मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकदा वाटलं कविता करावी...

प्यारे१ · · जे न देखे रवी...
काव्यरस
एकदा वाटलं कविता करावी... सोप्पं तर असतं.. 'र' ला 'र' आणी 'ट' ला 'ट', त्यात काय एवढं... जमेल की आपल्यालाही एवढे काय आपण 'हे' आहोत... थोडे छान, थोडे दुर्बोध, थोड रुपकात्मक,थोडे तरल, काही मात्र अगदीच वास्तव लिहू आपण चार शब्द... मात्रा देखील जमतीलच की, वृत्त थोडी अडखळ्तील ही, कवयत्रिचे देउन नाव, निभावून ही जाईलच की... मग वाटले नको असे, मग वाटले नकोच ते, मिळेल फटका, होईलही कौतुक, पण कशाला हवे जोडायला आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना..... ( इतरत्र पूर्वप्रकाशित)

वाचने 3089 वाचनखूण प्रतिक्रिया 16

स्पा 01/12/2011 - 12:54
पण कशाला हवे जोडायला आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना..... सहिच

मिसळलेला काव्यप्रेमी 01/12/2011 - 13:48
आजकाल प्यारे पण कविता करायला लागला तर!! असो. ;)

आत्मशून्य 01/12/2011 - 13:50
इथं प्रतिसादच लिहायला नको, सोपाच तर असतो, कोणीही देतो 'फ' ला 'फ' आणी 'फ' ला 'फ', त्यात काय एवढं... देइलच की कोणिही तसेही आपण सगळे 'हे'च आहोत... मग वाटले नको असे, मग वाटले करू तसे, देऊया का फटका ? नको.... त्यापेक्शा करूया कौतुक... मस्त कवीता हो प्यारे१

मेघवेडा 01/12/2011 - 14:48
मस्त! अत्यंत वास्तववादी! :)
पण कशाला हवे जोडायला आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना.....
आज स्वतःला कवी म्हणवून घेणार्‍यांपैकी ८०% लोकांनी असा विचार करून आपलं काव्यमक्षिकाप्रजनन थांबवण्याचं ठरवलं तर मराठी साहित्याचं भविष्य आणखी उज्ज्वल होईल!

In reply to by मेघवेडा

वपाडाव 01/12/2011 - 18:16
आज स्वतःला कवी म्हणवून घेणार्‍यांपैकी ८०% लोकांनी असा विचार करून आपलं काव्यमक्षिकाप्रजनन थांबवण्याचं ठरवलं तर मराठी साहित्याचं भविष्य आणखी उज्ज्वल होईल!
एकदम पर्सनली घेउन एकही कविता न प्रसवण्याचा निर्णय घेतला गेला आहे......
अरे हे पण वाचलेस का http://www.misalpav.com/node/8987 आपल्या मिपाच्या शाहरुख ने लिहीलेले काव्य .. तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !! -- कवी शाहरुख कोनी 'ट' ला 'ट' आनि 'क्ष' ला 'क्ष' जुळिवतंय आनी पब्लिक त्ये आगदी आतून आलंय म्हनतंय आमानी नाय कवा काय आतून आल्यागत वाटनांर तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !! लोकं लिवत्यात कोड्यात अन गाव म्हनतंय भारी आमी मात्र मनात म्हनतुंय हाय काय ही भानगड तिच्यामारी असली आमची भाषा गावंढळ तरी शिंपल शिंपल लिवनार तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !! परत्येक वळीतला काना मात्रा उकार येलांट्या मोजत्यात आनी साळंतल्या बीजगनितावानी बेरीज वजाबाकी करत्यात आसलं काय गनित आमी नाय मांडनार तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !! निम्म्यांच्या कवितेत असत्यात पानं फुलं फळं अन पक्षी आनी राहिलेल्यास्नी दिसतिया ढगांमदी नक्षी चंद्र सूर्य तारे नदी शेप्रेट फ्रेममदी ठेवनार तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !! हाय काय आनी नाय काय म्हननार आनी तिच्यायला आमीबी येक कविता करनार !! -- कवी शाहरुख

प्यारे१ 01/12/2011 - 16:48
खरंतर वपु म्हणालेत तसं दासबोधानंतर कुणी काही लिहायची गरजच नव्हती. प्रचंड प्रतिभावान अनेकानेक कवी आजूबाजूला असताना आणि भूतकाळात होऊन गेलेले असताना उगाच आपल्या खा*पायी खरेच कविता 'पाडत' असतात. (खर्‍या चांगल्या कवी आणि लेखकुंनी ह घ्या ;) ) बाथरुम सिंगर्सनी मी पहा कशी रफी सारखी तान घेऊ शकतो असे म्हणण्यासारखे काहीसे आहे. मार्च २०१० मध्ये अशाच शेजारच्यांच्या कवनकळांमुळं प्रसूत झालेली ही सिझर्ड कविता आहे. http://www.mimarathi.net/node/941 मिपावरच्या भाद्रपद महिन्याच्या (सौजन्य धमु) उन्नतीकाळात आज हे संदर्भ तितकेच लागू पडतात म्हणून इकडं प्रकाशित करावीशी वाटली. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.

पैसा 01/12/2011 - 19:21
प्यारे पण कविता करायला लागला!!! प्रेरणाच भारी आहे.

विदेश 01/12/2011 - 21:49
एकदा तरी कविता करावी वाटली - वाचावीही वाटली, यातच सारे आले .