Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367191
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

To make a woman happy a man only needs to be : 1. a friend 2. a companion 3. a lover 4. a brother 5. a father 6. a master 7. a chef 8. an electrician 9. a carpenter 10. a plumber 11. a mechanic 12. a decorator 13. a stylist 14 . a gynaecologist 16. a psychologist 17. a pest exterminator 18. a psychiatrist 19. a healer 20. a good listener 21. an organiser 22. a good father 23. very clean 24. sympathetic 25. athletic 26. warm 27. attentive 28. gallant 29. intelligent 30. funny 31. creative 32. tender 33. strong 34. understanding 35. tolerant 36. prudent 37. ambitious 38. capable 39. courageous 40. determined 41. true 42. dependable 43. passionate WITHOUT FORGETTING TO: 44. give her compliments regularly 45. love shopping 46. be honest 47. be very rich 48. not stress her out 49. not look at other girls AND AT THE SAME TIME, YOU MUST ALSO: 50. give her lots of attention, but expect little yourself 51. give her lots of time, especially time for herself 52. give her lots of space, never worrying about where she goes IT IS VERY IMPORTANT: 53. Never to forget: * birthdays * anniversaries * arrangements she makes HOW TO MAKE A MAN HAPPY : 1 . Leave him in peace

बाकी मुलींच्या अपेक्षांबद्दल नावं ठेवणार्या कोणीच कमी शिकलेली,गृहिणी बनून घर सांभाळेल अशी मुलगी चालेल लिहिलेले दिसले नाही हे एक निरिक्षण. चारशेसाठी मारलेला धक्का!!

In reply to by अजया

हल्ली कमी शिकलेल्या मुली शक्यतो सापडतं नाहीत. आणि सापडल्या तरी शिकल्या सवरलेल्या मुलांशी त्यांचे विचार पटतीलचं असं नाही. मॅरी इन लीग. ज्यांची वैचारिक पातळी जुळते अश्यांनी एकमेकांशी शि़क्षण मधे नं आणता लग्नं केलं तर काही हरकत नाही. (हा मुद्दा कमी शिकलेली मुलगी आणि उच्चशिक्षित मुलगा आणि वाईस व्हर्सा लागु आहे) आणि शिकलेल्या मुलींनी आपलं शिक्षण स्वयपाकघर, भांडी-कुंडी आणि इडीयट बॉक्स मधल्या कुबौद्धिक हाणामार्‍यांमधे घालवु नये असं माझं मत आहे. त्या ऐवजी स्वतःच छान करीअर उभं करावं. हवं तर त्यातुन मिळणार्‍या पैश्यांमधुन स्वतःच्या आईवडीलांना सुद्धा आर्थिक मदत करावी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ज्यांची वैचारिक पातळी जुळते अश्यांनी एकमेकांशी शि़क्षण मधे नं आणता लग्नं केलं तर काही हरकत नाही. >>> हेच तर आहे ना! पण अजुनंही विवाह-सहजीवनात शिक्षण हा निरर्थक मुद्दा मधे का आणतात? कोणतं भय असतं त्यामागे..की निव्वळ प्रतिष्ठेची हौस असते? मला अजूनंही कळलेलं नाही. मुळात...सहजीवनाचा आणि शिक्षणाचा संबंधच काय???

In reply to by अत्रुप्त आत्मा

खरे आहे. त्या ऐवजी इमोशनल इंटेलिजंस किती आहे हा मुद्दा आणला पाहिजे. त्याचे महत्त्व जास्त आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

ज्यांच्या वैचारिक पातळ्या जुळु शकतील अश्यांच्या बाबतीत शिक्षण हा दुय्यम मुद्दा ठरेल. पण असं जोडपं कदाचित लाखामधे एखादंचं असेल. एखाद्या एम.एस. करुन आलेल्या मुलीचं किंवा मुलाचं दहावी पास झालेल्या जोडीदाराशी कितपत जुळु शकेल? जो एम.एस. झाला असेल त्याला सुपियारिटी काँप्लेक्स आणि दुसर्‍याला न्युनगंड वाटणारचं हे सत्य आहे. माझ्या एका इंजिनिअर मित्राचं (बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स/ एम.टेक इंडस्ट्रिअल ऑटोमेशन) चं लग्नं (प्रेमविवाह) एम.कॉम केलेल्या मुलीशी झालं. टेक्निकली दोघही पोस्ट ग्रॅजुएट आहेत. पण जेव्हा कधी भांडतात तेव्हा शिक्षणाचा मुद्दा येतोचं मधे. :(

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@जो एम.एस. झाला असेल त्याला सुपियारिटी काँप्लेक्स आणि दुसर्‍याला न्युनगंड वाटणारचं हे सत्य आहे. >> पण हा असा वाटुन घेतात कशाला मुळात? हे जे काहि 'शिक्षण' असतं.याचा माणासाच्या उच्च नीचतेशी ,हुशार किंवा मठ्ठ असण्याशी काहिही संबंध नसतो. मग तरी ह्या निरर्थक गोष्टीला महत्व जर का कुणी देत असेल.तर तो त्याचा दोष आहे. @टेक्निकली दोघही पोस्ट ग्रॅजुएट आहेत. पण जेव्हा कधी भांडतात तेव्हा शिक्षणाचा मुद्दा येतोचं मधे.>> हेच्च तर ते! ते तो-आणतात..भांडणात एक सोइचा-उपाय म्हणून!!! मुळात सहजिवनाची मुल्य व्यक्तिंच्या परस्पर स्वभाव-मेलनाशी निगडीत असतात. तेच आहे की नाही? ते पाहायचं नाही..आणि माझ्या इतकं किंवा तेव्हढच शिक्षण ह्याचंही झालय..ही अनावश्यक निरर्थक गोष्ट पाहायची...मग असच होणार! सहजीवनात जे खरच लागतं ते पहायचं नाही, आणि लागत नाही तेच पाहायचं...म्हणजे बेसिक मधेच फॉल्ट ..करुन घ्यायचा म्हटल्यावर, असं होणारच. मी तर म्हणेन (अश्या केसेस मधे) त्यांचं-लग्न झालेलच नव्हतं.. तर आता तुटलं तरी कश्याचा आधारे म्हणायचं? :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

हे जे काहि 'शिक्षण' असतं.याचा माणासाच्या उच्च नीचतेशी ,हुशार किंवा मठ्ठ असण्याशी काहिही संबंध नसतो. मग तरी ह्या निरर्थक गोष्टीला महत्व जर का कुणी देत असेल.तर तो त्याचा दोष आहे.
१००% सहमत !!

In reply to by अत्रुप्त आत्मा

वाटुन घेतं नाही हो गुर्जी. वाटला जातो. किती नाही म्हणलं तरीसुद्धा ही अत्यंत नैसर्गिक रितीनी घडणारी गोष्ट आहे. बाकी सगळ्या प्रतिसादाशी सहमत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

>> तरी ह्या निरर्थक गोष्टीला महत्व जर का कुणी देत असेल.तर तो त्याचा दोष आहे.
शिक्षण ही निरर्थक गोष्ट आहे? कशी काय ब्वॉ?? समजून घ्यायला आवडेल.

In reply to by सूड

बाळ सप्रे म्हणातात ,तोच आशय आहे माझ्या सांगण्याचा...तरिही आपाणास ते प्रथम दर्शनी तसं वाटावं..याला माझा काहिच इलाज नाही.

In reply to by अजया

कोणीच कमी शिकलेली,गृहिणी बनून घर सांभाळेल अशी मुलगी चालेल लिहिलेले दिसले नाही
कमी शिकलेल्या मुलाला त्याच्यासारखीच कमी शिकलेली मुलगी चालण्यात काही प्रत्यवाय नसावा. पण शिकलेल्या मुलग्यांनी कमी शिकलेली मुलगी का पसंत करावी? ती फक्त घर चालवेल म्हणून? घर चालवायला हाऊसकीपर मिळतात की! आणि ती कमी शिकलेली मुलगी आजच्या ऑन लाईन २१व्या शतकातल्या जमान्यात घर कितीसं एफिशियंन्टली चालवू शकेल? मुळात शिकलेल्या मुलाला त्याचे विचार किमान समजू शकणारी सहचारिणी हवी असं वाटलं तर त्यात काय चूक आहे? आणि ह्या कमी शिकलेल्या मुलींना (मॅट्रिक पास समजू) चौथी पास मुलगा चालतो का? मग तो सुखवस्तू घरातला असला तरी?

In reply to by पैसा

शिक्षण हे माणसाला अधिक व्यापक विचार करायला, स्वतःची बुद्धी चालवायला उद्युक्त करतं यावर जर सहमती असेल तर शिक्षणाचा संसारात बराच काही उपयोग असतो. आणि अल्पशिक्षीत माणसंच घर चालवू शकतात वा नाती जोडू आणि टिकवू शकतात असं काही नसतं. उच्चशिक्षित लोकंही ते करू शकतातच! नाती जोडणं वा टिकवणं हे माणसाच्या स्वभावावर अवलंबून असतं, त्याच्या शिक्षणावर नाही. किंबहुना मी थोड्या धाडसाने असं म्हणेन की शिक्षीत माणसं ही त्यांच्या ज्ञानाचा आणि बाहेरील जगाचा अनुभव वापरून (आपली पर्सुवेसिव्ह स्किल्स वापरून)नवीन संबंध निर्माण करू शकतात!!

In reply to by पिवळा डांबिस

हांगाश्शी...नायतर लोक शिक्षणाची निंदाच करत होते...शिक्षण नसेल तर दमड्या कमावताना नाकीनऊ येतात. बाकी स्वभाव गेला उडत.

In reply to by पिवळा डांबिस

आणि अल्पशिक्षीत माणसंच घर चालवू शकतात वा नाती जोडू आणि टिकवू शकतात असं काही नसतं
असं नाहीच ना!
नाती जोडणं वा टिकवणं हे माणसाच्या स्वभावावर अवलंबून असतं, त्याच्या शिक्षणावर नाही.
हेच तर म्हणतेय! शिक्षण हाच एकमेव क्रायटेरिया आहे का? की अनेक गोष्टींपैकी एक घटक आहे? उदा. त्या मेक्यानिकल इंजिनिअर आणि आयटीवालीचं उदाहरण वाचलं आणि फिस्सकन हसू आलं. की "आपलं कसं काय होणार?" या उदाहरणातले दोघेही उच्चशिक्षित आहेत. पण "सुशिक्षित" असतीलच असं नाही. मात्र मेक्यानिकल इंजिनिअर किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअर अगदी पीयच्डी झाला किंवा झाली तरी त्याला / तिला बांगडे फ्राय करताना त्या पीयच्डीचा किती उपयोग असतो? तिथे वेगळं स्किल लागतं ना!

In reply to by पैसा

शिक्षण हाच एकमेव क्रायटेरिया आहे का?
शिक्षण हाच एकमेव क्रायटेरिया आहे असं मी कुठेच म्हटलेलं नाही. परंतु शैक्षणिक अनुरूपता हा एक अत्यंत महत्वाचा क्रायटेरिया आहे याबद्दल काहीही संशय नाही. उच्चशिक्षीत व्यक्ती ही सुशिक्षीत असू वा नसू शकते पण अल्पशिक्षित व्यक्ती कधीच सुशिक्षित असू शकत नाही. (मी सुशिक्षित हा शब्द वापरतोय, सुसंस्कृत हा नाही).
बांगडे फ्राय करताना त्या पीयच्डीचा किती उपयोग असतो?
संसार हा 'सहजीवन' म्हणून करायचा असेल तर वधू-वरातील शैक्षणिक अनुरूपता ही आवश्यक असते. नुसती फक्त 'पेजेला आणि शेजेला' बायको हवी असेल तर ती अल्पशिक्षित असण्याचीही जरूर नसते, अशिक्षितही चालेल! आपल्याकडे जुन्या काळात बहुतेक संसार(?) दुर्दैवाने तसेच झाले आहेत.....

In reply to by पिवळा डांबिस

नुसती फक्त 'पेजेला आणि शेजेला' बायको हवी असेल तर ती अल्पशिक्षित असण्याचीही जरूर नसते
हे मी कधी कुठे म्हटलेलं नाही. बांगडे फ्राय करायचं फक्त उदाहरण दिलंय. संसारात अशा अनेक गोष्टी असतात की जिथे आपल्या अकॅडेमिक शिक्षणाचा काहीही संबंध नसतो.
अल्पशिक्षित व्यक्ती कधीच सुशिक्षित असू शकत नाही.
१९५६ सालची एक गोष्ट सांगते. माझ्या आईवडिलांचं लग्न झालं तेव्हा वडील इंटर आर्ट्स आणि आई म्याट्रिक डी एड होऊन नोकरी करत होते. आताच्या दृष्टीने पाहता ते अल्पशिक्षितच. पण त्या १९ वर्षाच्या मुलीने सासूसासरे, ३ दीर, नंतर झालेली ३ मुले असा सगळा संसार सांभाळत पुढे शिकायची आस धरली. लग्नानंतर संसार नोकर्‍या मुलेबाळे करत ते दोघेही शिकत राहिले. दोघेही एम.ए. बी एड. पर्यंत शिकले. आता हे शिक्षण फार मोठे वाटणार नाही, पण एकूण परिस्थितीचा विचार करता ही फार मोठी झेप होती. साधा स्वयंपाक म्हणजे तेव्हा चूल, खलबत्ते, पाटेवरवंटे यांच्याशी मुकाबला असायचा. या सगळ्याशी सामना करून त्या दोघांनी हे कसं साध्य केलं असेल माहीत नाही. सहा दिवसाच्या मुलीला हॉस्पिटलमधे ठेवून माझी आई हॉस्पिटलमधून बी ए चा पेपर द्यायला गेली होती! ही शिक्षणाबद्दलची कमिटमेंट! त्यांच्या तुलनेत आम्हाला भरलेलं ताट समोर येतं पण तरी ते गिळता येत नाही! आज मी जी काही आहे ती या दोघांमुळेच आहे. त्यांचं लग्न झालं तेव्हा दोघेही अल्पशिक्षित असूनही त्यांच्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ होत्या. अनेक बाबतीत ते काळाच्या पुढे होते. आणि एका दुर्गम खेड्यात रहायला जाऊनही त्यांना जगाबरोबर रहायची आवड होती. महत्त्वाचं म्हणजे ते त्यांच्या पिढीला अपवाद नव्हते! नवीन स्वातंत्र्य मिळालेल्या काळची ती त्यांची पिढीच अशीच ध्येयचादी, शिक्षणासाठी काहीही करणारी होती. आता आपल्याला शिक्षणासाठी फक्त पैशाची सोय करावी लागते, पण तेव्हा पैसा ही फार नंतर विचार करायची गोष्ट होती. तात्पर्य काय,
अल्पशिक्षित व्यक्ती कधीच सुशिक्षित असू शकत नाही.
याला काही आधार नाही. शिक्षण आणि विचारशक्ती, सामाजिक भान याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. कित्येकदा अगदी अशिक्षित लोकांकडूनही मी कमालीचे पुरोगामी विचार ऐकले आहेत!! शिक्षण, पैसा हे सगळं कधीही मिळवता येतं. ते प्रत्येक माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. आणि त्याबाबतीत ठराविक असे ठोकताळेही मांडता येणार नाहीत. तसंच एखादं नातं निर्माण करणं आणि ते फुलवणं, टिकवणं यातही इतर अनेक गोष्टींचा हातभार असतो. एकच एक पद्धत सगळीकडे लागू होईल असेही नाही!

In reply to by अत्रुप्त आत्मा

शिक्षण आणि विचारशक्ती, सामाजिक भान .... ..याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही." आणि पैशाच्या सुद्धा नाही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

In reply to by पैसा

संसारात अशा अनेक गोष्टी असतात की जिथे आपल्या अकॅडेमिक शिक्षणाचा काहीही संबंध नसतो.
अनेक काय हो जवळजवळ सगळ्याच गोष्टींमधे अकॅडेमिक शिक्षणाचा काहीही संबंध नसतो.

In reply to by पैसा

माझ्या प्रतिसादातला मुद्दा हा "शिक्षणातली परस्पर अनुरूपता" हा आहे. सहजीवनात त्याचं महत्व आहे असं माझं प्रतिपादन आहे. माणूस अल्पशिक्षीत असलं म्हणजे संसार होत नाहीत असं मी म्हंटलेलं नाही. दोघेही जर अल्पशिक्षीत असतील तरी त्यांच्या स्वता:च्या समजुतीप्रमाणे ते संसार करणारच की! आणि अल्पशिक्षणात जर एकमेकाला अनुरूप असतील तर ते एक त्या प्रकारचं सहजीवनही होईल. प्रश्न हा जर शिक्षणात अनुरूपता नसेल (कारण माझा मूळ प्रतिसाद उच्चशिक्षीत मुलांना अल्पशिक्षीत मुलींशी लग्न करायला काय अडचण आहे? यावर होता)तर सहजीवन कसं होईल हा आहे.
संसारात अशा अनेक गोष्टी असतात की जिथे आपल्या अकॅडेमिक शिक्षणाचा काहीही संबंध नसतो.
करेक्ट! पण संसारात अशाही अनेक गोष्टी असतात की जिथे आपल्याला आपल्या शिक्षणापासून मिळालेल्या विचारशक्तीचा खूप उपयोग असतो.
माझ्या आईवडिलांचं लग्न झालं तेव्हा वडील इंटर आर्ट्स आणि आई म्याट्रिक डी एड होऊन नोकरी करत होते. आताच्या दृष्टीने पाहता ते अल्पशिक्षितच.
त्या वेळी (त्यांच्या लग्नाच्या वेळी) ते जरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे अल्पशिक्षीत असले (तुमच्या म्हणण्याप्रमाणे कारण त्या काळी हे शिक्षण अल्प समजलं जात नसे. एका काळाच्या फूटपट्ट्या दुसर्‍या काळाला लावायच्या नसतात.) तरी शिक्षणाने एकमेकांना अनुरूप होते. एक जण एमे आहे आणि दुसरं शाळा नापास अशी परिस्थीती तर नव्हती ना! लग्नानंतर पुढे खूप शिकून त्यांनी नांव कमावलं हा त्यांच्या महत्वाकांक्षेचा भाग झाला आणि त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे! संसारात सो कॉल्ड प्रॉव्हर्बियल बांगडे फ्राय करणं तर अनाव्हॉयडेबल असतंच पण त्यापुढेही काही असतं हे त्यांनी जाणलं आणि परिश्रम करून ते मिळवलं यासाठी त्यांचं जास्त कौतुक आहे. तुम्ही त्यांना विचारून पहा, मी सांगतो त्यापेक्षा वेगळं काही ते सांगतील असं मला वाटत नाही..... एनिवे, मला काय वाटतं ते मला वाटतं मी पुरेसं स्पष्ट मांडलेलं आहे. कुणाला पटेल, कुणाला नाही पटणार. जर अजूनपावेतो मी कुणाला माझी बाजू समजावून देऊ शकलो नसलो तर आणखी माझ्याकडे काही नाही. आणि आता मला या विषयावर टंकायचा टंकाळा (बघितलंत, माझा कळफलकही टंकाळला!!) आलाय तेंव्हा माझ्यातर्फे लेखनसीमा! मात्र पुढे कधी गोव्याला आलो की तुमच्याकडे बांगडे खायला येण्याचं निमंत्रण समजून ते राखून ठेवत आहे. :)

In reply to by पिवळा डांबिस

तरी नाय पटलं! पुन्हा माझ्या घरातलं, माझे एल एल बी झालेले आजोबा आणि शाळेत न गेलेली आजी यांचं उदाहरण दिलं असतं. पण सगळंच आत्मचरित्र नको म्हणून गप बसते आता. मात्र *शिक्षण आणि विचारशक्ती, सामाजिक भान यांचा काही संबंध नसतो *यशस्वी संसार, सहजीवनासाठी दोघांचं एकसारखं/अनुरूप शिक्षण अजिबात आवश्यक नसतं यावर मी ठाम आहे. बांगडे रशेद करून देण्याचं आमंत्रण अर्थातच कायम आहे. कधी येताय? :D

In reply to by पैसा

"शिक्षण आणि विचारशक्ती, सामाजिक भान यांचा काही संबंध नसतो.यशस्वी संसार, सहजीवनासाठी दोघांचं एकसारखं/अनुरूप शिक्षण अजिबात आवश्यक नसतं." सहमत (डॉ.आजोबा आणि ४बुके शिकलेल्या आज्जीच्या सर्वोत्तम सहजीवनाचा साक्षीदार) मुवि

In reply to by मुक्त विहारि

chemistry मध्ये catalyst असतो.. तो main reaction मधे मध्ये कधीच भाग घेत नाही पण reaction ला मदत करत असतो !! शिक्षणाचे आयुष्यातील स्थान हेच आहे...

In reply to by पैसा

आपण शाळा कालेजात जे शिकतो त्याचा घरात, किंवा नाती जोडताना आणि टिकवताना किती उपयोग अस्तो?
मान्य आहे की सगळंच नसतं उपयोगाचं!! पण सहज गप्पांमध्ये अमक्या तमक्या वेळी वाचल्या गोष्टीचा रेफरन्स देऊन काही बोललं तर ते तिला/त्याला समजायला नको? कोणत्याही नात्यात संभाषण महत्त्वाचं असतं हो, बेसिक मध्येच लोच्या असेल तर गाडी पुढे जायची कशी? समजून घ्यायची तयारी असेल तर ठीक आहे, पण हे समजून घ्यायची तयारी सगळ्यांचीच असेल असं नाही ना!! आधीच एकमेकांची शैक्षणिक पार्श्वभूमी माहित असताना भांडणात केवळ एकमेकांचा उद्धार करायला ती वापरणं चूक आहे हे मान्य!! पण शिक्षण अगदी निरर्थक ठरवणं काही पटत नाही ब्वॉ.

In reply to by सूड

+१ शिक्षणाला महत्व नसेल तर चौथी पास मुलगी आणि पी.एच.डी मुलगा सुखाने नांदतील.. पण तसं होत नाही.. विचारांची लेव्हल तर शिक्षणाने नक्कीच बदलते..

In reply to by अजया

जेपीभौ अदृश्य असल्याने आम्ही डॉ. खरे, टवाळ कार्टा आणि आजानुकर्णाचा अक्षता देऊन सत्कार करत आहोत.

In reply to by पैसा

पै तै .. आनी आमी ?? *unknw* आमच्या खारीच्या वाट्याची नोंद न घेतल्याबद्दल णिशेढ .. !! (ता.क. आम्हास अक्षता नको.. टकाला द्या..)

In reply to by टवाळ कार्टा

तुझ्याहुन दोन यत्ता जास्त, ते पण एकदा पण केटी नं लागता =)) (ह.घे. रे) गर्ल्फ्रेंड नसण्यापे़क्षा केटी लागणं लै जास्त सेन्सिटिव्ह टॉपिक आहे.

In reply to by टवाळ कार्टा

के टी आणि डीस्तीन्क्षन काय घेऊन बसलायत? एक लक्षात ठेवा काही जण "खूप" शिकतात. काही जण "खुपदा" शिकतात. शेवटी शिकल्याशी मतलब.

In reply to by टवाळ कार्टा

नशिबवान आहेस. =)) पोरगी आणि डिस्टिंक्शन मिळायला नशिब लागतं. मेरेकु थ्रु-आउट डिस्टिंक्शन (बी.ई. ला रँक) विथ वाय डी आहे पुणे युनिव्हर्सिटीच्या कुरुपेनं. एम ३ च्या आवशिचा घोवं!!!

In reply to by सूड

आपल्याकडे एक म्ह्ण आहे की ओ बोलणार्‍याची माती विकली जाते, आणि नं बोलणार्‍याचं सोनही पडुन राहतं अश्या अर्थाची. झैरात आणि मार्केटींग केल्याशिवाय कै होत नै ओ मार्केटात. तुमची करायचीये का झैरात? मी आणि टक्या झैरात एजन्सी चालु कर्तोय.

In reply to by टवाळ कार्टा

नाव भारीये रे. चल तुझा प्रॉफिटमधे १% वाढवला. आता तु "दो टक्के का पार्टनर" =))

लोक परंपरा-नातीगोती विसरुन आधुनीक झाली आणी असले प्रकार चालु झाले. पुर्वी एखादी नवी नवरी लग्न होऊन सासरी आली की नणंद दारात अडवुन विचारायची" सोडते आत तुला,काय देणार मला?" याचर खमकी वहिनी पण" होतील मला पोरी,तेंव्हा देईन तुमच्या घरी..!!" असे उत्तर द्यायची. मामाची मुलगी पटवणे याच प्रकारात मोडते. आता काळ थोडा बदलला आहे,त्यामुळे मामाची मुलगी न पहाता आत्याला मुली आहेत का ? याचा शोध घ्यावा. आत्याला नसतील तर तिच्या नंणदेला आहेत का हे पहावे. तात्पर्य आधी नात्यात शोध घ्यावा नंतर इतरत्र मुली शोधत फिरावे. एकदा मुलगी सापडली कि तिला कसे पटवायचे हे आप आपल्या कुवतीवर ठरवावे. बस,ट्रेन ओर लडकी या सारखे छपरी डॉयलॉग रील लाईफ चांगले वाटतात रीयल लाईफ मधे नाही. . .. . हा प्रतिसाद आपल्या आपल्या कुवतीवर वापरावा.जबाबदारी माझी नाही. प्रेमात पडल की शिक्षण सारखे मुद्दे आपोआप बाद होतात.

In reply to by जेपी

लोक परंपरा-नातीगोती विसरुन आधुनीक झाली
याच्यामुळेच मुलींची परिस्थिती चांगली झालीय...त्याचे साईड इफेक्ट म्हणजे त्या आता डोक्यावर बसतात

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हे आण्भवाचे"च" बोल आहेत...पण माझ्या नाही दुसर्यांच्या...मी फक्त मेसेंजर ;)

याच्यामुळेच मुलींची परिस्थिती चांगली झालीय...त्याचे साईड इफेक्ट म्हणजे त्या आता डोक्यावर बसतात अरे बाकीचा प्रतिसाद पकड..

१२:४९ नंतर १४:४० म्हणजे जवळजवळ २ तास एकही प्रतिसाद नाही ... एक मिपाकर म्हणून शरम...........

पत्रिका बघण्याचा फॅड , आधी जाती , पोटजाती, मग नाड , गोत्र , राशी ( यात षडाष्टक आणि उपाध्ये ) आणि मग गुण जुळायला लागतात. काही जातींमध्ये पदर जुळावा लागतो म्हणे म्हणजे काय तर कुठुन तरी नाते असावे किंवा खानदानच्या प्युअरपणा लागतो .. आता एवढ्या सगळ्या गाळण्यामधून ज्या काय पोरी राहतील ..तिथून पुढे रंग , उंची, बांधा , रूप , हे झाला की शिक्षण , आर्थिक परिस्थिती यांचे मॅचिंग होते .. य्यानंतर मग शेवटी वर- वधू भेटतात आणि स्वभाव जमतो कि नाही ते बघायचा ! शिंगरू आधीच्या फिल्टर मध्येच दमलेला असतय ! बादवे , एवढे असूनसुद्धा सर्व मंगल कार्यलये ६ महिने अगोदरच फुल्ल असतात . म्हणजे या दिव्यांतून पार पडून सर्वांची लग्ने होतात असे दिसते :)

In reply to by कपिलमुनी

बादवे , एवढे असूनसुद्धा सर्व मंगल कार्यलये ६ महिने अगोदरच फुल्ल असतात . म्हणजे या दिव्यांतून पार पडून सर्वांची लग्ने होतात असे दिसते
लोकसंख्या १२० कोटी असलेल्या देशात कितीही नखरे केले तरी लोकांची कमतरता तितकीशी जाणवत नसावी बहुधा.