मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नसबंदी

राजेश घासकडवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मर्दपणाचा ताठा मिरवित गुर्मित धुमसत धुंद जवानी उभारून झेंडा मस्तीचा दाहिदिशा फिरलो मनमानी रांडानी खिडक्यांतुन तिरप्या खुणाविले मजला डोळ्यांनी शालिन नजरा झुकल्या,उठल्या अस्फुटशा होकारांनी आसुसलेल्या वक्षांवर किति हात फिरवले आसुसलेले सीत्कारांना कितीक मादक, आत्म्याचे होकार दिलेले नाही पाहिली काळी माती नाही नाती कुठे बांधली घुसवत अन् हल वखवखलेला बेदरकारी बिजे उधळली आता बघतो चौरस गोंडस कुटुम्बलेले कितीक, छोट्या दो चिमण्यांना कडी घेउनी शिस्तित चालत रेषा कोत्या इंग्लिश मिडियम फॉरिन वारी खुराक अन् बी कॉम्प्लेक्सचे फेसबुकावर पडती फोटो भरतनाट्यचे अन मुंजीचे गोजिरवाणी स्वप्ने माझी घरंदाज पण बिना वारशी वणवण फिरती अर्धनागडी खुरटी रोगट आणि उपाशी रोध बरा सृजनाला अंध्या "दो ही बस" स्वप्नांची धुंदी भाग्य नसे जर षंढत्वाचे करून घ्यावी हो नसबंदी

वाचन 3650 प्रतिक्रिया 0