मीही हलवाई होणार
आमची प्रेरणा: मीही कवि होणार.
अलिकडे 'आव आव, झटपट जिलब्या पाडके हलवाई बन जाव' असली काही मोहीम चालू असलेली दिसते. इथं असं नव्हे एकूणच सगळीकडे. तेंव्हा म्हटलं त्याच भूमिकेत शिरून त्याच भूमिकेचा जरा समाचार घ्यावा!
हे अतिटुकार विडंबन करताना स्पा यांची खूपच मदत झाली त्यांचे आभार.
डिस्क्लेमरः खालील कविता पूर्णपणे काल्पनिक असून श्री मेवे यांच्या कवितेचे विडंबन आहे. काही मिपाकरांच्या लिखाणाशी या कवितेचे काही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा किंवा हे विडंबन सार्वत्रिक असल्याचा पुरावा.
होणार, मीही हलवाई होणार,
लाडू नको मज, नकोत पेढे
सोनपापड्या त्या असतात भलत्या
साच्यामध्ये पीठ भरूनी
जिलब्या मी पाडणार, . मीही हलवाई होणार!
बेसन तेवढे ठाऊक मजला
तितके पुरते हलवाई व्हायला
पीठ मळुनी, बाकिचा
साचा मी भरणार.. मीही हलवाई होणार
जिलेबीबाई हवीच मिठी
पण साखरेच भाव सदाच चित्ती
वर वर जुनाटमेवा पेरून
तुमचे पोट भरणार.. मीही हलवाई होणार!
तुकडा जेव्हा घेतला हाती,
लिबलीबत तो पडता खाली
मठ्ठ्याची वाटी देऊन हाती
तुमच्या गळी उतरवणार, मीही हलवाई होणार!
जिलबीसह जर इम्रती असली,
डब्बल स्वादाची खात्री जाहली
काळ्या कळकट तेलावरती
तळुनी मी घेणार.. मीही हलवाई होणार!
रोज अनेक या फ्रीक्वेन्सीने
जिलब्या पाडीन जलदगतीने
संपलेली ताटे बघुनी
आनंदित मी होणार .. मीही हलवाई होणार!
जिलब्या माझ्या नसतील भारी
लोकांना ना आवडल्या तरी
बेसनाचा मुबलक कच्चा
माल मी पुरविणार.. मीही हलवाई होणार!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
2735
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वावा. वल्लीशेठनी हलवाई
काहीतरी सक्षम उपाय व्हायला
वाहव्वा..असं काही चित्र
लाईक चा बटन ठेवा कि राव ---अजितजी
आवडलं
आज दुपारी वाचली नव्ह्ती ही
जबरा विडंबन !!!
हॅ हॅ भारी विडंबन रे... बाकी
@ स्पा, धन्यवादाबद्दल
In reply to हॅ हॅ भारी विडंबन रे... बाकी by स्पा