Skip to main content

हास्य

बंद बनियन बरं-का...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 28/03/2012 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा:- http://www.misalpav.com/node/21151 बंद बनियन आटलेला भायेर येती बेंबी चुन्याची निवळी जणू पिचपिचीत घामाचा हा वास कोंडे आत श्वास फाडावा तो बनियन जीवं-घेणा ढेरं जणू सागर बेंबी उपडी घागर प्यांटही सैलू घालीतसे तिची माझी साथ बनियन मधे प्यांट भायेर येई खास डोकाऊनी (न घातलेली)-टिपः-घट्ट बनियन घालायचा पहिलाच प्रयत्न आहे... उसवले तर शिऊन घ्यावे
काव्यरस

पाटाला भसा भसा पानी

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 18/03/2012 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/21045#comment-381773 समुद्र का विहिर...? बेडकं का खेकडे..? या नस्त्या व्यापाला कटाळुन, जरा नाचगानं करुन शीन घालवावा,,,म्हंन्तो... या मंग करु वाईच डोस्कं ग्गार... (चाल--- पाडाला पिक्कलाय अंबा...) सोडलं हो...आता सोडलं हो...आता सोडलं हो,सोडलं भसाभसा पानी हो...ओ...सोडलं भसाभसा पानी,,,ध--नाजी राव पाटाला भसाभसा पानी ॥धृ॥ धागा ह्यो पडला थंड ,बॉडीत होईल बंड ... ओ धनाजी... थंड कसा पडला जी,,हो ओ,, थंड पडला कसा जी... ओ पाटिल... सोडा ना लवकर पानी... ध--नाजीराव सोडा ना भसाभसा पानी..
काव्यरस

म्याबी कवि होनार

लेखक दादा कोंडके यांनी शनिवार, 17/03/2012 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मिपावर कवितांचा सुकाळ बघून आणि आपल्या शारूकभायच्या ह्या कवितेतून प्रेरणा घेउन. म्याबी कवि होनार कुतून कुतून शबुद पाडनार, रातीला "गंधाळलेली रात्र" म्हननार, दवन्यासारकं कायबाय लिवनार, आन म्याबी कविता करनार... नावावरन बाय हाय आसं भासवनार, मंग पोराटोरानचे परतिसाद येनार, येक काका येउन भांडान करनार, पन म्याबी कविता करनार... कुनीच नाय परतिसाद देलं तरी, बाकीचं कवि 'भारी लिवलय' म्हननार, मंग येक भूत विडांबान पाडनार, आन म्याबी कविता करनार... कायच नाय जमलं तर, येकांदी लावनी लिवनार, नायतर बालगीत लिवनार, पन म्याबी कविता करनार... ट
काव्यरस

एक हिंस्र कविता (?)... (१८+ only)

लेखक अस्वस्थामा यांनी शुक्रवार, 16/03/2012 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
हाणा रे हाणा , या विडंबकांना.. हे चावताती, हळव्या कवींना.. टांगून उलटे, माळावरी अन.. नवकवितांची धुरी द्या हो त्यांना.. जशी कोवळ्या कवितांची, पिसे हे उपटती.. यांच्या बोडक्याचे, केस केस उपटा.. तरीही जर उरले, अतृप्त अस्वस्थ आत्मे, हृद्य गद्य ललितात यांना बुडवून टाका.. (अपूर्ण आणि विस्तारासाठी सर्वाना खुले आवाहन... आणि ह. घ्या. हे सांगणे न लगे.. )

"रागावली ती !"

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 14/03/2012 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना: हे गाणे घ्या तुम्ही गमतीवरी गमतीवरी जी !! ----- का अशी रागावली रागावली रागावली ती ? दूर वर बसला चंद्र चंद्र.. चंद्राचा रंग पंधरा फट्ट ! शुभ्र शुभ्र प्रकाशात .. रात्र मात्र काळीकुट्ट ! का अशी रागावली रागावली रागावली ती ? मुलगी मुलगी गोरी गोरी.. माझे हृदय केले तीने चोरी ! डोळे डोळे भिडले भिडले .. माझे भविष्य अंधारले ! का अशी रागावली रागावली रागावली ती ? हातात पेला, दारूने भरला.. डोळे रडून रडुन ओले ! जीवन एक्काकी , पोरगी आल्ली .. जीवनात मज्जा आली ! प्रेम प्रेम, तुझे-माझे प्रेम.. ओल्या पावसात आपण न्हाऊअ ! जाऊअ जाऊअ आपण जाऊअ .. खंडाळ्याला फिरून येऊअ अ अ ....!! क
काव्यरस

प्रेमात ''हे'' -असच असतं ;-)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 14/03/2012 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/21009# मी आणी ती पोहोत होतो ती आणी मी पोहोत होतो पोहता पोहता येकदम डुबुक :-p होइल असं वाटलच नव्हत खरच पोहोताना हे असच होतं ;-) मी आणी ती लोळत होतो ती आणी मी लोळत होतो लोळता लोळता येकदम बुदुक :-p होइल असं वाटलच नव्हत खर्रच लोळताना---हे--असच होतं ;-) मी तीच्या घरी जायचो ती माझ्या घरी यायची येता जाता एक दिवस तिचा बाप (मला) धरेल असं वाटलंच नव्हतं खरच(?) प्रेमात हे-असच असतं...?
काव्यरस

टुकारघोडे! (हझल)

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 10/03/2012 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
टुकारघोडे! (हझल)

गाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे

कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी
अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

गमावतो ना कधीच संधी सफ़ेद कुत्रा पिसाळलेला
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे
काव्यरस

स्वप्नांस बाप आहे .!

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 08/03/2012 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, ही आमची प्रेरणा misalpav.com/node/20935 अन ही आमची प्रतिभा (इथं आमची आदरार्थी नसुन अनेकवचनी आहे ) अवलीच छंद आहे, स्वप्नाकडे पहाणे.. स्वप्नास बाप आहे, घनदाटशा मिशांचा.. रुतले उरी नि पार्श्वी, ते रात्री मार खाणे. झाला सराव आता, बांबूस सारण्याचा.. स्वप्नास रोग आहे, झोपेत चालण्याचा.. बापास शाप आहे, रात्रीस जागण्याचा.. गेल्या कितीक रात्री, उलटून जागताना. झाला सराव आता, झोपेस टाळण्याचा.. त्या बापसास वाटे, तो यार मीच आहे. स्वप्नास धाक देतो, आवशीस सांगण्याचा.. नजरेतले इशारे, जरि जाणिले तिच्या मी. आहे खडा पहारा, गल्लीत सासर्‍याचा.. गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. तो खास बेत

निवडणुक...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 25/02/2012 05:13 या दिवशी प्रकाशित केले.
सुकलेला का होइना..?पण कुणीसा गाडीला घातला होता गजरा या निमितानी मी माझ्या.. गाडीलाच केला मुजरा काय सालं नशिब हीचं..? पाहिलं तरी फिदा होतात आंम्ही कडक कपडे घालतो तेंव्हा,कोण जाणे या कुठे जातात..? जरी असल्या या आजुबाजुला तरी, नळाला पाणी यावं तश्या बोलतात आल्याच समोर तर नंतर मग, मागे जाऊन कुजबुजतात. ''हँडसम दिसतोय गं...हम्म्म्म, पण कपड्याचा चॉइस बरा नाहीये दिसतोय जॉन अब्राहम सारखा.., पण अ‍ॅटिट्यूट काही खरा नाहीये..'' ''ए,,तुला काय करायचाय अ‍ॅटिट्युट..? नुसतं नाव विचार ना..?'' ''शी...!नाव काय विचारायचं..? त्यापेक्षा डायरेक्ट फोन नंबर घे ना..!'' असे पिछाडीला संवाद घडुन सैन्य
काव्यरस

दमलेल्या ( पृथ्वी ) बाबाची कहाणी

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 20/02/2012 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबापुरी नगरात वर्दी दिली भारी आदर्शचा राजा गेला नांदेडच्या वारी मुंबईतल्या पालिकेवर मारु बघ खेळी तिजोरीच्या चावीसाठी झुलतोमी उरी !! ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना .... मंत्रालयात उशीरा मी असतो बसून भंडावले डोके युत्या - आघाड्या करून तास तास जातो पास टेंडर करुन एक एक मंत्री जातो फाईली ठेऊन अशा वेळी काय सांगू काय काय वाटे यमुनेचे पाणी सर्व चहुकडे दाटे !! ना ना ना ना ना ...
काव्यरस