Skip to main content

हास्य

.टिंब.

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 08/06/2011 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज संध्याकाळी ; टिंब रंगते एक होळी आडरानी पंक्चरणार्‍या टायराची रांगोळी मर्तीकेची गर्दभे येती चढवुनी कैफ गोळी येती सारी येकजात देता एक साधी हाळी चिवडा आणि अंडी उकडली ; फेकूनी द्या ती भाजी पोळी संपवुनी चखणा आणि चोखुनी नळी गडी पहुडले तर्र झोकुनी ; हाती घेवूनी रात्र काजळी उजेड फुटतो भल्या सकाळी आड भिंतीपलीकडे ओकलेली पित्तनळी उभे रहाता पाउले पकडती दिशा वेगवेगळी ओघळे ढेरी खेळती डोळे कोशिंबीर आंधळी बंद पाकीटाला ओढ एक तारखेची आगळी दुर्दम्य घायाळ आशावाद; जात नाही कधी काळी स्पर्श पहिल्या धारेचा ;चमके मुद्रा बावळी घेताना नांदते ओठावरी नवनवी लाखावळी जीवनात रंग भरे सृजनतेची

टू जी

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 06/06/2011 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज-काल मला तुझी 'करुणा' वाटायला लागली आहे... टूजीचा अमंगळ गजर आता पाठलाग करायला लागला आहे... उगाच वोट्स मागायला, कितींदा रे येतोस? डीबीच्या रीआलिटी शो मध्ये बलवा मात्र 'शहीद' होऊन जातो बोलयचं असतं मला, बरच काही नजर सांगून जाते, मिडीयासमोर येताच, का मग माझी कणी मोळी होऊन जाते? 'दया' उरली नाही उरली 'करुणा'ही नाही एअर सेलच्या हवाबंद डब्यात पुरेसा 'निधी' जमला नाही बंधू- भगीनी नकोत मला, भ्रष्टाचारात रमतो मी... म्हणूनच देशप्रेमाच्या भावना स्वस्तातच विकल्यात मी! घोटाळ्यात गुंतून जाण्याचा माझा स्वभाव नाही.. अडकलोच जरी मी सुटण्यास प्रतीबंध नाही
काव्यरस

संपत्या सुटीचे पूर्वरंग

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 23/05/2011 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
या विडंबनाची स्फूर्ती आहे अरूण मनोहरांची ही सुंदर गझल, त्या चांगल्या शब्दांचा 'कच्चा माल' म्हणून वापर केल्याबद्दल क्षमस्व! अताशा असे हे मला काय होते जराशा श्रीखंडाने पँट तंग होते रिचवित आलो सागर आमरसाचे आता पाहून थेंबही मन हे दुभंग होते खूर्चीस पाठी लोटू, चक्क टेबल की हलावे भलतेच जडभारी झाले ते माझेच अंग होते टेकून पाठ थोडी पंखा वरी फिरावा निद्रेत माझिया झणी नुसते तरंग होते स्वप्नात पाहिले, कळले माझे मला की संपत्या सुटीचे ते पूर्वरंग होते
काव्यरस

मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 23/05/2011 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा? खाता नही पिता नही बंद पडलीय त्याची वाचा ||धृ|| अब मै क्या करू उसको? नही डाक्टर दिखानेको तेरे आंगनमे वो जाताय कुकुचकु कुकुचकु वो वरडताय मेरा दानापानी नही उसको भाता अरे मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा? ||१|| देख हळुहळु तो कसा भागताय लई उदास उदास दिखताय चोच उघडी रखके तो बसतोय नही फडफड फडफड करताय अब्बी तुच हैरे बाबा उसका दाता मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
काव्यरस

दोन छोटे

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 22/05/2011 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्या- अताशा असे हे मला काय होते कॅलरि मोजिता रुचीहीन वाटे वर्षे उलटिता चहाची ही गोडी तिच्या हातची ती पळालीच कोठे ........ बाई- अताशा असे हे मला काय होते चहात साखर मी नेमकी विसरते थोडेची हे तोंड खट्टु बनविता कॅलरि घटविण्याचे तट्टु पळविते
काव्यरस

वसंत काव्य मालेत पुष्प गुंफायला निमंत्रण....

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 17/05/2011 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, वसंत बहरला पानोपानी । लाली धरली गुलमोहरांनी ।। कंठ आला कोकिळेला । रुंजलेकवि शब्द गंधाला ।। कविराजांनो अणि राणींनो, आपले वसंत काव्यमालेच्या निमित्ताने काव्यकुसुम कट्टयाकरिता स्वागतम्.... आपणास वसंत काव्य मालेत पुष्प गुंफायला निमंत्रण - Beer आपण फक्त इतकेच करायचे आहे - जसे जमेल तसे, काव्य निर्मित करा - जेणे करून आपला परिचय त्यात

नंदीकाळा-मुळ काव्य>(जग हे बंन्दीशाळा)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 14/05/2011 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन काव्य मायमाऊली मराठीच्या अतीस्वाभिमानी किंवा अंधाभिमानी अपत्यास हे काव्य अर्पण करताना मनाला "दिव्य आनंद" होत आहे.हे सांगणे अगत्याचे वाटते.आयुष्यभर केळ्यांचा आस्वाद न घेता,व्याकरणाचे 'शिक्रण' करुन खाण्यातच यांचा जन्म जायचा...आणी तिथेही 'यांचा' पंक्तीप्रपंच मधे मधे आड यायचा.तेंव्हा या माहाभागांच्यामधुन आपण बाहेर पडावे,आणि जाता जाता एक आहेर,बाहेर पडण्यापुर्वी यांना करावा हे उचित नाही काय? असो...विडंबनाला जुळी भावंडे म्हणता म्हणता,मुळ काव्य-जग हे बंन्दी शाळा-प्रथम अपत्य,बघ हा रंगित चाळा-द्वितीय(किंवा एकमेवाद्वितीय)
काव्यरस

विडंबन-धुंदीशाळा---बघ हा रंगित चाळा.

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 11/05/2011 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन काव्य-(मुळ काव्य-जग हे बंदीशाळा)-"धुंदी-शाळा" कुठल्याही व्यसनाला कोणि'रसं' म्हणावे,कोणि सु(?)रस म्हणावे,कोणि चुरस(?) म्हणावे,तर कोणि निरस म्हणावे...आमचे काव्य या सगळ्यात सरस आहे, असे आमचे अजिबात मत नाही...पण प्रत्येकाला "हे"---म्हणजे काव्य आवडेल असे मात्र वाटते.याविषयी कोणाचे दुमत होणार नाहि,असेही वाटते...कंसात टाकलेले आकडे हे तळटिपांचे आहेत,काव्यात काय किंवा व्यसनात काय?...दोन्हीकडे तळ गाठल्या शिवाय टिपांचा अर्थ कळत नाहि...म्हणुन ईथेही वाचकांनी काव्यापुरता तळ गठावा...हि विनंती... बघ हा रंगित चाळा,बघ हा रंगित चाळा
काव्यरस

पु.ल. आणि अत्रे-एक दर्पण

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 09/05/2011 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या कवितेच वर्गिकरण मि हास्य रसात केलय,पण मुलत: तो असला नसला तरि फारसा फरक पडणार नाहि.कारण हास्यरस हा या दोन माणसान्च्या व्यकक्तित्वाचा अविभाज्य घटक होता.दर्पण हे या कवितेच न्निवळ नाव नसुन तो खरच या कवितेचाहि स्वभावधर्म आहे...हास्यवेदाचार्य-आचार्य अत्रे आणि हास्ययज्ञनारायण-पु.ल.देशपान्डे...यान्ना अर्पण... १)कधि कधि मि पु. ल.न्चा,कधि कधि मि अत्र्यान्चा.प्रश्न उरतो मधे फक्त वेलान्ट्या आणि मात्रान्चा२)पु.ल.म्हणत भगवन्त ना,तो तुमच्या साथ आहे.अत्रे म्हणत भगवन्त ना,तो तुमच्या 'आत' आहे.३) म्हणजे पु.ल न्च खद्य हे,दहि आणि भात होते.
काव्यरस