Skip to main content

अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे

लेखक साहना यांनी रविवार, 18/09/2016 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले. खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते. विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर. . . . img

वाचने 219366
प्रतिक्रिया 456

प्रतिक्रिया

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रकाश घाटपांडे, बराच अर्थ आहे. वृत्तपत्रांनी बातमी दाबली म्हणून सत्य लपणारे थोडंच? वर्षानुवर्षे धर्मादाय आयुक्तांकडे विवरणपत्र भरलेच नाही. याला तांत्रिक अनियमितता म्हणंत नाहीत. फ्रॉड म्हणतात. तर लोकांचा विश्वास उडणारच ना? समाजप्रबोधन करण्यासाठी फ्रॉडची काय गरज? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वृत्तपत्रांनी बातमी दाबली म्हणून सत्य लपणारे थोडंच?
सगळा मिडिया कसा मॅनेज होईल? तथ्य असते तर मिडियाला सनसनाटी बातमी हवीच असते. ते मागे लागले असते. अण्णांच्या संस्थांवर पण असे आरोप झाले. आता तांत्रिक बाब हा तात्विक दृष्ट्या भ्रष्टाचार असतो.पण गौण. सबब या मुद्दयात फारसा अर्थ नाही

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रकाश घाटपांडे, सगळा मीडिया म्यानेज करणं आवघड आहे हे मान्य. दाभोलकरांचा उदोउदो करण्यात सगळी माध्यमे गर्क होती तरी सनातन प्रभात वृत्तपत्राने सत्याला वाचा फोडलीच. अर्थात केवळ मीडिया म्यानेज करूनही भागंत नाही. भुजबळांच्या व्यवहारांवर माध्यमांतून काहीच भाष्य झालं नव्हतं. बरोब्बर माध्यमांना खिशात घातलं होतं. तरीही आज ते अडकलेच. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मग तुम्ही म्हणता त्यात सत्य असेल तर उद्या हेही अडकतील. मुक्ता दाभोलकर ने आपण केस दाखल करु शकता असे सनातनवाल्यांना जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे. जी काही परदेशी आर्थिक मदत घेतली असेल तर ती कायद्याची परिपुर्ती करुन घेतली आहे असे तिने सांगितले आहे अनेकांना दाभोलकरांची मते मान्य नाहीत पण त्यांच्या प्रामाणिकपणाबद्द्ल वा हेतु बद्द्ल शंका नाही.

In reply to by गामा पैलवान

थोरले दाभोलकर फ्रॉड होते/आहेत. त्यांचे साधना आणि परिवर्तन हे न्यासदेखील गैरव्यवहारात आकंठ बुडालेले आहेत.
त्यांचे हे गैरव्यवहार जगासमोर आणण्याच्या दिशेने कारवाई का केली नाही कुणी? एका अतिशय हास्यास्पद विचारसरणी असलेल्या संस्थेने आपल्या ब्लॉगवर चार शब्द खरडण्यापलीकडे काहीच कसे झाले नाही यावर? हमिद दाभोलकरांचे विधान अतिशय चुकीचे आहे यात शंका नाही. मात्र तो धागा पकडून विवेकवादाच्या चळवळीतील एका दिवंगत सच्च्या कार्यकर्त्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार हा प्रकार चांगला नव्हे.

In reply to by गामा पैलवान

ह्या आरोपांबद्दल तुम्ही एक तरी पुरावा देणार आहात का? माहिती अधिकार वगैरे वापरुन मिळालेली माहिती वगैरे काही आपल्याकडे आहे का? जर नसेल तर तुमच्या विधानांवर विश्वास केवळ सनातन प्रभात ने छापले एवढ्या मर्यादीत पुराव्यांवर ठेवायचा का?

कुर्बानी आणि बळी देणे दोन्ही एकाच पातळीवरच्या अंधश्रद्धा आहेत. कुर्बानीविरुद्ध अंनिसकडू अजून लक्षवेधी काम झालेले नाही हे मान्य करायला काहीच हरकत नव्हती. मांडलेला मुद्दा कुरापत काढायला असो वा खरच निर्मूलन व्हावे या इच्छेने असो , हमीद यांची प्रतिक्रीया मुद्द्यावर असायला हवी होती. कुर्बानीमागचा भावार्थवगैरे जरा अतिच झालं. नरेन्द्र दाभोलकरांइतके संयमित भाष्य करणे हमीद / मुक्ता यांना तेवढेसे जमत नाही. अविनाश पाटील खरतर अध्यक्ष आहेत त्यांना प्रतिक्रीया वगैरे देताना जास्त ऐकलेले नाही केवळ कुरापत काढण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य केल्याने मुद्द्याला पाठीशी घातले असेच वाटणार. अशाने कुरापत काढणारे (फोटोशॉप मधे जास्त लाल रंगाने रंगवून रस्त्यावर रक्ताच्या नद्या दाखवणारे) आणखी फोफावणार.

In reply to by बाळ सप्रे

फोटोशॉप मधे जास्त लाल रंगाने रंगवून रस्त्यावर रक्ताच्या नद्या दाखवणारे म्हणजे अशा लाल रक्ताच्या नद्या वाहिल्याच नव्हता, व कुणीतरी हे फक्त कुरापत काढण्यासाठी प्रसवलेले आहे, असे तुमचे म्हणणे आहे. हे नक्की कुणी केले आहे, माहिती नाही. पण 'लिबरल', डावीकडे झुकलेला गार्डियन त्यात असेल असे मला वाटले नव्हते! तुमची माहिती माझ्या अल्प माहितीपेक्षा अधिक आहे, असे दिसते!

In reply to by प्रदीप

फेसबुक्/व्हॉट्सॅपवर फिरतायत त्या फोटोंची रंगवलेली आणि बिन रंगवलेली व्हर्शन्स आंतरजालावर उपलब्ध आहेत. शोधुन पहा. देवाच्या नावावर कत्तल चूकच, पण अतिरंजित चित्रं /मजकूर वापरून भावना भडकवणेही चूक..

In reply to by बाळ सप्रे

ही स्टॅंडर्ड पद्धत आहे. खरे फोटो/व्हिडो जर आपल्याला डॅमेजिंग असतील तर मुद्दाम एकदोन डॉक्टर्ड वर्जन्स फिरवायची. मग आपणच आरडा-ओरडा सुरू करायचा की हे बघा लोक कसे खोटे फटू पसरवतायत. मग जे खरे फोटो असतात त्याबद्दल देखील संशय निर्माण होतो. JNU प्रकरणातदेखील हेच झालं होतं. दोन-तीन खरे व्हिडो फिरत असताना एक खोटा व्हिडो देखील फिरवला होता. मग आरडाओरडा सुरू झाला की जे व्हिडो फिरतायत ते खोटे आहेत.

In reply to by बाळ सप्रे

मला फेबु व व्हॉट्सअ‍ॅपवर काय फिरते आहे, ते शोधुन पहाण्यची काय जरूर आहे? मुळात तसे रक्तरंजित पाणी वाहत होते हे (दस्तुर्खुद्द 'गार्डियन' म्हणाते आहे, तेव्हा) कुणी नाकबूल करू शकत नाही. ते सगळे तसे काही नव्हतेच, आणि मुद्द्दाम कुणीतरी ते कुरापत काढण्याकरता निर्माण केले आहे, हे खरे नव्हे.

In reply to by प्रदीप

सोशल मीडियावर फिरणे हीदेखील कुरापत असू शकते, ;) हे काही पहिल्यांदा घडत नसेल किंवा यापेक्षा जास्त रक्त भारतातल्या कत्तलखान्यात -जयांचे मालक हिंदू आहेत- वाहत असेल रोज. अर्थात, माझे कुठल्याच बळी प्रकाराला दुरुनही समर्थन नाही. खाणाऱ्याला खाऊ द्या, बळी देणाऱ्यांचे प्रबोधन करा..

In reply to by संदीप डांगे

भारतातल्या कत्तलखान्यात -जयांचे मालक हिंदू आहेत- वाहत असेल रोज. कत्तलखान्यांत काय होते मला माहिती नाही. पण नेपाळमधे तेथील हिंदूंनी गेल्या वर्षी एक सण साजरा केला, त्यातही हजारो बकर्‍यांचा बळी देण्यात आला असे वाचनात आले होते. तेही ह्या घटनेइतकेच निषीद्ध आहेच. आणि तेही बदलले पाहिजे. जे आहे, ते आहे, ते मान्य करून पुढे जाणे उत्तम. तसे काही झालेच नाही, सर्वच अतिरंजित आहे, इत्यादी मखलाशी कुठल्याच घटनेविषयी न करणे हे शहाणपणाचे आहे, नाही?

In reply to by प्रदीप

सोशल मीडियावर फिरणे हीदेखील कुरापत असू शकते, ;) एका बाजूला आपल्याकडील तथाकथित प्रमुख प्रवाही मीडियाने स्वतःची विश्वातार्हता झपाट्याने आता गमावलेली आहे. दुसरीकडे सोशल मीडिया आता सर्वांना उपलब्ध आहे. कोंबडे झाकून उजाडले नाही, असे मानण्याचे दिवस गेले. मूळ चित्रे सोशल मीडियावर फिरणे कुरापत का समजावी?

In reply to by संदीप डांगे

जे काम तथाकथित प्रमुख (mainstream) प्रसारमाध्यमे जाणूनबुजून करीत नाहीत, ते आता, मार्ग उपलब्ध सहजी झाल्याने दुसरे कुणीतरी करणारच.

In reply to by बाळ सप्रे

फोटोशॉप मधे जास्त लाल रंगाने रंगवून रस्त्यावर रक्ताच्या नद्या दाखवणारे
ते फोटो खरे आहेत , नंतर आलेले फोटो ज्यामध्ये लाल कलर न्हवता ते फोटो खोटे म्हणजे फोटोशॉप केलेले आहेत. खालील लिंक पहा. link यामध्ये नमूद केलाय कि , ...But the images weren’t actually photoshopped at all. In fact, the images without the blood were the doctored ones. हि पहा बांगलादेश मधील वर्तमानपत्रातील लिंक , link यामध्ये व्हिडीओ सुद्धा दिलाय तो हि पहा. हि बातमी खरी आहे नंतर आलेले फोटो खोटे होते

बकऱ्यांचा बळी देण्यात निषिद्ध काय आहे हे समजले नाही. नॉनव्हेज खाणेही निषिद्ध मानायचे काय? बांगलादेशातील रक्ताच्या नद्या वगैरेंमुळे हायजिनिक प्रॉब्लेम्स निर्माण होतात हे मान्य. पण गटारी अमावास्येच्या पवित्र तिथीला किती बोकड-कोंबडे कापले आणि किती लिटर दारु विकली गेली याचे आकडे सामनामध्ये दरवर्षी प्रकाशित केले जातात. मग नक्की आक्षेप कशाला घेतलाय ते कळले नाही.

In reply to by संदीप डांगे

बकरीईदलाही खाण्यासाठीच मारतात. गणेशचतुर्थीला मोदक करतात ते देवाच्या नावाखाली केले असले तरी ते खाण्यासाठीच केलेले असतात.

In reply to by आजानुकर्ण

जत्रे मधे बकरी कोंबड कापतात ते देवाच्या नावाने असले तरी ते माणसंच खातात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

फरक आहे थोडा, बकरे सर्व समाज कापतो तर कोंबड्या काही अशिक्षित लोकांपर्यंत उरलं, सुशिक्षित कापत असतील तर माहित नाही,

In reply to by खटपट्या

हिंदुमधली एखादी जात जे कोंबडं बकरे वैगेरे देवाला कापतात त्यातला सुशिक्षित वर्ग ह्या प्रथा सोडून आहे, मुस्लिमांमध्ये मात्र असे काही नाही, श्रीमंत गरीब, शिक्षित अशिक्षित सर्वच ईदला बकरे कापतात, खाण्यासाठी वापरत असाल तरी मूळ कारण बळी देणे हेच आहे, ते एक पवित्र व न टाळता येण्यासारखे कार्य समजून केले जाते, हिंदू समाजात असे कम्पलशन दिसत नाही, चुभु देणेघेणे

In reply to by आजानुकर्ण

मूळ आक्षेप बळी देण्याला नसून दुटप्पीपणाला आहे असे वाटते. जसे मांढरदेवी किंवा तत्सम यात्रेत बळी देणे म्हणजे अंधश्रद्धा, क्रौर्य इत्यादी इत्यादी, पण बकरीइडीला बकरे कापणे म्हणजे धार्मिक अभिव्यक्ती! असे.

In reply to by आनंदयात्री

अगदी बरोबर. सन्मानपूर्वक बळी देणे सर्व संस्कृतीचा भाग आहे आणि कुणाला पालन करायचे असेल तर कायद्याच्या चौकटीत राहून जरूर करावे. दुट्टपी पणा ह्यावर आक्षेप. आम्ही लोक साधी बैलगाडी शर्यत भरवू शकत नाही आणि ह्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी बकरे कापायची मुभा.

In reply to by साहना

हो ना राव! साध्या बैलगाडा शर्यतीत भाग घ्यायचाय, पण माझ्या गाडीसाठी एक साधा बैल कमी पडतोय, समर्थकांपैकी कोणाला वेळ असेल तर कळवा..

In reply to by संदीप डांगे

इतके चांगले बैल इथे तुम्हाला मिळतील असे वाटत नाही आणि ते स्लो असतील तर दुसऱ्या बाजूने तुमची गती कमी होईल. सजेशन म्हणून तुम्ही एकटेच गाडी ओढा ना ? कदाचित तुम्ही एकटेच सगळ्यांना भारी पडाल.

In reply to by आजानुकर्ण

+१ मलाही बळी प्रथेमधे काय चुक आहे हे कळत नाहि. सणासुदीला आपण गोड, आवडीचं अन्नसेवन करतो. ज्यांना मांसाहार आवडतो त्यांनी अवष्य बळी देऊन मांसाहार करावा. बळी प्रकरणात स्वच्छता, प्राण्यांना प्रत्यक्ष्य मरण्यापुर्वेच्या यातना, अंधश्रद्धेचा बाजार वगैरे वेगळे प्रॉब्लेम आहेत. पण मुळात मांसाहार करण्यात ज्यांना इंट्रेस्ट आहे त्यांना तो करु द्यावा.

धाग्यावर सगळे सुटलेत मोकाट. फुरोगाम्यांची कितीवेळा मारणार, ते तसेही बदलणार नाहीत. मग आपण एनर्जी कशाला वाया घालवायची? बकरी ईदला बिर्यानी आणि गावच्या जत्रेत चुलीवरचे साजूक तूपवाले मटन खा अन खूष रहा.

निसर्गात एक प्राणी कोणत्याही कारणास्तव इतरांचा जीव घेत असतो. त्याला कोणतीही शिक्षा नाही. कायद्यात मानवी समाजात मानवाचा बळी घेणे याला शिक्षा आहे. काही ठिकाणी विशिष्ट प्राणी मारणे याला शिक्षा आहे. खरा गोंधळ नेहमी असतो तो संस्कॄति त तेथे एक म्हणतो अमुक मारले तर तो गुन्हा आहे दुसरा म्हणतो ह्या त्यात काय गुन्हा आलाय ? जगणे जगताना, निसर्ग, कायदा व संस्कृति यांचा तारतम्याने वापर करायचा असतो.एव्हरेस्ट वर गेल्यावर धर्माने ओक्सीजन वापरायचा नाही असा कायदा सांगितलेला आहे तो मी पाळीन असे करून चालत नाही.

In reply to by चौकटराजा

खर आहे. जीवो जीवस्य जीवनम| मानवी संस्कतीचा जसा विकास होत गेला तस देवाला संतुष्ट करण्यासाठी प्राण्याचा बळी देणे हा प्रकार कमी होत गेला. नारळ फोडणे हे देखील बळी ला प्रतिकात्मक पर्याय म्हणूनच निर्माण झाल.

In reply to by प्रकाश घाटपांडे

>>> नारळ फोडणे हे देखील बळी ला प्रतिकात्मक पर्याय म्हणूनच निर्माण झाल. हे कोणी सांगितले? या समजूती ला काही आधार आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

बळी नव्हे तर नरबळी. किंबहुना कै़क होमांमध्ये अजुनही प्रतिकात्मक बळी विधी होतो. वास्तुला धान्याचा पुतळा करुन दिला होता बहुतेक. नक्की आठवत नाही.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

बळी नव्हे तर नरबळी. किंबहुना कै़क होमांमध्ये अजुनही प्रतिकात्मक बळी विधी होतो. वास्तुला धान्याचा पुतळा करुन दिला होता बहुतेक.
प्रत्रिकात्मक बळी? नरबळी? वास्तुला? मी स्वतःच्या घराची वास्तुशांत २-३ वेळा केली आहे. असला विधी पाहण्यात/ऐकण्यात नाही.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

असला विधी माझ्या पाहण्यात नाही. स्वतःच्या घराच्या वास्तुशांतीत किंवा नातेवाईक/मित्र/शेजारीपाजारी इ. च्या वास्तुशांतीत हा विधी केल्याचे बघितलेले नाही. आमच्या, आमच्या नातेवाईकांच्या/मित्रमंडळींच्या/शेजार्‍यापाजार्‍यांच्या घरातील पूर्वीच्या पिढ्यात नरबळी देण्याची उच्चपरंपरा नसावी असं दिसतंय.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अच्छा! तुमच्या माहितीचा स्त्रोत विकिपिडीया. तिथे कोणीतरी, काहीतरी लिहिलंय ते सत्य आहे असं मानून तुम्ही चाललाय. तुम्ही जे खरं मानून चाललाय त्याला विकिपिडियाच्या वरील लिंकमधील एका वाक्याव्यतिरिक्त काही पुरावे, शास्त्राधार आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

केवळ तसे नाही पण मी धार्मिक वातावरणात वाढलो असल्याने किर्तनकार प्रवचनकार गुरुजी घरात असायचेच. त्यांच्याही बोलण्यात असे संदर्भ यायचे. अधिक विश्वासार्ह संदर्भ तुम्ही ही शोधा मीही शोधतो. प्रत्येक गोष्टी साठी विद्वत्ताप्रचुर संदर्भ देणे शक्य होत नाही. तारतम्याने आपण काही गोष्टी समजू शकतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

असे कोणी म्हणाले म्हणजे ते खरे मानायचे??? उद्या जर म्हणाले सगळे सोडून संन्यास घ्या तर घेणार आहात का तुम्ही? असले गुरुजी बदला

In reply to by प्रकाश घाटपांडे

केवळ तसे नाही पण मी धार्मिक वातावरणात वाढलो असल्याने किर्तनकार प्रवचनकार गुरुजी घरात असायचेच. त्यांच्याही बोलण्यात असे संदर्भ यायचे. अधिक विश्वासार्ह संदर्भ तुम्ही ही शोधा मीही शोधतो. प्रत्येक गोष्टी साठी विद्वत्ताप्रचुर संदर्भ देणे शक्य होत नाही. तारतम्याने आपण काही गोष्टी समजू शकतो.
या अफवेला कोणताही शास्त्राधार वा इतिहास वा पुरावे नाहीत हे मला माहित होते. केवळ ऐकीव गप्पांवर ही अफवा पसरवली गेली आहे. अशा अनेक अफवा पसरवल्या गेल्या आहेत. पूर्वी म्हणे महारांना बळी द्यायचे. नंतर एका मित्राशी बोलताना त्याने नारळाचे उदाहरण दिल्यावर मी त्यालाही संदर्भ मागितल्यावर तो म्हणाला की नारळाला शेंडी असते कारण ते म्हणे बळी दिल्या जाणार्‍या बटूचे प्रतीक आहे. त्यावर मी विचारले की बळी तर महारांना द्यायचे, मग ब्राह्मण मुलांना कधी बळी द्यायला लागले? यावर त्याला योग्य उत्तर न दिल्याने त्याने मलाच उलटे विचारले की मग फोडताना नारळाला शेंडी का ठेवतात? यावर मी सांगितले की नारळाच्या शेंडीचा बटूच्या शेंडीशी संबंध लावणे हा जावईशोध आहे. नारळाला शेंडी ठेवण्याची वेगवेगळी कारणे असू शकतील. कदाचित नारळ उचलायला किंवा अनेक नारळ शेंडीला एकत्र बांधून हातातून कॅरी करायला सोपे जात असेल किंवा अजून काहीतरी कारण असेल. पण लगेच नारळाची शेंडी म्हणजे बळी दिल्या जाणार्‍या मुंजा मुलाची शेंडी हा संबंध कोठून आला? यावर त्याला काही सांगता आले नाही. आणि समजा ब्राह्मण मुलांना बळी देत असतील तर महारांना बळी द्यायचे ही अफवा असणार. मी पूजा सांगणार्‍या अनेक भटजींना विचारले आहे. नारळ फोडणे व नरबळी यांचा काहीही संबंध नाही असेच आजवर सर्वांनी सांगितले आहे. अशा गोष्टींवर निदान मी तरी तारतम्याने विचार करून विश्वास ठेवत नाही. इतरांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे.

In reply to by श्रीगुरुजी

काय राव गुरुजी. जैन-बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर सुरु झालेल्या शाकाहाराच्या प्रचारामुळे सुरु झालेल्या परंपरा आहेत ह्या. ह्याचे विवक्षित असे दाखले कसे देतील. नारळ म्हणजे बळी, मांसाचा वडा - उडदाचा वडा असे विविध पदार्थ बळीला/मांसनैवेद्याला पर्याय म्हणून हळूहळू विकसित होत गेले. त्याचे दाखले असे कुठून आणणार. तरी महाभारतातील शांतीपर्वातील तुलाधार-जाजली हा संवाद संपूर्ण वाचावा. अध्याय २६१ पासून. आपल्या सर्व प्रश्नांची त्यात मिळतील असे वाटते. हा संवाद येथेही उपलब्ध आहे. http://www.sacred-texts.com/hin/m12/m12b088.htm

In reply to by प्रचेतस

जैन-बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर सुरु झालेल्या शाकाहाराच्या प्रचारामुळे सुरु झालेल्या परंपरा आहेत ह्या. ह्याचे विवक्षित असे दाखले कसे देतील. नारळ म्हणजे बळी, मांसाचा वडा - उडदाचा वडा असे विविध पदार्थ बळीला/मांसनैवेद्याला पर्याय म्हणून हळूहळू विकसित होत गेले. त्याचे दाखले असे कुठून आणणार.
तरी महाभारतातील शांतीपर्वातील तुलाधार-जाजली हा संवाद संपूर्ण वाचावा. अध्याय २६१ पासून. आपल्या सर्व प्रश्नांची त्यात मिळतील असे वाटते.
इथे जी लिंक दिलेली आहे त्यात तर नारळ, बळी असे शब्द सुद्धा नाहीत. ही महाभारतातील एक रूपक कथा आहे. त्या कथेचा संदर्भ पूर्णपणे वेगळा आहे. रूपक कथा सत्य मानता येत नाहीत. रूपकथा संदेश देण्यासाठी असतात (उदा. लाकूडतोड्याची गोष्ट). या गोष्टी म्हणजे सत्य घटना नाहीत. त्या सत्य मानायच्या झाल्यास सत्यनारायणाच्या पोथीतील साधुवाण्याची कथा किंवा इसापनीतितील कथा सुद्धा सत्य मानाव्या लागतील. जर नरबळीला शाकाहारी पर्याय म्हणून नारळ फोडण्याची परंपरा जैन-बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर सुरू झाली असेल तर त्यापूर्वी कितीतरी आधी झालेल्या महाभारतात ही परंपरा असण्याचे कारणच नाही. नारळ फोडणे म्हणजे नरबळी, उडदाचा वडा म्हणजे मांसाचा वडा असे मानत गेले तर ताटातील प्रत्येक पदार्थाचा मांसाहाराशी संबंध लावता येईल. खेकडा भजी म्हणजे तळलेल्या खेकड्यांचा शाकाहारी पर्याय, चटणी म्हणजे खिमा किंवा रसम् म्हणजे रक्त पिण्याचा शाकाहारी पर्याय असेही शोध लावता येतील. मानवी कल्पनाशक्तीला मर्यादा नाहीत, त्यामुळे कोणत्याही पदार्थाचा संबंध कोणत्याही मांस प्रकाराशी जोडता येईल. एकंदरीत नारळ फोडणे किंवा खाली कोणीतरी लिहिल्याप्रमाणे कोहळा फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी असे मानणे ही भ्रामक समजूत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सिलेक्टिव रिडींगचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमचा प्रतिसाद.
इथे जी लिंक दिलेली आहे त्यात तर नारळ, बळी असे शब्द सुद्धा नाहीत.
मी स्वत:च वर लिहिले आहे की अशा गोष्टींचे दाखले देणे शक्य नाही. रूपककथा संदेश देण्यासाठीच असतात हे मान्यच आणि ह्या संवादातील सम्पूर्ण आशय काढायाचा म्हटल्यास यज्ञीय हिंसेला विरोध हाच आहे हे तुम्ही हे चार पाच अध्याय नीट वाचल्यास लक्षात येउ शकते. बाकी मी फ़क्त बळी हा शब्द वापरला असून नरबळी हा शब्द कुठेही वापरला नाही. बळी ह्याचा अर्थ यज्ञीय बळी (vedic sacrifices) अशा अर्थाने आहे.
जर नरबळीला शाकाहारी पर्याय म्हणून नारळ फोडण्याची परंपरा जैन-बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर सुरू झाली असेल तर त्यापूर्वी कितीतरी आधी झालेल्या महाभारतात ही परंपरा असण्याचे कारणच नाही
अशाने माझाच मुद्दा सिद्ध होतोय की. भारतकाळात ही परंपरा नव्हतीच. हिंसेला विरोध हा जैन बौद्धांच्या आगमनानंतरच सुरु झाला. महाभारतातील उपरोक्त पर्व हे बरेचसे प्रक्षिप्त आहे. आणि ते इसवी सनाच्या आसपास शेदोनशे वर्षे मागेपुढे कधीतरी लिहिले गेलेले आहे असे त्याचे तत्कालीन इतिहासाच्या अभ्यासकास सहजी लक्षात येते. सामान्यांसही महाभारताचे सूक्ष्मपणे वाचन केल्यास हे लक्षात यावे असे मला वाटते. बाकी ताटातील इतर पदार्थांचा उल्लेख तुम्ही येथे का करीत आहात ते समजले नाही. नारळ, उडदाचा वडा आदि पदार्थ ख़ास देवकार्यासाठी नैवेद्य म्हणूनच वापरले जातात. तर इतर पदार्थ केवळ आहार ह्या दृष्टीने.

In reply to by प्रचेतस

मी स्वत:च वर लिहिले आहे की अशा गोष्टींचे दाखले देणे शक्य नाही.
मी सर्वात आधी तेच लिहिलं आहे. या ऐकीव समजूती आहेत. अशा गोष्टींना आधार नाही.
रूपककथा संदेश देण्यासाठीच असतात हे मान्यच आणि ह्या संवादातील सम्पूर्ण आशय काढायाचा म्हटल्यास यज्ञीय हिंसेला विरोध हाच आहे हे तुम्ही हे चार पाच अध्याय नीट वाचल्यास लक्षात येउ शकते. बाकी मी फ़क्त बळी हा शब्द वापरला असून नरबळी हा शब्द कुठेही वापरला नाही. बळी ह्याचा अर्थ यज्ञीय बळी (vedic sacrifices) अशा अर्थाने आहे.
तुम्ही जी लिंक दिली आहे ते पान मी संपूर्ण वाचले. त्यात बळी, नारळ, नरबळी असे किंवा अशा अर्थाचे शब्द कोठेही नाहीत.
अशाने माझाच मुद्दा सिद्ध होतोय की. भारतकाळात ही परंपरा नव्हतीच. हिंसेला विरोध हा जैन बौद्धांच्या आगमनानंतरच सुरु झाला. महाभारतातील उपरोक्त पर्व हे बरेचसे प्रक्षिप्त आहे. आणि ते इसवी सनाच्या आसपास शेदोनशे वर्षे मागेपुढे कधीतरी लिहिले गेलेले आहे असे त्याचे तत्कालीन इतिहासाच्या अभ्यासकास सहजी लक्षात येते. सामान्यांसही महाभारताचे सूक्ष्मपणे वाचन केल्यास हे लक्षात यावे असे मला वाटते. बाकी ताटातील इतर पदार्थांचा उल्लेख तुम्ही येथे का करीत आहात ते समजले नाही. नारळ, उडदाचा वडा आदि पदार्थ ख़ास देवकार्यासाठी नैवेद्य म्हणूनच वापरले जातात. तर इतर पदार्थ केवळ आहार ह्या दृष्टीने.
माझ सुरवातीपासून हाच मुद्दा आहे की नारळ फोडणे म्हणजे नरबळीचे प्रतीकात्मक रूप ही ऐकीव समजूत आहे. नारळ फोडण्याचा व प्रतीकात्मक नरबळी किंवा बळी देण्याचा काहीही संबंध नाही. भूतकाळात कोणीतरी असा संबंध जोडला असावा व कालांतराने तेच सत्य मानले जाऊ लागले असावे. नारळ, उडदाचा वडा इ. प्रमाणे खीर, लाडू, इतर पक्वान्ने व वरणभात, पोळी हे देखील नैवेद्यात वापरले जातात. हे सर्वच आहाराचे पदार्थ आहेत. प्रतीकात्मक मांस सेवनाचा व बळीचा यातील कोणत्याही पदार्थाशी संबंध नाही.

In reply to by श्रीगुरुजी

एकच पान वाचलत? २/३ अध्याय वाचायला हवेत. आणि आता http://www.misalpav.com/comment/882262#comment-882262 आत्मबंध यांचेप्रमाणेच म्हणतो. डोळ्यावर कातडं बांधून घेतलेल्या व्यक्तीशी बोलण्यात काही पॉइंट नाही.

In reply to by प्रचेतस

मीही तेच म्हणतो. एका भ्रामक समजूतीमागील कारणे मी विचारली तर कोणालाच योग्य कारणे देता आली नाहीत. परंतु समजूती खरीच आहे यावर मात्र ठाम विश्वास आहे. आणि आता व्यक्तिगत टिप्पणी सुरू झाली आहे. म्हणजे नारळ/कोहळा फोडण्यामागे प्रतीकात्मक नरबळी देणे ही कल्पना भ्रामक आहे हेच सिद्ध होतंय. असो.

In reply to by श्रीगुरुजी

आमच्या इथे प्रतीकात्मक नरबळी म्हणून कोहळा फोडण्याची पद्धत आहे. नारळ आणि बळी ह्यांचा संबंध आहे असे वाटत नाही.

नारळ म्हणजे बळी, मांसाचा वडा - उडदाचा वडा असे विविध पदार्थ बळीला/मांसनैवेद्याला पर्याय म्हणून हळूहळू विकसित होत गेले. त्याचे दाखले असे कुठून आणणार.
या ऐकीव गप्पा आहेत. या गप्पांमागे कोणताही आधार नाही.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

खाण्यासाठी फोडायचा हे कारण आहे. ज्याप्रमाणे स्वतः खाण्यासाठी कोंबड्या, बकर्‍या कापल्या जातात, तसेच नारळ सुद्धा खाण्यासाठीच फोडले जातात.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

वाढदिवस, नवीन वर्ष का साजरे करायचे , आईवडिलांना नमस्कार का करायचा ? फोन उचलल्यावर हॅलो का म्हणायचे ? सगळ्यांचं काही शास्त्र आधार हवा असे नाही. नारळ नको तर कालीगंड फोडा सगळयाच गोष्टींना आहे म्हणून करतात असे नाही परंपरा सुद्धा काही लोकांना पाळ्याव्याशा वाटतात

In reply to by श्रीगुरुजी

@या ऐकीव गप्पा आहेत. या गप्पांमागे कोणताही आधार नाही. ››› चूक. श्राद्धातला उडिदवडा हा श्राद्धातल्या मांसान्नाचा पर्याय आहे. विविध होमहवनांच्या विधीतही असणाय्रा क्षेत्रपाल बळीपूजेत भात दही उडिदाचा बळी असतो. त्यालाही सदीपमाषभक्तबली असच संबोधलं जातं. नवचंडी होमातला देवीसमोरचा कूष्मांड(कोहोळा)बली हा ही पशूबलीचा पर्याय आहे. त्याला कापण्यापूर्वी 'बलीत्वं पशुरूपेण' असा मंत्र म्हटला जातो. याला सगळ्याला कर्मकांडाच्या पोथ्यांचा आधार आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

रसम्, खेकडा भजी, अळूची भाजी, मठ्ठा, चटणी इ. कोणत्या मांसाहारी अन्नाचे शाकाहारी पर्याय आहेत?

In reply to by श्रीगुरुजी

कोणत्याच नाही. ते पदार्थ शाकाहारीच आहेत. पण तुमचं 'कोणताही आधार नसल्याचं' मत अता निराधार झालं. त्याचं काय? ते बोला.

In reply to by अत्रुप्त आत्मा

नारळ फोडणे हे नरबळीचे शाकाहारी रूप आहे असे तुमचे वैयक्तिक मत आहे. तुमचे मत हा काही शास्त्राधार नाही. याला शास्त्राधार समजणे म्हणजे विकीपिडियावरील माहिती ही डोळे झाकून सत्य आहे असे समजण्यासारखे आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आयला, इथे वल्लीसारखे अभ्यासक आणि आत्मु गुर्जींसारखे पौरोहित्याचं शिक्षण घेतलेले लोक सांगतायत त्याचा अर्थ तरी गुरुजींचं नाक वरच!

In reply to by अनुप ढेरे

वाचून गंमत वाटली. हे कोण आत्मबंध आहेत त्यांच्यासारखेच इतर अनेकांनी पौरोहित्याचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांच्यापैकी कोणीही नारळ फोडण्याचा व बळी/नरबळीचा संबंध जोडलेला नाही. आत्मबंध असोत वा प्रचेतस वा अजून कोणी, ते जे सांगतात त्या सर्व गोष्टींवर निदान मी तरी डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. जर ते सांगतात त्याविषयी शंका वाटली तर अजून माहिती विचारतो व स्वतःची खात्री झाली तरच विश्वास ठेवतो. एखाद्या गोष्टीबद्दल माहिती, प्रश्न विचारणे म्हणजे नाक वर करणे असे ज्यांना वाटते त्यांना माझा साष्टांग दंडवत! ज्यांना त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा असेल त्यांनी तो ठेवावा. माझा आक्षेप नाही.

In reply to by टवाळ कार्टा

बरोबर. त्यासाठी कारणे सुद्धा आहेत. आणि फक्त माझा एकट्याचा विरोध नसून अनेकांचा हेल्मेटला विरोध आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>> कोणत्याच नाही. ते पदार्थ शाकाहारीच आहेत. बादवे, नारळ, उडीद वडे आणि कोहळा हे पदार्थ शाकाहारीच आहेत आणि हे पदार्थ फक्त फक्त श्राद्धप्रसंगी खाल्ले जात नसून १२ ही महिने त्यांचे सेवन होत असते.