सुकलेला का होइना..?पण कुणीसा
गाडीला घातला होता गजरा
या निमितानी मी माझ्या..
गाडीलाच केला मुजरा
काय सालं नशिब हीचं..?
पाहिलं तरी फिदा होतात
आंम्ही कडक कपडे घालतो
तेंव्हा,कोण जाणे या कुठे जातात..?
जरी असल्या या आजुबाजुला तरी,
नळाला पाणी यावं तश्या बोलतात
आल्याच समोर तर नंतर मग,
मागे जाऊन कुजबुजतात.
''हँडसम दिसतोय गं...हम्म्म्म,
पण कपड्याचा चॉइस बरा नाहीये
दिसतोय जॉन अब्राहम सारखा..,
पण अॅटिट्यूट काही खरा नाहीये..''
''ए,,तुला काय करायचाय अॅटिट्युट..?
नुसतं नाव विचार ना..?''
''शी...!नाव काय विचारायचं..?
त्यापेक्षा डायरेक्ट फोन नंबर घे ना..!''
असे पिछाडीला संवाद घडुन
सैन्य आघाडीला येतं
आणी.''तुंम्ही काय करता..?'' असं विचारुन,
आल्या पावली निघुन जातं.
मग मला म्हणावं लागतं
आपल्या चेहेर्याचं वय झालय
जे प्रेम गच्चीवर यायचं..,
ते अता गाडीवर आलय..!
वयाबरोबर कळत जातात
प्रेमामधले सावध खेळ
म्हटलयच कुणीतरी..प्रेमाला,
जमला तर चिवडा,नायतर सगळीच भेळ..!
अता त्यांच्याच विचारण्यावर र्हायलो
तर उरलेलं वयही सरेल
इकडे पडत र्हातील कविता
आणी तिकडे गाडीच गजर्यांनी भरेल
त्यामुळे मीही आता स्त्रीपक्षात
जोरदार लॉबींग करणार आहे
यावर्षी काहिही होवो..पण
निवडणुक मात्र जिंकणार आहे.. ;-)
काव्यरस
वाचने
2191
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच
व्वा वल्लीदा जबरदस्त भारी
In reply to मस्तच by प्रचेतस
@अतृप्तीकडून तृप्तीकडे सुरु
In reply to मस्तच by प्रचेतस
तुमची निशाणी काय असणार आहे????
@आणि तुमचे घोषवाक्य काय
In reply to तुमची निशाणी काय असणार आहे???? by लीलाधर
वल्लीबाबा
In reply to @आणि तुमचे घोषवाक्य काय by अत्रुप्त आत्मा
@वल्लीबाबा>>> ह्ही ह्ही ह्हा
In reply to वल्लीबाबा by पक पक पक