मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

भेळ

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
काव्यरस
==भेळ== तत्वांची मारामारी शब्दांचा खेळ,भावनेचा भडका व्यवहाराची भेळ॥ध्रु॥ घ्यायचे भरपुर चुरमुरे,वरुन फरसाणाचा भपका कांदा टोमेटो टाकुन,वरुन चिंच-पाण्याचा हबका डाव सरसरत फिरवुन दाखवायचा,पंचवीस रुपायाचा खेळ। गिह्राईक चांगलं हेरुन घ्यावं,मुठभर शेव पेरुन घ्यावं

आयुष्य पार सरलेले

स्वानंद मारुलकर ·
लेखनविषय:
काव्यरस
तडजोडी करता करता आयुष्य पार सरलेले स्वप्नांची वाफ उडाली कोरडे-शुष्क उरलेले आता न वळे पाऊल वाटेवरती गाण्यांच्या कंठात रुते आवाज ओठही बंद शिवलेले हे दुःख आत ना मावे बाहेर येतही नाही पाहून पोरकी स्वप्ने डोळ्यांशी डबडबलेले माझे मन मोठे कोडे सुटता न सुटे थोडेही बाहेर दिसे स्वच्छंदी आतूनी बुरसटलेले खांद्याला घेऊन ओझी मसणात रोजची वारी एकेका दगडा खाली एकेक स्वप्न पुरलेले - स्वानंद

नसबंदी

राजेश घासकडवी ·
लेखनविषय:
काव्यरस
मर्दपणाचा ताठा मिरवित गुर्मित धुमसत धुंद जवानी उभारून झेंडा मस्तीचा दाहिदिशा फिरलो मनमानी रांडानी खिडक्यांतुन तिरप्या खुणाविले मजला डोळ्यांनी शालिन नजरा झुकल्या,उठल्या अस्फुटशा होकारांनी आसुसलेल्या वक्षांवर किति हात फिरवले आसुसलेले सीत्कारांना कितीक मादक, आत्म्याचे होकार दिलेले नाही पाहिली काळी माती नाही नाती कुठे बांधली घुसवत अन् हल वखवखलेला बेदरकारी बिजे उधळली आता बघतो चौरस गोंडस कुटुम्बलेले कितीक, छोट्या दो चिमण्यांना कडी घेउनी शिस्तित चालत रेषा कोत्या इंग्लिश मिडियम फॉरिन वारी खुराक अन् बी कॉम्प्लेक्सचे फेसबुकावर पडती फोटो भरतनाट्यचे अन मुंजीचे गोजिरवाणी स्वप्ने माझी घ

नेमेंचि त्यानंतर पावसाळा

धनंजय ·
लेखनविषय:
काव्यरस
नेमेंचि त्यानंतर पावसाळा - - - नेमेंचि त्यानंतर पावसाळा येईल, त्यालाहि बघावयाला असणार नाही परि मी जगाचा. वर्षानुवर्षीं वणवा उन्हाचा धग्-धग् धगीचा जळतां उन्हाळा, आकांत तान्हेल चराचराचा. विश्वास विश्वास जगावयाचा (नाही जरी मीहि भिजावयाला) देईल नेमें मग पावसाळा - - -

ब्रॉयलर कोंबडी सारखे हे शहर ....!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
हे शहर झालेय ब्रॉयलर कोंबडी सारखे गुबगुबित देखणे तरी सत्वहीन नुसतेच मास अंगावर बेचव नि अळणी संस्कृतीहीन झालेय हे शहर नि येथला निसर्ग देखील कृत्रिम झालाय नुसतीच फुले आकर्षक गंधहीन .........! सुजत चाललय हे शहर वाढत चाललय बाद्लीबाद्लीने ओतली जातात येथे माणसे नकोतितक्या भन्नाट वेगाने कोण कुठली ...? बिन चेहर्याची .....

नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती

विदेश ·
काव्यरस
( चाल : इंद्रायणीकाठी - देवाची आळंदी ) नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती चालली खरेदी.. थांबेना ती |धृ | सवलतींचा ताजा - लागतो ढीग नाचती विक्रेते.. मागे पुढे |१| नव्या साडीसाठी - माझ्यापुढे साठे - खर्चाचा हिशेब भांडणात वाढ.. पत्नीसंगे |२| नव्या साडीसाठी - मागची उधारी - राहिली अजून जॉर्जेट .. शिफॉन .. , सुटका नाही |३| नव्या साडीसाठी -

माणसान्चा देव

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
काव्यरस
माणसान्चा देव रात्र झालि बाप्पा झोपला,माणसान्वरति भरपुर कोपला, दिवसभर देतात त्रास,काढुन ठेवतात एकच घास.

वाडा

पाषाणभेद ·
काव्यरस
वाडा
जुन्या जाणत्या भल्या थोरल्या गोष्टी सार्‍या सरल्या खोबणीत पांढरे झाले डोळे, जाणीवा जणू मेल्या ||१|| काळोखाच्या गर्दीमध्ये हरवले त्याचे दिसणे कुठे पाहुनी कसे वदावे, वर्णन या मुखाने ||२|| डोळ्यांत घातले अंजन जरी, न दिसे जमीन खाली कुरकुरणार्‍या दरवाजांवर कड्याकुलूपांनी नक्षी केली ||३|| ओट्यावरचे दगड कालचे, चालले पायात खाली खांबांवरची कोरीवकामे अजगरासम सरपटली ||४|| ओलावलेल्या भिंती ल्याल्या रंगांचे उडते पोपडे कंदील नाही उजेडाला म्हणून काळवंडले कोनाडे ||६|| डुगडुगणार्‍या जिर्ण पायर्‍या जिना वर घेवू

हे कधी बदलणार?

उदय के'सागर ·
लेखनविषय:
काव्यरस
नमस्कार, मी पहिल्यान्दाच मिपा वर काहि प्रकाशीत करतोय, इथे प्रकाशीत होणारे साहित्य दर्जेदार आहे, त्यामानाने माझी ही कविता कादाचीत खुपच साधारण वाटेल किन्वा उगीच यमक जुळवण्याचा प्रयत्न वाटेल, पण I think this how I will learn from your comments.