मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताळेबंद

सुचेता · · जे न देखे रवी...
चालले मी परी विखुरल्यात इतस्ततः जाणीवभर लहानथोर माझ्या खुणा पदोपदी जाणवताना मिळेल आठवांना उजाळा शब्द - नात्या विरहीत आपला भावबंध आगळा नसणारे मी, एक शाश्वतय, मान्यय मला मनातला ठाव माझा अशाश्वत ठरणार का ? होते खरच ना मी इथलाच भाग अविभाज्य ? पानगळीइतकचं शुल्ल्क होतं माझं अस्तित्व ? आजर्पंतच्या असण्यावर प्रश्नचिन्ह उमट्लेलं जमाखर्चाच शेवटचं पान ताळेबंद विसरलेलं

वाचने 837 वाचनखूण प्रतिक्रिया 1