मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भावकविता

प्रतिबिंब

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
मेघ सावळा का नभी एकटा? तो वाट प्रियेची बघ, पाहतसे विरह वेळा ही असह्य झाली प्रियेवीण जगणे ते व्यर्थ असे सखी प्रिया तव दूर वसुधा आतुर मिलना मनी कळवळे सरतील कधी, क्षण विरहाचे? नभास वेड्या कधी ना कळे... शल्य त्याचे कुणा ना कळले हलकेच कसे नभ ओघळले? विरह वेदना जळी बुडाली.. प्रतिबिंब नभाचे धरेस भेटले... बघतो आपले प्रतिबिंब जळी दूर उभा तो नभमंडलावरी.., नसेच नशिबी भेट प्रियेची... प्रतिबिंबे भेटती परी ऊरा-ऊरी विशाल... अ फ़ोटो आंतरजालावरून साभार

एक काम करण्याची परवानगी दे फक्त

कहर ·
लेखनविषय:
काव्यरस
रागाने झिडकारशील स्वतःपासून दूर करशील पण एक काम करण्याची परवानगी दे फक्त मी बांधलेल्या मंगळसूत्राची वाटी तुझ्या नकळत गळ्यात होईल पलटी ती सरळ करण्याची परवानगी दे फक्त हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त. केसांच्या बटांची ती रेशीमडोर लटक्याने येईल डोळ्यांसमोर ती मागे सारण्याची परवानगी दे फक्त हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त. घाईत कधी हळूवार फसेल कुठेसा पदर तो सोडवण्याची परवानगी दे फक्त हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त. रात्री एकांती कधी चमकेल वीज दचकून अचानक तुटेल नीज कुशीत घेऊन थोपटण्याची परवानगी दे फक्त हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त. तुजवीन सखे काय ठाव कधी अर्ध्यावर मोडेल डाव आठ

व्यायामी ओव्या

वेल्लाभट ·
ब्लॉग दुवा हा अवघ्या जगाला नको त्याची हाव आरोग्याचा ठाव घेतो कोण ठेविले अनंते तैसे न रहावे नेटके ठेवावे शरीरासी पायात सामर्थ्य हातामधे बळ स्नायूंना हो पीळ असावाच असो जिम किंवा असो खोली छोटी असावी सचोटी व्यायामात कुणी उचलती वजने ही फार संसाराचा भार पुरे कुणा वेल्ला म्हणे जेथे सहा बिस्किटे पहा असे तेथे पहिलवान करावेच अॅब्स भले प्लँक बिंक नेहमीच थिंक पॅाझिटिव्ह करावी न व्यर्थ जनाचिया पर्वा पहा आणि ठरवा आरशात आरोग्यचि एक उद्दिष्ट असावे आपण झटावे त्याच्यासाठी जरी देव पूर्ण करेल कामना संकटी सामना स्वतःचा

आंगणवाडी ते ....

प्रमोद देर्देकर ·
लेखनविषय:
नमोच्या जपाने काँगी हरले, खेळ तोच हो, फक्त खेळाडू बदलले , पल्ला माझा हजार कोटींचा, घेवु द्या ना मोठी उडी, आताशी हडपलेत फक्त २०० कोटी, ही तर नव्हे जगबुडी, वही, पुस्तक,पाटी , पेन्सिल, बाळ गोपाळांच्यात मी रमले, कधी, कुठे, कशी, खायची चिक्की, आंगणवाडीनेच शिकवले, तुझा मोठा घोटाळा की माझा , हे ठरवेल जनता किंवा समिती, तु आधी मी आधी करत, भरुन टाकुया स्वीसची खाती , पापा होते तो कहते , बडा नाम करेगी बेटी मेरी, पण बाबा गेला दुर देशी न ये तो माघारी, जर खाते राहता रिकामे, होऊ कशी मी उतराई, पद उतार होण्याची , मला हो कसली घाई.

पाऊस.... .वेगवेगळा •○●¤°

गोल्या ·
लेखनविषय:
काव्यरस
खेड्यातला जाणता पाऊस जबाबदारीनं गाव रान भिजवणारा, म्हातार्या कोतार्यांची अलाबला नी पिकांची दुवा घेणारा ....!! शहरातला अप टु डेट पाऊस ऑफीस शाळांच्या वेळेत हमखास येणारा नौकरीदारांच्या शिव्या नी पालकांची बोलणी गप गुमानपणे ऐकणारा...!! घाटातला धटिंगन पाऊस निर्वस्त्र, निर्लज्ज कसाही कोसळणारा , धबधब्यांना जागं करून आनंदानं नाचविणारा....!! बागेतला खट्याळ पाऊस रेंगाळलत गुलाबी होवून पडणारा , प्रेमीकांची भिड चेपायला सजल हस्ते मदत करणारा...!! फ्लॅट मधला मुका पाऊस बंद दाराआड गपगुमान पडणारा , रेन रेन गो अवे ऐकुन खिन्नपणे परतणारा ...!! चाळीतला मनमोकळा पाऊस आस्थेने चौकशी करणारा, कांदा

मौनांची भाषांतरे

महासंग्राम ·
काव्यरस
तसा हट्ट नाहिये माझा अगदी तश्याच राहिल्या तरी चालतील मरीन ड्राइव च्या आठवणी, तुझी झालेली पाठवणी माळलेल्या मोगर्‍याचा सुगंध, पहिल्या पावसाचा मृद्गंध सोबतीने काढलेली कुडकुड़ती रात्र, नकळत एकमेकात विरघळलेले अनिमिष नेत्र अगदी अबोल शब्दांची पेरणी पण तशीच राहु दे तसा हट्टच नाहिये माझा फक्त बघ जमलच तर कर मौनांची भाषांतरे #जिप्सी #gypsykavita.blogspot.in

पाऊस .. तेव्हाचा

गोल्या ·
लेखनविषय:
काव्यरस
खर्‍याखुर्‍या प्रेमासारखा पाऊस तेव्हा दाटायचा बरोब्बर सात जूनला येवून तो भेटायचा....!! अडचणी होत्या चिकार सर्व दूर करायचा, मन हुरहुरलं की हात तो धरायचा ....!! तेव्हाचा पाऊस खरा खरा पाऊस वाटायचा, प्रत्येकाच्या आठवांत घर तो थाटायचा ....!! लहान, थोर, वडीलधारे आदर तो राखायचा, सार्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद तो माखायचा....!! रसायन, फवारे वगैरे लाडावलेला नसायचा, येरे येरे पावसाच्या गाण्यालाही फसायचा....!!!!

जन्म घेतला तेव्हाच....!!

गोल्या ·
लेखनविषय:
काव्यरस
जन्म घेतला तेव्हाचं खोदून कबर आलो औपचार म्हणून आयुष्य घालवीत होतो आलो त्याच्या कडून जायचे त्याच्याच पाशी प्याला जीवनाचा घोट घोट संपवित होतो परत करावयाचा उसना देहाचा अंगरखा हा मिजाशीने त्याला म्हणुन वागवीत होतो पुरी होती करावयाची कहाणी जिंदगी ची आयुष्याची कोरी पाने मी जगुनी भरवीत होतो उभ्या आडव्या धाग्यातून निसटणार शिताफिने नाती स्नेहाची मी वृथा गुंतवित होतो होता सोडायचाच मंच दुनियेचा तोंड रंगुवुनी पात्र मात्र वठवित होतो!! ------------------------------------- धागा संपादित केला आहे.

मित्रवेडा

विनीत संखे ·
कॅंटिनच्या चहाचा उग्र दर्प चहावाढपी चंदूच्या नवनव्या हेयरस्टाईल्स. थंड चहाने उघडलेली शिव्यांची लाखोली ॠषभच्या असायन्मेण्ट्स अन पसरलेल्या फाईल्स. डोळे बंद करायचे, सारं लख्ख पाहायचं अन तंद्री भंग होता होत नाही पुढ्यातल्या चहा अन कॉम्प्यूटरच्या फाईल्सना मित्रांच्या आठवणींचा कुठलाच रंग येत नाही.