Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 01/15/2015 - 03:24
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
  • Log in or register to post comments
  • 364438 views

प्रतिक्रिया

Submitted by विटेकर on Wed, 01/21/2015 - 17:39

In reply to टका "materialistic" by बॅटमॅन

Permalink

बाडीस

बट्टमनाशी सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 01/21/2015 - 17:41

In reply to टका "materialistic" by बॅटमॅन

Permalink

बॅटमॅन भौ, "का नाही होणार?"

बॅटमॅन भौ, "का नाही होणार?" या प्रश्नाच्या उत्तरासाठी अनादि काळापासून काय होतय याचा संदर्भ देण्यापेक्षा, तुम्हाला काय "बरोबर्/योग्य/rational" वाटते त्या मुद्द्यांचा वापर केलात तर बोलता आले असते. बर्‍याच गोष्टी अनादि काळापासून होतात म्हणून योग्य ठरत नाहीत ना.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 01/21/2015 - 17:44

In reply to बॅटमॅन भौ, "का नाही होणार?" by हाडक्या

Permalink

मटेरिअलिस्टिक अपेक्षांमध्ये

मटेरिअलिस्टिक अपेक्षांमध्ये शरीरविषयक अपेक्षांचा समावेश होत नाही का? नसेल तर का? फ्लॅट इ. बद्दल काही बोलले की ते साधेसुधे मटेरिअलिस्टिक आणि रंग, फिगर, इ. बद्दल काही बोलले की पर्व्हर्ट असे काही क्लासिफिकेशन आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 01/21/2015 - 18:01

In reply to मटेरिअलिस्टिक अपेक्षांमध्ये by बॅटमॅन

Permalink

मटेरिअलिस्टिक अपेक्षांमध्ये

मटेरिअलिस्टिक अपेक्षांमध्ये शरीरविषयक अपेक्षांचा समावेश होत नाही का?
होतोच की.. तेच तर टका पण म्हणतोय ना ब्याट्या. मी म्हणतोय की, फक्त सुंदर, सुडौल मुलगी असली म्हणजे भारी सेक्स असेल हा एक ठोकताळा म्हणून पण येडपट सिद्धांत आहे. समागम अनुरुपता एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याला सगळ्यात कमी महत्त्व दिले जाते. आता आपल्या बाबतीत ते कसे जाणून घ्यायचे, त्याचे रस्ते ज्याचे त्याने शोधावेत. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 01/21/2015 - 18:04

In reply to मटेरिअलिस्टिक अपेक्षांमध्ये by हाडक्या

Permalink

मी म्हणतोय की, फक्त सुंदर,

मी म्हणतोय की, फक्त सुंदर, सुडौल मुलगी असली म्हणजे भारी सेक्स असेल हा एक ठोकताळा म्हणून पण येडपट सिद्धांत आहे.
अगदी डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी ष्ट्राँग कोरिलेशन नाहीच असं म्हणवतं का ओ तुम्हांला या केसमध्ये ;)
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 01/21/2015 - 18:36

In reply to मी म्हणतोय की, फक्त सुंदर, by बॅटमॅन

Permalink

डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी

डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी ष्ट्राँग कोरिलेशन नाहीच
डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी ष्ट्राँग कोरिलेशन नाहीच असे म्हणता येणार नाही हे मान्य. सुंदर पोरगी दिसली की आपण आकर्षित होतोच की. (अगदी घरी बायको पूर्ण समाधान देत असेल तरीही!) पण ते एक नर म्हणून बाय नेचर आहे. ती सुंदर मुलगी तुम्हाला "सुंदर अनुभव" देऊ शकेल याची त्यात कोणतीही शाश्वती नाही (पण इतर सगळे "फीट" असेल तर तुम्हाला पोरे-बाळे होतील, दॅट इज एक्स्पेक्टेड रिजल्ट बाय नेचर ;) ). म्हणून "ष्ट्राँग कोरिलेशन" असले तरीही ते समागम अनुरुपतेसाठी "कंक्लुजिव" नक्कीच नाही हे म्हणायचेय, जे प्रतिसादकर्त्याला म्हणावयाचे होते. आता तुम्हाला याबद्दल (समागम अनुरुपता) काय वाटतेय ते साध्या शब्दात व्यक्त करा बघू . :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Wed, 01/21/2015 - 18:59

In reply to डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी by हाडक्या

Permalink

आपण आकर्षित होतोच

आपण आकर्षित होतोच
बरोबर आहे सायबा, मी तेच तर म्हणतोय. आकर्षितच होउ शकलो नाही तर कसला नंतर सुंदर अनुभव वगैरे. सुरुवात तर आकर्षणातुनच होणार ना.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 01/21/2015 - 19:22

In reply to डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी by हाडक्या

Permalink

डिरेक्ट कॉजेशन नाही हे अगोदरच

डिरेक्ट कॉजेशन नाही हे अगोदरच कबूल केलेय की. :) त्यामुळे बाकी मुद्याशी सहमत आहे हेवेसांनल. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Wed, 01/21/2015 - 17:43

In reply to टका "materialistic" by बॅटमॅन

Permalink

नशिबानी स्त्री च्या

नशिबानी स्त्री च्या सौंदर्याचे रुपांतर दुसर्‍या कशात झाले नाही ते बरे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 01/21/2015 - 17:45

In reply to नशिबानी स्त्री च्या by प्रसाद१९७१

Permalink

जर झाले असते तर इन्बिल्ट

जर झाले असते तर इन्बिल्ट प्रतिक्रियाही त्या बदलानुरूपच असती. सो चिल!
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Wed, 01/21/2015 - 22:32

In reply to नशिबानी स्त्री च्या by प्रसाद१९७१

Permalink

हुन्ड्यात होउ शकते रुपान्तर.

हुन्ड्यात होउ शकते रुपान्तर.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 01/21/2015 - 20:02

In reply to टका "materialistic" by बॅटमॅन

Permalink

हेच्च लिहायला आलो होतो

हेच्च लिहायला आलो होतो
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Wed, 01/21/2015 - 17:41

In reply to टका आणि प्रसाद, या बाबतीत by हाडक्या

Permalink

फक्त पुरुषांसाठी हा "सर्वात

फक्त पुरुषांसाठी हा "सर्वात महत्वाचा हेतू" असतो असे म्हणणेच अगदीच गैर आहे.
"फक्त" शब्द तुम्ही टाकलाय. वर मी ते मत माझे आहे असे लिहीले आहेच.
तुम्हाला हवा तसा प्रतिसाद देत असेल, तुम्हाला आनंद देत असेल तर "८०-९० किलोची मुलगी" अप्सरेस लाजवेल. तो समागम असेल.
पुन्हा माझा पुर्वीचाच मुद्दा. जी गोष्ट लग्ना आधी मोजुन बघता येणार नाही त्या गोष्टी पेक्षा जी मोजुन घेता येइल ती बघावी. उदा - ८०-९० किलोच्या मुली पेक्षा ५०-५५ ची ( ज्याच्या त्याच्या आवडी प्रमाणे आकडे बदलुन घ्या ) चालेल. पुढे काय होइल ती रीस्क दोन्ही केस मधे सारखीच आहे. मग at least जे समोर दिसतय ते तेरी बघुन घ्यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 01/21/2015 - 17:52

In reply to फक्त पुरुषांसाठी हा "सर्वात by प्रसाद१९७१

Permalink

चला, "फक्त" या शब्दावरून

चला, "फक्त" या शब्दावरून तुम्हाला "benefit of the doubt" दिला. तसेही ते तुमचे मत आहे आणि मला मान्य नाही हे मांडून झालेले असल्याने त्याला सोडून देऊ. दुसर्‍या मुद्द्यासाठी मी आधीच म्हणालोय की म्हणून तर मला लिव-इनचा पर्याय ( ज्यात अर्थातच समागम अनुरुपता गृहित धरलीये) जास्त योग्य वाटतोय आणि मी त्याचे समर्थन करतोय.
पुढे काय होइल ती रीस्क दोन्ही केस मधे सारखीच आहे. मग at least जे समोर दिसतय ते तेरी बघुन घ्यावे
हे दोन्ही बाजूंनी लागू होतेय एवढे ( लग्नाच्या बाजारातला एक घटक म्हणून) मान्य. पण तुम्ही ज्या "शरीरसंबंध बाबतीतील कंपॅटीबिलीटी, आवडनिवड" या त्यापेक्षा जास्त व्यापक आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलत होता त्याला माझं उत्तर होते. नुसते वजन आणि दिसणे पाहून या गोष्टी नै जुळत हो (ते काय T मध्ये U बसवायचे काम नाही फक्त की मी ७० चा आणि ती ५५ ची म्हन्जे झाले ;) ). बाकी विषय मोठ्ठा आहे, जाणते/जाणत्या अजून अणुभवाचे बोल सांगतीलच.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 01/21/2015 - 19:10

In reply to परंतु संसार चांगला होण्यासाठी by प्रसाद१९७१

Permalink

मत

अहो प्रसादराव, सेक्ससाठी लग्न केलेच पाहिजे वगैरे गैरसमज आजच्या पिढीच्या मनात नाहीत. आजच्या पिढीतले जे मनाने अजूनही मागच्या पिढीत आहेत ते संकेतस्थळीय पब्लिक सोडले तर सेक्स आणि लग्नाचा फारसा संबंध आहे असे आजकाल कोणी मानत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Wed, 01/21/2015 - 19:16

In reply to मत by आजानुकर्ण

Permalink

सेक्ससाठी लग्न केलेच पाहिजे

सेक्ससाठी लग्न केलेच पाहिजे वगैरे गैरसमज आजच्या पिढीच्या मनात नाहीत
तुमचा पूर्ण मान राखुन पाहीजे तेंव्हा,पाहीजे तितके, हक्काच्या, भिती मुक्त , सेफ सेक्स साठी ( आणि बिन खर्चाच्या ) लग्न हाच एकमेव पर्याय आहे. लिव्ह इन पण आहे, पण तो भारतात रुजणे अवघड आहे. आणि लिव्ह इन आणि लग्न ह्यात फक्त तांत्रिक फरक आहे. आजच्या पिढीला वर लिहीलेल्या ३-४ गोष्टी पूर्ण करतील असे काय ऑप्शन आहेत हे माझ्यासारख्या मागास माणसाला सांगा तरी.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 01/21/2015 - 19:21

In reply to सेक्ससाठी लग्न केलेच पाहिजे by प्रसाद१९७१

Permalink

प्रसादराव

भारतात लग्नाचे अॅवरेज वय आता तिशीपर्यंत आले आहे. १४-१५व्या वर्षी पौगंडावस्थेत आल्यापासून भिन्नलिंगी आकर्षणाच्या भावना सुरु होतात. आता लोक १५ वर्षं कळ काढतात असं म्हणायचंय का? जालावर भरपूर सर्वे उपलब्ध आहेत. तब्बल सत्तर-ऐँशी टक्के पब्लिकला लग्नापूर्वी सेक्सचा अनुभव असतो. एवढं कशाला ओळखीच्या कोणत्याही केमिस्ट-फार्मसिस्टला जाऊन विचारा. अमेरिकेच्या तुलनेत भारतातील कुमारीमातांचे नगण्य प्रमाण पाहता हा सर्व सेक्स सेफच असावा असा माझा अंदाज आहे. लग्नानंतरचा सेक्स बिनखर्चाचा असतो असं कुणी सांगितलंय. लग्नाचा वन टाईम प्रीमियम भरतातच की!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Wed, 01/21/2015 - 19:30

In reply to प्रसादराव by आजानुकर्ण

Permalink

मालक - सेक्स च्या अनुभवासाठी

मालक - सेक्स च्या अनुभवासाठी मी लोक लग्न करतात असे म्हणले नाही. मी तुम्हाला ४-५ गोष्टींची यादी दीली होती त्या फक्त लग्न ( किंवा लिव्ह इन ) मधेच मिळतात. हे ते बेनिफिट
पाहीजे तेंव्हा,पाहीजे तितके, हक्काच्या, भिती मुक्त , सेफ सेक्स साठी ( आणि बिन खर्चाच्या )
बिन खर्चाचा म्हणजे तुलनात्मक नगण्य. आणि बायको नोकरी करत असेल तर ...
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 01/21/2015 - 19:43

In reply to मालक - सेक्स च्या अनुभवासाठी by प्रसाद१९७१

Permalink

बायको नोकरी करत असेल तर ..

बायको नोकरी करत असेल तर ..
हो हे खरंय. 'तू तर फक्कड मासिक हुंडा' ही कविता आठवली.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 01/22/2015 - 10:31

In reply to प्रसादराव by आजानुकर्ण

Permalink

अमेरिकेच्या तुलनेत भारतातील

अमेरिकेच्या तुलनेत भारतातील कुमारीमातांचे नगण्य प्रमाण पाहता हा सर्व सेक्स सेफच असावा असा माझा अंदाज आहे. पुराणकालीन भारतातही कुमारी मातांची प्रकरणे अपवादानेच होती. या अर्थी काँडमचा शोध भारतातच लागला हे सिद्ध करता येउ शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 01/22/2015 - 13:53

In reply to अमेरिकेच्या तुलनेत भारतातील by मृत्युन्जय

Permalink

अग्गागा

अग्गागा =)) आपल्या पुराणांत बरेच काही आहे...फक्त ते बाहेर तेव्हाच येते जेव्हा दुसर्या कोणत्यातरी देशातले लोक त्याचा शोध लावतात
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 01/21/2015 - 16:14

Permalink

इथे शिक्षण कमी म्हणजे अगदी

इथे शिक्षण कमी म्हणजे अगदी दहावी बारावी पास असं नव्हतं म्हणायचं मला.पण बी ए,बि काॅम झालेल्या कितीतरी मुली असतात ज्याना चांगली नोकरी मिळत नसल्याने घरी असतात.अशा मुलींबद्दल लग्नेच्छु मुलं काय म्हणतात? तसंच माझ्या ऒळखीत काही एम बि ए होऊनही त्यांना गृहिणी असणे,स्वयंपाक करणे अावडते.त्या स्वखुशीने नोकरी करत नाहीत.अशी मुलगी सांगुन आल्यास मुलांचे काय म्हणणे असेल जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 01/21/2015 - 16:20

In reply to इथे शिक्षण कमी म्हणजे अगदी by अजया

Permalink

बी ए,बि काॅम झालेल्या कितीतरी

बी ए,बि काॅम झालेल्या कितीतरी मुली असतात ज्याना चांगली नोकरी मिळत नसल्याने घरी असतात.अशा मुलींबद्दल लग्नेच्छु मुलं काय म्हणतात?
त्याच्या आधी त्याच मुली बी ए,बि काॅम झालेल्या मुलांबद्दल काय म्हणतात हे विचारलेत का? मग जरा वस्तुस्थिती समजेल
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 01/21/2015 - 17:02

In reply to बी ए,बि काॅम झालेल्या कितीतरी by टवाळ कार्टा

Permalink

मला लग्नेच्छु मुलांना काय

मला लग्नेच्छु मुलांना काय वाटते हेच जाणून घ्यायचे आहे.मुलींना अशा मुलांबद्दल काय वाटते याने मुलांच्या मतात फरक पडणार आहे का?सरळ साधा प्रश्न आहे,डिग्री आहे पण नोकरी नाही,कराविशी वाटत नाही अशा मुलीची निवड मुलं करतात का? मुलींचा वेगळा प्रश्न काढुन सहाशे करता येतीलच!!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 01/21/2015 - 17:19

In reply to मला लग्नेच्छु मुलांना काय by अजया

Permalink

डिग्री आहे पण नोकरी नाही

डिग्री आहे पण नोकरी नाही,कराविशी वाटत नाही
शिकलो तर त्याचा उपयोग केलाच पाहिजे...अश्या मताचा आहे मी
  • Log in or register to post comments

Submitted by लॉरी टांगटूंगकर on Wed, 01/21/2015 - 16:17

Permalink

आणि ४५०!

आणि ४५०!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Wed, 01/21/2015 - 16:18

Permalink

बाकी रूप पैसा कुटुंब इ सर्व

बाकी रूप पैसा कुटुंब इ सर्व गोष्टी दुय्यम आहेत.
डॉक्टर साहेब * - दुय्यम आहेत हे मान्य आहे पण त्या दुय्यमतेला पण एक थ्रेशोल्ड लिमिट असते. पैसा दुय्यम आहे मान्य पण अपेक्षेपेक्षा कीती कमी चालेल? बेसिक गोष्टी साठी पण जर झगडायला लागत असेल तर बायको अ‍ॅक्सेप्ट करेल का? तसेच रुपाबद्दल पण. प्रत्येकाचे थ्रेशोल्ड लिमिट वेगळे असु शकते हे पण मान्य केले पाहीजे. * : तुम्हाला आवडले नाही तरी डॉक्टर बद्दल माझ्या मनात आदराचीच भावना येते, त्यामुळे साहेब म्हणणारच
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 01/21/2015 - 16:22

Permalink

तुमचं रुप सौंदर्य इ. इ. वाचुन

तुमचं रुप सौंदर्य इ. इ. वाचुन,"रुपास भाळलो मी" गाणं राहुन राहुन डोक्यात येतंय!!
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 01/21/2015 - 17:00

Permalink

पत्रिका

पत्रिका बघावी कि नको ? असे कंफ्युज झालेले पालक फार दिसतात आणि मुले पण माझा विश्वास नाही पण आइ बाबा साठी ई कारणे देतात
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 01/21/2015 - 17:18

In reply to पत्रिका by कपिलमुनी

Permalink

तसं नाही. स्थळ आवडले नाही तर

तसं नाही. स्थळ आवडले नाही तर सांगायला पत्रिका हे एक पोलिटिकली करेक्ट कारण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 01/21/2015 - 17:20

In reply to पत्रिका by कपिलमुनी

Permalink

पत्रिका नकार कळवायचा १ समंजस

पत्रिका नकार कळवायचा १ समंजस उपाय आहे
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 01/21/2015 - 17:23

In reply to पत्रिका नकार कळवायचा १ समंजस by टवाळ कार्टा

Permalink

इंडीड. म्हणजे मनातून स्थळाला

इंडीड. म्हणजे मनातून स्थळाला श्या घालायच्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र कुंडलीतल्या ग्रहांवर खापर फोडता येते.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 01/21/2015 - 17:26

In reply to इंडीड. म्हणजे मनातून स्थळाला by बॅटमॅन

Permalink

पत्रिका

आधी पत्रिका पाठवून मग ती जुळत असेल तरच बघण्याचे कार्यक्रम होतात ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 01/21/2015 - 17:52

In reply to पत्रिका by कपिलमुनी

Permalink

अहो कुंडली काय, कधीही आणि

अहो कुंडली काय, कधीही आणि कशीही ट्विस्ट करता येते.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 01/21/2015 - 17:56

In reply to अहो कुंडली काय, कधीही आणि by बॅटमॅन

Permalink

+१ अगदी!!

+१ अगदी!!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 01/21/2015 - 20:04

In reply to अहो कुंडली काय, कधीही आणि by बॅटमॅन

Permalink

अग्दी अग्दी...मी माझी कुंडली

अग्दी अग्दी...मी माझी कुंडली कोणाकडून "अ‍ॅडजस्ट" करुन घ्यायची ते ठरवले पण आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Wed, 01/21/2015 - 17:27

In reply to इंडीड. म्हणजे मनातून स्थळाला by बॅटमॅन

Permalink

स्वानुभव का ?

बट्ट्मन ... स्वानुभव का ? नै , अंमळ ज्यास्तीचा घाव लागलेसा वाटतो ! मला पण एक नकार आला होता ... इचलकरंजीहून ! तेव्हापासून पुन्हा जन्मात इचलकरंजीला गेलो नाही. वाईट वाटले की इचलकरंजी सारख्या गावातून नकार यावा ???? (बाकी स्थळ काय खासं नव्हते म्हणा !)
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 01/21/2015 - 17:50

In reply to स्वानुभव का ? by विटेकर

Permalink

इचलकरंजी सारख्या गावातून नकार

इचलकरंजी सारख्या गावातून नकार यावा ????
म्हणजे काय ?
बाकी स्थळ काय खासं नव्हते म्हणा
कोल्ह्याला....... ह्.घेणे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 01/21/2015 - 17:52

In reply to स्वानुभव का ? by विटेकर

Permalink

स्वानुभव आहे आणि तो दोन्ही

स्वानुभव आहे आणि तो दोन्ही साईडकडून आहे. त्यामुळे घाव बीव काही नाही. नो हार्ड फीलिंग्स.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 01/21/2015 - 20:10

In reply to स्वानुभव का ? by विटेकर

Permalink

मला पण एक नकार आला होता ...

मला पण एक नकार आला होता ... इचलकरंजीहून ! तेव्हापासून पुन्हा जन्मात इचलकरंजीला गेलो नाही. वाईट वाटले की इचलकरंजी सारख्या गावातून नकार यावा ???? (बाकी स्थळ काय खासं नव्हते म्हणा !)
हायला...जाज्वल्य अभिमान फक्त एकाच शहराला असावा? बाकी शहरे पानी कम चाय??? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Wed, 01/21/2015 - 17:04

Permalink

पत्रिका ??

बापरे ! हा विषय असेल तर १००० पर्यन्त जाणार !
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 01/21/2015 - 17:13

In reply to पत्रिका ?? by विटेकर

Permalink

विटूकाका

तुमचे मत काय आहे पत्रिकेवर ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Wed, 01/21/2015 - 17:20

Permalink

मुनीश्री

मुनीश्री , हा तुमचा फुल्ल्टॉस वाया जाणार नाही ! अरे , कुणीतरी धोंडोपंताना बोलवा रे ! प्रतिसादासाठी सध्या जागा राखून ठेवत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Wed, 01/21/2015 - 18:23

Permalink

घरी डस्ट्बिन्स आहेस का

घरी डस्ट्बिन्स आहेस का यासारखेच ऐकलेले एक वाक्य एका उपवर मुलीच्या पित्याकडुन बढाई मारताना: आमच्या मुलीला सासु-सासरे हवेत पण भिंतीवरचे (४८९ झाले चला रे आज रेकॉर्ड करुनच टाकु ५०० चे)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 01/21/2015 - 20:12

In reply to घरी डस्ट्बिन्स आहेस का by सौंदाळा

Permalink

कहर...अशा वेळी आपणही घरातला

कहर...अशा वेळी आपणही घरातला कोयता घेउन यावे आणि म्हणावे...चला आमच्या मुलाचीसुध्धा हिच इच्छा आहे तेव्हा तुमच्या पासूनच सुरवात करु ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 01/21/2015 - 22:21

In reply to कहर...अशा वेळी आपणही घरातला by टवाळ कार्टा

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 01/21/2015 - 18:27

Permalink

४९०. आता तरी थांबा रे

४९०. आता तरी थांबा रे मेल्यांनो. सहा पाने पाहिलेला हा मिपावरचा पहिलाच धागा असावा. आज काळे काकांच्या धाग्यावर देखील मात झाली म्हणायची. सुंदरच.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Wed, 01/21/2015 - 18:33

Permalink

आता तरी थांबा रे मेल्यांनो.

आता तरी थांबा रे मेल्यांनो.
पाहता काय सामिल व्हा...फक्त १०च प्रतिसाद पाहिजेत. *HAPPY*
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 01/21/2015 - 18:33

Permalink

संमंला एक कळकळीची विनंती.

संमंला एक कळकळीची विनंती. प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज ५०० होऊद्या. मग नंतर पायजे तेव्हा बूच मारा.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 01/21/2015 - 18:35

In reply to संमंला एक कळकळीची विनंती. by बॅटमॅन

Permalink

हो ना. आधीच इनिंग्स डिक्लेर

हो ना. आधीच इनिंग्स डिक्लेर करू नका...
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • …
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • पान 10
  • पान 11
  • पान 12
  • पान 13
  • पान 14
  • पान 15
  • …
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com