मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

“बुडीत खाते“ माझेहि ! !

निरन्जन वहालेकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सध्या मिपा वर सन्माननीय सभासदाचा प्रचंड "काथ्याकुट" सुरु आहे बुडीत “ खा s s त्या"च्या “ हिशेबाचा ! ! ! जो माझ्यासारख्या सामान्य व नवीन मिपाकराच्या आकलना पलीकडे आहे. वाटलं आपणही आपला “ हिशेब ” सांगून मोकळ झालेलं बरं ! कदाचित सन्माननीय सभासंदांना ह्या मनस्तापाचा ताण कमी होण्यांस थोडीफार मदत होईल कोरीच पान आयुष्याची ! ! ! मसणांत गोवऱ्या गेल्या अन आयुष्याच्या अस्ताला आलो नुरले नव्हते आता काही तरी जीवनाच्या हिशेबाला बसलो आयुष्याचा ताळेबंद तपासण्याचा, कोरे कागदं रंगवण्याचा, पुन्हा पुन्हा केला प्रयत्न. जीवन च धूसर झालेलं, व्यर्थ ठरले सारे यत्न. काय कमावले काय गमावले हिशेब कधी जुळलाच नाही आयुष्याची ची कोरी पानं रंगांत कधी भिजलीच नाहीत. निरंजन वहाळेकर

वाचने 2733 वाचनखूण प्रतिक्रिया 7

विकास 14/05/2010 - 18:52
कविता छानच आहे. आवडली. धन्यवाद. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

शुचि 14/05/2010 - 18:54
खूप आवडली. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मदनबाण 14/05/2010 - 18:59
छान कविता... मदनबाण..... When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams. Dr Seuss

टारझन 14/05/2010 - 19:06
छाण !! बाकी तुमचं "निरन्जन वहालेकर" हे नाव आमच्या एका अंतरजालीय मित्राशी ९५% साधर्म्य दाखवतं हे विषेश :)

प्रतिसादा साठी सन्माननीय सभासदाचे धन्यवाद ! व मनस्वी आभार.! ! टारझन साहेब, धन्यवाद ! " विदर्भाशिवाय (अकोला) आमची कुठेही शाखा नाही ".व "आमच्यासम आम्हीच" असल्यामुळे आजतागत आम्हाला आमच्या आडनावाचे कोणीच नोकरी च्या काळांत तरी आढळले नाही. त्यामुळे आपल्या मित्राची ओळख झाल्यास खूप आनद वाटेल. सस्नेह निरंजन

अरुण मनोहर 15/05/2010 - 08:27
>>>आयुष्याची ची कोरी पानं रंगांत कधी भिजलीच नाहीत. आम्ही मात्र तुमच्या कवितेच्या रंगात रंगलो. अवांतर- मी मुळचा नागपूरकर. ही कविता विदर्भाला देखील लागू होते असे वाटले.