हास्य
हेज्यायची कटकट...
बर्याच दिवसांनी काल माझी जात आठवली होती
सहज बोलता बोलता कोणीतरी तिची आठव काढली होती
आमची जात लागत नाही प्रवेशाला, फी माफीला की आंदोलनवाल्यांना
पैसा बक्कळ पडलाय, कोण विचारतोय आम्हा ओपनवाल्यांना
नाही, मान्य की देशाच्या गरीब जनतेचा उत्कर्ष झाला पाहिजे
पण मग आमच्याच शिटातला का बरं सगळ्यांना वाटा पाहिजे
आमचे शेजारचे सूचीतले गेल्याच महिन्यात फॉरेन ट्रीपवरून आले
पोराला फार शीण झालेला परीक्षेचा, त्याने चांगले ९०% की हो काढले
त्यांच्या सुपुत्राला मुंबईबाहेरील जागा नको होती म्हणून आग्रह धरला
आणि आरक्षण कोट्यातील जागेसाठी त्याने आपला फॉर्म भरला
आम्ही म्हटलं द्या ना काका सोडून ही जागा एखाद्या गरीबास
तंबाखू
०===तंबाखू===०
ओठ बरेचदा बदलतो
पण तंबाखू सुटत नाही
डावीकडचा फाटलाय
हे,उजवीकडच्याला पटत नाही
तोंडही जुन्या चाळीसारखं
तंबाखू म्हणजे बिह्राडकरु
ओठांसारख्या मोकळ्या खोल्या
ईकडे भरु का तिकडे भरु?
भाडेकरुंचं प्रेमही अजीब..
रहायला चालते कुठचीही खोली
एकीकडचा उडाला चुना..
की लगेच दुसरीकडे रहायची बोली
दारुवाल्यांना म्हणतात तळिराम
त्यांचा सगळा साजच मोठा..
आंम्हालाही म्हणावं मळिराम
आमचा तर फक्त कार्यक्रमच छोटा
आंम्हा दोघांची एकच गल्ली
त्यांना झाकुन आंम्हाला काढा
त्यांचा आहे एक्सप्रेस हायवे
आंम्ही पितो लोणावळ्यात सोडा
रस्ता वेगव
काव्यरस
यम बोलला वडाला
यम बोलला वडाला
वटपौर्णिमेच्या भल्या सकाळी
बायकांच्या आधी यमच आलेला पाहून
वडाला विस्मय वाटला.
पानांची सळसळ करत बोलला यमाला
काय रे यमा, कलियुगात
सत्यवान शोधतो आहेस का सावित्री?
यम लाजत लाजत बोलला
मला वटसावित्रीचं व्रत बघायचं आहे.
वड त्राग्याने म्हणाला,
बाबारे, आजचा एकच दिवस माझ्या धंद्याचा
तू इथे बसलास तर बायका आणि भटजी
कशाला येतील इथे?
यम बोलला वडाला
पूजा तर बघेनच आणि
फांदीही दे एक मला.
वड खो खो हसत म्हणाला,
तू फांदी घेऊन करणार काय?
तुला नवरा म्हणून मागणारी आहे तरी कोण?
यम बोलला...
काव्यरस
(रेडा म्हणे वडाला)
आमची प्रेरणा
रेडा म्हणे वडाला "भलताच जाच आहे
दोरे बरे अरे हा यमराज त्रास आहे.
ने-आण मी करावी, यमभार मी वहावा
तरी मजसी तो म्हणे की, "तू बावळाच आहे!"
ना इंक्रिमेंट काही, ना सुट्टी घे कधी जो
ऐसा गुलाम त्याला नेहमी हवाच आहे.
जातो आता निघोनि धाडून मेल त्याला
कैसे हरेल प्राण ? मग कोण भार वाहे ?
वैविध्य वाहनाचे त्या पाहूदेच आता
सांगेन जॉब माझा हा सातवाच आहे."
बघा जमलंय का ते !!
अवांतरः त्या 'सातवाच आहे' ला काही धक्का लावावासा वाटतच नाही, ते समस्यापूर्ती साठी दिल्यासारखं वाटतं. ;)
लेखक बोलला..
आमची प्रेरणा - http://misalpav.com/node/18275 -- वड बोलला यमाला
लेखक बोलला संपादकाला ' हा काय पेच आहे ?'
उडवावयला धागा का मी एकटाच दोड्का आहे ?
धागा इथे काढावा, खरडी जरा कराव्या
वाचकांस त्या म्हणावे ' मी पण नवाच आहे'
जो आय्डि कंपुबाजी करण्यास वापरावा
ऐसा अजुन एक डुआय्डि हवाच आहे
प्रतिसाद,खरडी अन व्यनि फक्त ज्येष्ठां
वाचने फक्त माझी, हा शुद्ध जाच आहे
अमरता अन अभय मिळु दे मम धाग्यास आता
मगच सांगेन आय्डि हा, माझा सातवाच आहे
५० फक्त
ही इथली एंट्री आहे..(म्हणजे मी इथं तरी नवा आहे)
काव्यरस
(पाव्हनं चला, झाडावरती बसू !)
वेताळणीनं वेताळाला सांगितली गोष्ट अन मग आमीबी म्हनलं जरा गुलुगुल बोलूयात पावन्यासंगं..... ;)
वाद असे बहरात वाचका, तुम्ही नका ना रुसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
बघा थेरडा मेला 'घोडा'
शिव्या हासडून मारा जोडा
लाज संस्कृती सारी सोडा
उगा वाटतं खूप लिहावं
नकाच काही पुसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
काढिल खोडी नव्या दमाच्या
पुचाट गप्पा स्वातंत्र्याच्या
स्टोरी सांगिल वेताळाची
जरा मोकळ्या ह्या जालावर
खविस नागरी हसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
तीन गटांची थेरी मांडा
जुन्या दुव्यांची घेउन खांदा
हलक्या हाताने काड्या घाला
अता खातरी ही शतकाची
पब्लिक लागं फसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
-केसुरंगा
काव्यरस
वड बोलला यमाला
वटपूजेनिमित्त आमच्या वडाच्या भावना व्यक्त करायचा हा प्रयत्न!
वड बोलला यमाला, "हा काय जाच आहे?
बांधून घ्यायला का मी एकटाच आहे?
पूजा इथे करावी, त्रागा घरी करावा
नवर्यास त्या म्हणावे, "तू बावळाच आहे!"
हा जन्म 'जी हुजूरी' करण्यात घालवी जो,
ऐसा गुलाम साती जन्मी हवाच आहे?
आंबे, फळे, सुपार्या अन् दक्षिणा भटाला,
दोरेच फक्त माझे? ही शुद्ध लाच आहे!
वैविध्य पाहु दे ना दोन्ही गटांस आता
सांगेन जन्म त्यांचा हा सातवाच आहे!"
काव्यरस
घेऊ कसा उखाणा (तिकडम)
तिकडम
सगळे जण आग्रह करतात
लवकर नाव घ्याना
तोंडात लाडुचा बकाणा
घेऊ कसा उखाणा?
.
,
.
.
शिकावू डेंटीस्टने- ढिली बनवली कवळी
दात वाजती टणाणा
मधे अडकून जीभ- करतेय नुस्ता ठणाणा
घेऊ कसा उखाणा?
.
.
.
.
पहिल्यांदा पडली टाळी, दुसऱ्याचा झाला हशा
तिसरा सपशेल उताणा
चौथ्याचा जिकर केला, तर लोक म्हणले हाणा
घेऊ कसा उखाणा?
..........................................................
काव्यरस
मुन्नी बदनाम हुई
मुन्नी बदनाम हुई
रंग काळा बाबाच्या दाढीचा
रंग खाकी पोलिसांच्या सदर्याचा
रंग भगवा बाबाच्या लंगोटचा
रंग हिरवा गांधीबाबाच्या नोटेचा
रंग सावळा त्या रात्रीचा
रंग पिवळा 'सोनिया' काविळीचा
रंग लाल डोक्यावरच्या जखमेचा
रंग निळा पाठीवरल्या वळेचा
रंगात सार्या रंगुनी रात्र होई सुन्नी*
बिचारा बाबा ! दुपट्ट्यात झाला मुन्नी
* सुन्नी म्हणजे सुनी
काव्यरस
मिसळपाव