Skip to main content

करुण

माझ्या शेतावरचे काळे ढग...!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 18/01/2011 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
कठीण होत चाललेय सगळे हे शेताचे बहरणे आता गायब झालीय विहिरीतील मोटेचे पाणी बैलाच्या गळ्यातील घुन्गारांचा लडिवाळ आवाज शेती नापीक दाखवून न.अ करीत चाललेत खूपशे शेतात बंगले बांधून दिवाळी साजरी करू लागलेत आपली माणसे हिरवळीचा स्वर्ग होत चाललाय नर्क बैलगाडीच्या पायवाटा पुसून गेल्यात कधीच नि फटफटीचा चाक्राळलेला रस्ता तयार झालाय संपन्नता आलीय डोक्यावर ह्या छोट्याशा खेड्यात फड लागतोय एखाद्या नारायणगावच्या तमाशाचा बहकून गेलेत श्रीमंत शेतकर्याचे ही पोरे स्टार हॉटेल शेतात काढण्याच्या विचारात जातात ही पोरे स्वप्नात हरवून शेतकर्यांच्या पासोड्या हरवून गेल्यात पैश्याच्या थैल्या घेऊन उडवल्या जा
काव्यरस

वैशाख छाया

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 18/01/2011 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
कोण्या सुस्त दुपारी असता भानू धरा जाळीत कोणी अर्ध जागृत पहुडले कोणी सुरा ऐकीत रस्ते एकले झळा झेलीता पसरुनी सुस्तावले छाया किंचीत कुठे तरी तिच्या उष्म्याने ताडीयले झिजल्या पायतणाला ओढीत महिला फ़ळे घेउनी भिजल्या पदराशी घट्ट धरुनी शिरभार सांभाळुनी संत्री घ्या संत्री वदे अविरत आवाजही चिरकला घर्मे अंग पाणी ते निथळता शुष्कावला कि गळा नसे मुळीच जाणीव तिजला नव्हती भूक तहान विकतील का फ़ळे थोडी, घरी निजले बाळ लहान संत्री संत्री स्वरांमुळे उघडले गृहद्वार कोणी तरी निद्रा नष्ट झाली यास्तव तो वदिला क्रोधित स्वरी भाव काय बोल गे झडकरी का झोप तू मोडिली संत्री स्वस्त चांगलीही नसता घेणार नाही मु
काव्यरस

तुमचे शोकेसमध्ये ठेवल्यासारखे आयुष्य ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 17/01/2011 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
काल तुम्ही लांबून तुमची गाडी दाखविली म्हातार्याला काय मस्त रंग होता हो तिचा गाडीच नाव काय तुम्ही घेतले डोक्यावरून गेले बघां त्याच्या त्याला वाटले आपण पण फिरवावा जरासा हात तुमच्या नजरेत त्याच्या हाताची किमंत दिसली नि हिमंत नाय झाली बघा म्हातार्याची तिला कुरवाळायला... मायच्यान ..!! शेती करणारां म्हातारा आयुष्यभर तेच केले कसा लावणार तुमच्या गाडीला हात रस्त्यात तुम्हाला तुमचा मित्र भेटला तेव्हा तुम्हाला लई लाज वाटली डोळ्यात दिसत व्हतं पाक तुमच्या...
काव्यरस

काव्यक्षण (कविता संग्रह)

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 16/01/2011 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत मिसळपाव वर प्रकाशीत झालेल्या सर्व कविता एकत्रीत स्वरूपात येथे देत आहे. - निमिष न.

...

लेखक अभिषेक९ यांनी सोमवार, 10/01/2011 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजचे पान कोरे-करकरीत आहे, अगदी पांढरे शुभ्र .... इतके की पेन टेकवायची पण भय... कदाचित त्याचे सौंदर्यच नष्ट होईल... मागची पाने गच्च आहेत आहेत असंख्य रंग लाल, पिवळा, निळा, भगवा गडद्द आहे, गुलाबीपण आहे ... पण फिक्कट.. आहेत अनेक अक्षरे काना, मात्रा, अनुस्वार सगळे सुष्पष्ट आहे, जोडाक्षरेही आहेत... पण खोडलेली... आहेत आकडे पण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आहेत, भागाकारही आहे...
काव्यरस

निष्पर्ण वृक्षावर पक्षी घरटी नाही बांधत !!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 10/01/2011 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्षापासून तो वृक्ष उभा ! निष्पर्ण ! उघडा !! पर्णहीन ! म्हातारा खंगलेला !! निष्पर्ण वृक्षावर पक्षी येत नाही वस्तीला नाही बांधत आपल्या पिल्लासाठी घरटे वृक्ष आसुसलेला पक्ष्यासाठी !! बांधारे घरटे माझ्या अंगणात फुकट देतो .फक्त येऊन राहा . बांधा घरटे.! रात्रीची तेवढीच मला सोबत भीती वाटतेरे मला एकटेपणाची एके दिवशी माणसांची जमात मला नष्ट करतील नि नेतील मला जाळायला आपले टीचभर पोट भरण्यासाठी !!!
काव्यरस