Skip to main content

बिभत्स

महा विडंबन स्पर्धा

लेखक आमोद शिंदे यांनी शनिवार, 21/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एका चर्चेत एक महावाक्य वाचलं आणि लक्षात आलं की हा तर समस्त विडंबकांसाठी अफलातून कच्चा माल आहे. तेव्हा म्हंटलं आपणंच एक मिपावर छोटीशी स्पर्धा आयोजित करु. युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् || ह्या धाग्यावर जो ह्या महावाक्याचे सर्वात दर्जेदार बिडंबन करुन दाखवले त्याला ह्या आठवड्याचा बिडंबक पुरस्कार देण्यासाठी मी स्वतः सरपंचाकडे शिफारस करेन. तर लोकहो येउद्यात एक से एक विडंबने.

ताप

लेखक मितभाषी यांनी रविवार, 01/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला वाजते का थंडी. आणि कळपाची भीती. का भरलाय तुम्हाला ताप. तोंड दाबुन बुक्क्याचा मार. शब्दांना नसते दु:ख. फक्त ओझे वाहणारे आपण. सवत आनली म्हणे. ग्यानबाची बायको हरवली. आता जास्त विचारत नाही. कारण तुमच्याकडे उत्तर नाही. राम रावण युध्द होणार अनिरुध्द मिशा पिळणार मी झाडावर लपणार ।। निश्चित ।। ही कविता संपादकांना अडचणीत तर नाही ना आणनार?????????? . . . कविवर्य भावसार.

मिपामिपा खेळणार

लेखक सहज यांनी गुरुवार, 17/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा, डिस्क्लेमर, आवाहन, माफी - संपादकांना वाटल्यास धागा उडवू शकतात, मी उडाल्याची तक्रार अथवा निषेध करणार नाही. धागा निखळ करमणुकीसाठी आहे कृपया हलके घ्या. प्रतिसादातुन कवितेत बिन्धास्त भर घाला ही मिपाकरांची कविता आहे.
काव्यरस

(भांडणशब्द २)

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 20/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा शुचि यांची सुंदर कविता चांदणशब्द, व नामप्रेरणा ३_१४_अदिती यांची (न कळलेली) भांडणशब्द. शुचिंच्या शृंगारिक कवितेचं समाजात दिसणाऱ्या झुंडशाहीच्या संदर्भातल्या कवितेत रूपांतर करायला मजा आली. भांडणशब्द प्रक्षुब्ध वाणी॥१॥ नग्न प्रतीके ठायीठायी॥२॥ स्नायुप्रतापी टवाळभाषा॥३॥ गरम माथा केविल चडफड॥४॥ शब्द प्रसूती हीन व हिणकस॥५॥ उसना आवेश व्यर्थ हि धडपड॥६॥ कोण त्रुटीचे कांपेन्सेशन?॥७॥ 'सही' विडंबना- सही विटंबन||८||
काव्यरस

(आज अचानक गाठ पडे)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 15/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळी सक्काळी ग्रासस्टांझाजचे अफलातून इडंबन, त्यावरच्या मुसुंच्या एक्सपर्ट कमेंट्स आणि मग मिभोकाकांचे नाडी शब्द न आणता करायच्या विडंबनाचे आव्हान असा तीनकलमी मसुदा पुढे असल्यावर देरी किस बात की?
काव्यरस

फर्निचर

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 17/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ईंटरनेटच्या जाळ्यात मुली शोधीत असता चॅटींगच्या सेशनात एकमेका अजमावता कुणी एक घराविषयी विचारत होती सगळे म्हणाली जुने फ़र्निचर आहे तुम्ही ठेवले? म्हटले अग सारे नवीनच घेतले लग्नाच्या तयारीनेच प्लॅन केले तशी म्हणाली ओ गॉश! विकत मिळणाऱ्या नव्हे आधीच्याच जुन्या फ़र्निचरचे विचारते मी आहे अग आमच्याकडे जुने सामान नाही जुने ठेवायला येवढी जागाही नाही तशी म्हणाली हे ऐकून बरे वाटले आपले मत ह्या बाबतीत बरोबर जुळले लग्नानंतर जागेची मला गरज भासणार सांग तू केव्हा आईबाबांना बाहेर पाठवणार? जुने फ़र्निचर!!!

(काढदिवस)

लेखक टारझन यांनी बुधवार, 16/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
काढ दिवस ... काढ दिवस (कोरस) हे रोजचेच झुरणे, सोसण्यात वेळ गेला फ्लॅट हर विकेंडला शोधण्यात वेळ गेला ||१|| (कोरस) जमवु किती किती मी, वाचवू किती किती मी दमडीस दमडी जोडण्यात वेळ गेला ||२|| (कोरस) प्रेस नसता कपडे , संपला टुथपेस्ट ही गार पाण्याने अंघोळ करण्यात वेळ गेला ||३|| (कोरस) अजमावुनी मेसची चपाती चावताना जबड्यास वात का आला? गिळण्यात वेळ गेला ||४|| (कोरस) मासिक बजेट बसवताना, हळूच जॉब शोधताना दहा तारखेलाच मंथ एंड कशी बघण्यात वेळ गेला ||५|| म्हणे काढ दिवस येतात तसे , जमव येक्स्पिरेंस पाठीशी .. जय जय म्हाराष्ट्र म्हणे टारू बाळा ||शरदिनी||
काव्यरस

(ते जीवच वेडे होते)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 04/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती ताईंची सुंदर गझल ते जीवच वेडे होते वाचुन आणि वर्षअखेर जवळ आल्याने नेहमीप्रमाणे अ‍ॅप्रायझल आठवलं : 8} ~X( असो.. ते जीवच वेडे होते, जुंपुन काम करणारे टेचात पुढे ते येती, मागे पुढे करणारे त्यांच्या न्यायाचा डंका, उंदरास मांजर साक्षी! मागावुन प्रमोशन घेती, काहिच न करणारे आपलेच आपण गाती पोवाडे मर्दुमकीचे, म्यनेजर म्हणवती स्वतःला, 'काडि'चे न कळणारे माहित जरी वरवरचे, आतून रिकामी घोडी, ते देखावे बघणारे, हे देखावे करणारे! नेहमीच पैदा करती, मुद्दाम पंक्ती घोळांच्या अन् पाठ थोपटुन घेती, "आम्हीच घोळ निस्तरणारे!" सुंदर रिसोर्
काव्यरस

इलिनॉईच्या दुगाण्या

लेखक शरदिनी यांनी गुरुवार, 19/11/2009 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित झरणी बोधित करणी मेलामेली भर्तृहरी अमर्त्य सेना वसंतसेना सेनासमथिंग कलहारी तूच सहारा... तूच सहारा रखरखीत या गूगल संकटनेवारी संतसंतिणी , मुग्ध हिरॉईनी उपग्रहाचा त्वरितध्वनी शरीरबांधणी भेटीगाठी रिचर्ड बेकहॅम चपळ त्रिपाठी ओहो राहुल आहा राहुल ब्रायन लारा दत्ता भट ब्रायन लारा दत्ता भट
काव्यरस