेली, विरहाचे उमाळे, असं आळुमाळु काहीच नसेल तिच्यात हुलकावण्या देईल ती, पण तरीही नेटाने शोधेन ती कविता जी थेट भिडून उलगडताना देईल अनुभव – हर एक थर सोलूनही जिवंत राहिलेल्या वास्तवाचा, थंड दुधारी कट्यारी इतका खराखुरा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1408
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

ही कविता मस्त आहे. आवडली आहे. ती 'पाच मिनिट' वाली नव्हती आवडली.