मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

काय अपशकून घडला

पाषाणभेद ·
काव्यरस
काय अपशकून घडला
महाराजांकडचा एक सैनिक उत्तरेला लढाईला जातो अन तो तेथे अडकून पडतो. इकडे त्याच्या घरी काय होते ते पहा: (कोरस तसा अनावश्यक वाटतो आहे. तोडा विरस होतो आहे.

नकोस माझी आठवण काढू

पाषाणभेद ·
काव्यरस
नकोस माझी आठवण काढू नकोस माझी आठवण काढू नकोस मजला मोही पाडू भोगले क्षण ते ओले नकोच त्यांना आता कुरवाळू || ओठांवरी ओठ घट्ट मिटी ते शब्दही त्यातून नच फुटी ते कढ दु:खाचे बाहेर काढण्या हुंदकाही नकोच सांडू || उष्ण उमाळा अंतरी गाभ्यात लाव्ह्यापरी जाळे तो मनास काय राहीली शेवटली बाकी गणितही त्याचे नकोच करू || - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०५/२०१०

प्रतिक्षा ? ? ?

निरन्जन वहालेकर ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रतिक्षा ? ? ? निद्रेच्या अधिनस्तहि उगडेच असतात नेत्र, परतीच्या प्रतिक्षेत तुझ्या. न जाणो मिटले ते अन….. अवतरली तू अवचित…….. .? ? ? ? आजही स्मरतात ते दिवस ....... धुंद ! धुंद ! ! पुनवेच्या चांदण्यांत, मोकळ्या केशसंभारांत, निरागस उभी तू. मला वाटले, चंद्रमाच झाला लुप्त धरणीवर, काळ्या मेघाआड. पुन्हा बहरला तोच वसंत, तारकांची धुंद बरसात, आसमंती तोच मंद वारा, ? ? ? ?

अंगाई

क्रान्ति ·
लेखनविषय:
प्रेरणा {जगातल्या सगळ्या आया आणि त्यांच्या लेकरांची माफी मागून} अलिकडे निंबोणीचे झाड राहिलेच नाही चंद्र वेडा मोबाइलच्या टॉवरमागे झोपी जाई! गाय पदपथावर, चिमणीला घरटे नाही परस ना वेली, कुठे झोपतील जाई-जुई? शाकीरा, मॅडोना, जॅक्सन यांनी गिळली अंगाई! देवकी, यशोदा नाही, आई हवी पैसेवाली हट्ट पुरविता तिची झोळी रिकामीही झाली! नको रडगाणे, हवी जाहिरातीमधली आई!

डुडुळगावचा गोलंदाज

शरदिनी ·
लेखनविषय:
काव्यरस
स्वप्नी निवडू धुडूम्म गाज डुडुळगावचा गोलंदाज तोराबोरा ओमरसामा काय ललाटी ओ ओ मामा गोलाबारी सुसूत्र ताडन रुजुवातीला करूण धावन शोषण भीषण पोषण वेसण धवल गिटारी कडकड मंथन तित्तिरबाला ग्रंथीलाला ग्रसनी जिव्हा कुरूप भोला यमनाला घालू तेलघडा हाका बिचारी मुकी चिडा

वाढदिवस

sur_nair ·
लेखनविषय:
काव्यरस
वाढदिवस अलीकडे ते एकमेकांचा वाढदिवस साजरा करत नाहीत एकमेकांना छोटासा पुष्पगुच्छ साधसं भेटकार्डही देत नाहीत इतर कुठल्याही दिवसासारखी ती तारीख येते, निघून जाते मित्र मैत्रिणींच्या शुभेच्छामध्ये हरवतात दोघे एकमेकांचे 'वय वजन वाढते त्यात साजरं काय करायचं' ती म्हणते डिनर व केक, सुंदरशी भेट त्याची सर्व इच्छाच मरते कधी तोही असतो हिरमुसलेला तिच्यावर कशास्तव चिडलेला त्याचा आवडीचा पदार्थ करायचा मग तिचाही बेत रद्ध झालेला यावेळेस तो विचार करतोय निदान प्रयत्न तरी करायचा डिनर नको तर चौपाटीव

नांदी

सन्जोप राव ·
लेखनविषय:
काव्यरस
विडंबनाचे विडंबन हा नवा खाक्या स्वीकारुन किंवा जुन्या बाटलीत भरलेली नवी दारु म्हणून काही बोल बोलले , अन मौन काही अंतरी (सोलवटली ढोपरे, अन शेकल्या नडग्या तरी) काही लाह्या तडकल्या, अन मूग गिळले भर्भरी बंडझेंडे फडकले अन उग्र वळलेल्या मुठी काही म्हणती लाजुनि 'शोभा झाकलेली बरी' पाठमोर्‍या आकृतीला पाहुनि उद्गारले 'माणूस हा होता बरा' गोष्ट असतसे हीही खरी काय चमचे, किति पळ्या अन डाव कित्येकी येथे मेल्या म्हैशीला पिळुनि दावू दूध मणभरी हरवल्याचे दु:ख नाही, हरवले ते हरवले कोतवाला हाती फसलो, शल्य हे उरले उरी पालखी ती उतरली अन भोई खांदे चोळती

“बुडीत खाते“ माझेहि ! !

निरन्जन वहालेकर ·
लेखनविषय:
काव्यरस
सध्या मिपा वर सन्माननीय सभासदाचा प्रचंड "काथ्याकुट" सुरु आहे बुडीत “ खा s s त्या"च्या “ हिशेबाचा ! ! ! जो माझ्यासारख्या सामान्य व नवीन मिपाकराच्या आकलना पलीकडे आहे. वाटलं आपणही आपला “ हिशेब ” सांगून मोकळ झालेलं बरं ! कदाचित सन्माननीय सभासंदांना ह्या मनस्तापाचा ताण कमी होण्यांस थोडीफार मदत होईल कोरीच पान आयुष्याची ! ! !

आई

पंचम ·
लेखनविषय:
काव्यरस
आई मी सावलीत होतो कल्पतरूच्या तोवरी जाण नव्हती... तो कल्पतरू जळत होता, ज्याची मला तहान होती.... वात्सल्याच्या चार भावना, कुठल्या कुठे विरून गेल्या.... माणुसकी जिथे मातीत मिसळली , ती मातीसुद्धा अजाण होती.... अगतिक मी प्रेमाच्या शोधात चार दिशात हिंडलो. राहूनी या धरेवरती त्या परमेश्वराची आस होती..... शेवटी फिरूनी थकलो, आलो कल्पतरूच्या छायेत.. खरच परमेश्वरच स्थिरवला होता, त्या कल्पतरूच्या मायेत.... मिळाली तिची छाया साताजन्माची उतराई होती, तिच्या कुशीत शांतपणे घेणारी ती कल्पतरू माझी आई होती....... -निशां

आज अचानक उदास का वाटे

पाषाणभेद ·
काव्यरस
आज अचानक उदास का वाटे आज अचानक उदास का वाटे न रमे मन हे दिवसाही अंधार भासे ||धृ|| ईकडे पाहून तिकडे पाहून वेळ घालवू किती कसे कोण जाणे कितीक वेळ माझी जाते आज अचानक उदास का वाटे ||१|| किती मी चेहर्‍यांना वाचू किती अनूभव लेखू आवाज जवळी नसतांना साथीचे शब्दही पडत आहे थिटे आज अचानक उदास का वाटे ||२|| दुर अंतरावरी असता तू कसा निरोप देवू येथला निरोपही घेण्या मन माझे आक्रंदूनी उठे आज अचानक उदास का वाटे ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०५/०५/२०१०