Skip to main content

हास्य

कधीकाळी झालेल्या कविता

लेखक यकु यांनी शुक्रवार, 23/12/2011 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकाळी झालेल्या कविता (1) वेळही अशी ती होती उगवती न फटफटलेली पक्षीही तुरळक जागे नुकतेच जरा फडफडले माणसे होऊन जागी चालली खाया वारा या शांत पहाट वेळी ती मला भेटते म्हटली आलीच पहा ती आली येताच तिला ओळखले मी मनात माझ्‍या गुपचूप सांगूच नको मी म्हटले ती बसली अगदी चुपचूप अशी दोघे गुपचूप बसता बोलणे खुंटले अ‍गदी पण बोलून काही ना येता ती कसली भेट म्हणावी सावरुन मी हे वदलो डोळ्यात तुला साठवण्‍या मी रात्र-पहाट ही केली पाहून घेऊ दे आता तुज सुंदर शांत सकाळी ते वस्त्र रंग गुलाबी मुखचंद्र अनावरण करता ह्रदयास हुडहूडी भरली नजरेस तिच्या त्या वरता बोलास काही ना सुचले ते मूक-मूक गल

(ऐल-पैल)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 15/12/2011 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिथयश कवयित्री क्रांतीतैंचं अप्रतिम काव्य 'ऐल-पैल' वाचलं आणि मी सैरभैर झालो! मग काय आपोआप दाद निघालीच मनातून! ईर्शाद!! ऐल मळे पैल खळे भेटू मी कुठे, ना कळे टाकता पाऊल वळे बापूस माघारी! ऐल दिवा पैल वात भेट नाही पंध्रवड्यात आहे काळोख घरात खवीस दारी! ऐल साद पैल जाई चिंच फोक चोप देई ओरडा घुमत जाई भर बाजारी! ऐल 'चंद्रा' पैल 'निशा' अभिलाषा दशदिशा धुमसतात वेड्यापिशा पेटल्या सिगारी! ऐल जान पैल सखी बाप 'गाजरपारखी' दमदाटी हो सारखी 'वळ' 'माघारी'! ऐलपैलाच्याही पार तुझ्या परसाचे दार त्याच्या पायरीशी प्यार दे गं दुपारी! -चतुरंग
काव्यरस

(काय साला त्रास आहे!)

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 15/12/2011 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : - अर्थात हीच! मिसळलेला काव्यप्रेमी यांनी ह. घ्यावं. मूळ कविता फारच सुंदर आहे. तिला मी दिलेली दाद समजावी. :) भर दुपारी चाललेला गायनाचा तास आहे सांग कैसी काढु डुलकी, ताप हा डोक्यास आहे झोप येता धावली ती बावळी कार्टीं तुझी गं सोड तू छंदास या, हा मद्गळ्यासी फास आहे तान लावोनि भसाडी, रेडक्याला साजिरीशी गंध नाही त्या सुरांचा.. च्यायला!

तंत्टामुक्त गाव

लेखक उमेश कुचेकर यांनी सोमवार, 12/12/2011 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
तंटामुक्त गावाची घोषना राज्यात आली गल्लीपासून दिल्लीपर्यंत पळापळ सर्वांची झाली. अहिंसेच्या पुजा-याचे नाव योजनेला दिले महात्मागांघीच्या नावासाठी सारेजण हपापले. सभा सा-या गावाची चावडीवर जमली, योजनेची महिती सर्वाना दिली. पोलीस स्टेशन, पोलीस पाटील खबर सा-यांना दिली, तक्रार कुणाची नोंदवायची नाही तंबी सर्वांना दिली. बांधाचा असो, चा-याचा असो, भावबंदकीचा असो वा वाटणीचा असो, नवराबायकोचा असो वा सासू-सुनांचा असो, भावाभावांचा असो वा जावाजावांचा असो, तंटा कुणी नोंदवायचा नाही, आपआपसात मिटवायचा, घरचाच वाद पोलीसात कशाला न्यायचा. न्यायनिवाडा करुया आपण, आपणच निवडू पंच
काव्यरस

गरीब बिचार्‍या, दम खा

लेखक धनंजय यांनी सोमवार, 05/12/2011 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
गरीब बिचार्‍या, दम खा
गरीब बिचारा शोधतोय तो सायबिणीचे पडके घर - मी म्हणतो, "विचार, जवळ चांगला बार असला तर..." . बुरसट चिरे न्हाते-धूते अश्रू भले सुकवू नको कुळाचारांस आसूसले भाव भले आटवू नको . म्हटले कोणी : "रिबेलो मूळचे अहो, त्या वाडीचे" पात्रांव, छ्या!
काव्यरस

मीही हलवाई होणार

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 03/12/2011 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: मीही कवि होणार. अलिकडे 'आव आव, झटपट जिलब्या पाडके हलवाई बन जाव' असली काही मोहीम चालू असलेली दिसते. इथं असं नव्हे एकूणच सगळीकडे. तेंव्हा म्हटलं त्याच भूमिकेत शिरून त्याच भूमिकेचा जरा समाचार घ्यावा! हे अतिटुकार विडंबन करताना स्पा यांची खूपच मदत झाली त्यांचे आभार. डिस्क्लेमरः खालील कविता पूर्णपणे काल्पनिक असून श्री मेवे यांच्या कवितेचे विडंबन आहे.
काव्यरस

एकदा वाटलं कविता करावी...

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 01/12/2011 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा वाटलं कविता करावी... सोप्पं तर असतं.. 'र' ला 'र' आणी 'ट' ला 'ट', त्यात काय एवढं... जमेल की आपल्यालाही एवढे काय आपण 'हे' आहोत... थोडे छान, थोडे दुर्बोध, थोड रुपकात्मक,थोडे तरल, काही मात्र अगदीच वास्तव लिहू आपण चार शब्द... मात्रा देखील जमतीलच की, वृत्त थोडी अडखळ्तील ही, कवयत्रिचे देउन नाव, निभावून ही जाईलच की... मग वाटले नको असे, मग वाटले नकोच ते, मिळेल फटका, होईलही कौतुक, पण कशाला हवे जोडायला आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना..... ( इतरत्र पूर्वप्रकाशित)
काव्यरस

(भाव(खावू)गीत):फेसबुकमुळे

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 28/11/2011 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
(भाव(खावू)गीत):फेसबुकमुळे
तो: जग हे आभासी कोणा न कळे ती: (हो रे, ते खरे, पण) तु अन मी जवळी आलो फेसबूकमुळे ||धृ|| तो: तुझा आयडी होता आयडी हा खरा ती: तुझ्याच आयडीमुळे तुला शोधीला मी बरा तो: होताच लॉगलाईन तेथे प्रित आपली जुळे ||१|| तो: आठव पोस्टला माझ्या केलेस तू लाईक ती: त्यानंतर आपण कितीक फिरवीली बाईक तो: फोटो तुझा आता डिलीट करून टाक गडे ||२|| ती: नकोच फेक आयडी आता नवे नवे ते करणे तो: नकोच तसलेच फोटो पाहून उगाचच झुरणे ती: दोन आयडी नको आता एकच आयडी पुरे ||३|| ती: होईल रे आता स्टेटस अपडेट एकदा तो: नकोच
काव्यरस

( चापट गालाले लागते )

लेखक जीएस यांनी शनिवार, 26/11/2011 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
या कवितेचा वस्तुस्थितीशी काही संबंध आढळल्यास, एकाच नेत्याचे नाव सर्व घोटाळ्यांमधे वारंवार येणे हा जसा, तसाच तो ही एक योगायोगच समजावा. [चाल : "काळ्या मातीत मातीत" या कवितेच्या पहिल्या २ ओळी.] त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते चमचे नाचती थयथय, 'पेपर' ढोल वाजविते त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते साखर स्वस्तात पाठविते, साखर महागात आणिते साखर मध्यात साठविते, साखर तिजोरी भरिते \\१\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत.... प्याकेज कोनाला असते, प्याकेज कोनाला मिलते साहेब 'शहर' बांधिते, साहेब 'धरण' चोरिते \\२\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत.... जमीन कोनाची असते, जमीन
काव्यरस

(हल्ली मी घेतच नाही ...(؟)... )

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 18/11/2011 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
फिझा यांची माफी मागुन त्यांच्या लिहिण्याला ही आमची पोच. हल्ली मी काही घेतच नाही ..(؟)... भांजाळला गाल एकदा पाठीवर उमटले वळ ... आणि निघाली कमरेतुनी कळ त्या कळीची दाहकता कुणा कळतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... घेण्याची कारणे होती हजार चढणार प्रेट्रोल,वाढती महागाई वर तुटपुंजा पगार ... विदेशी 'टाकुन', देशी घेतली तरीसुद्धा ..... कळी माझी खुलतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... नाही नाही म्हणत परत बळेच भरला ग्लास ... पुढ्यातला चखणा आणि माझं मुस्काट यांची सांगड घालणे मला जमलेच नाही .... पण हल्ली मी घेतल्या वाचुन रहातच नाही ...