Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367191
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

In reply to by आदूबाळ

अग्दी अग्दी...पण ब्यानर कुटांय :( अवांतर - मुविंना त्यांच्या धाग्याने इतिहास घडवलाय त्याचा पत्ता आहे का? ;)

परंतु संसार चांगला होण्यासाठी दोघात सामन्जस्य असणे जास्त आवश्यक आहे. बाकी रूप पैसा कुटुंब इ सर्व गोष्टी दुय्यम आहेत.
संसार चांगला होण्यासाठी शरीरसंबंध बाबतीतील कंपॅटीबिलीटी, आवडनिवड हा मुद्दा कोणीच मांडला नाही हे बघुन आश्चर्य आणि खेद वाटला. लग्न करण्यामागे ( at least पुरुषांच्या मनात ) sex partner मिळवणे हा सर्वात महत्वाचा हेतू असतो ( असे माझे मत आहे ). जर हे खरे असेल तर रुप, वजन ह्या गोष्टी महत्वाच्या ठरत नाहीत हे खरे आहे का? फक्त स्वभाव फार छान आहे म्हणुन ८०-९० किलोची मुलगी कोणी पसंत करेल का?

In reply to by प्रसाद१९७१

शिव शिव शिव असे लिहिताच कसे तुम्ही...लग्नासाठी मुलगी बघताना मुलीचा physical appearance याबद्दल मुलाने अपेक्षा ओपनली दाखवू नये...नाहीतर त्याच्यावर materialistic असा शिक्का बसतो मुलीकडून...मग भले मुलीच्या अपेक्षेत २ बिएचके फ्लॅट असून्दे...

In reply to by टवाळ कार्टा

अगदी अगदी..........वर असं बोलल्यावर 'इतकी वर्षे पोरांनी माज केला, पोरींनी आता जरा माज इन रिटर्न दाखवला तर बिघडलं कुठं' इ.इ. अर्ग्युमेंट्स आहेतच.

In reply to by टवाळ कार्टा

मुलाचा टक्कल , सुटलेले पोट या गोष्टी मुली बघतातच .. मुलांनी physical appearance वर टिप्पणी केली तर लगेच materialistic !!

In reply to by टवाळ कार्टा

टका आणि प्रसाद, या बाबतीत अंशतः असहमत. कारण की,
संसार चांगला होण्यासाठी शरीरसंबंध बाबतीतील कंपॅटीबिलीटी, आवडनिवड हा मुद्दा कोणीच मांडला नाही हे बघुन आश्चर्य आणि खेद वाटला.
हे मान्य. म्हणूनच टकाने लिव-इन बद्दल मांडले तेव्हा त्याला समर्थन दिले होते. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि शक्य झाल्यास जाणून घेणे ही गरजेचे आहे हे ही मान्य. पण म्हणून,
लग्न करण्यामागे ( at least पुरुषांच्या मनात ) sex partner मिळवणे हा सर्वात महत्वाचा हेतू असतो ( असे माझे मत आहे ). जर हे खरे असेल तर रुप, वजन ह्या गोष्टी महत्वाच्या ठरत नाहीत हे खरे आहे का? फक्त स्वभाव फार छान आहे म्हणुन ८०-९० किलोची मुलगी कोणी पसंत करेल का?
हे कसे मत तयार केलेत ? सेक्स ही दोन्ही बाजूंची गरज आहे हे प्रथम स्वीकारले पाहिजे (म्हणजे मुलींनी देखील हा आपल्याला "अनुरुप"आहे का हे पाहणे चूक समजू नये ) पण आणि फक्त पुरुषांसाठी हा "सर्वात महत्वाचा हेतू" असतो असे म्हणणेच अगदीच गैर आहे. दुसरा मुद्दा असा की फक्त सुंदर मुलगी/मुलगा असेल तर सेक्स साठी अनुरुप होतो हे कसे ठरवलेत हो ? ह्यात भावनिक अनुरुपता हा खूप मोठा मुद्दा आहे. जर स्त्रीची(अथवा पुरुषाची) इच्छा नसेल तर प्रणयाराधन अतिशय यांत्रिक आणि नीरस असणार (थोडे अतिशयोक्ती करून सांगतो, जणु सेक्स डॉलच मग). इथे तीच व्यक्ती तुमची प्रिय असेल, तुम्हाला हवा तसा प्रतिसाद देत असेल, तुम्हाला आनंद देत असेल तर "८०-९० किलोची मुलगी" अप्सरेस लाजवेल. तो समागम असेल. टका "materialistic" अपेक्षांबद्दलचा दृष्टीकोन समजू शकतो पण म्हणून फ्लॅटची तुलना मुलीच्या "physical appearance"ची कशी होईल राव.

In reply to by हाडक्या

टका "materialistic" अपेक्षांबद्दलचा दृष्टीकोन समजू शकतो पण म्हणून फ्लॅटची तुलना मुलीच्या "physical appearance"ची कशी होईल राव.
का नाही होणार? अनादि काळापासून स्त्रीचे सौंदर्य आणि पुरुषाचे सामर्थ्य यांचीच जोडी लागत आलेली आहे. काळानुरूप शारीरिक सामर्थ्याचे रूपांतरण फ्लॅट, इ. मध्ये झाले इतकेच.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन भौ, "का नाही होणार?" या प्रश्नाच्या उत्तरासाठी अनादि काळापासून काय होतय याचा संदर्भ देण्यापेक्षा, तुम्हाला काय "बरोबर्/योग्य/rational" वाटते त्या मुद्द्यांचा वापर केलात तर बोलता आले असते. बर्‍याच गोष्टी अनादि काळापासून होतात म्हणून योग्य ठरत नाहीत ना.

In reply to by हाडक्या

मटेरिअलिस्टिक अपेक्षांमध्ये शरीरविषयक अपेक्षांचा समावेश होत नाही का? नसेल तर का? फ्लॅट इ. बद्दल काही बोलले की ते साधेसुधे मटेरिअलिस्टिक आणि रंग, फिगर, इ. बद्दल काही बोलले की पर्व्हर्ट असे काही क्लासिफिकेशन आहे का?

In reply to by बॅटमॅन

मटेरिअलिस्टिक अपेक्षांमध्ये शरीरविषयक अपेक्षांचा समावेश होत नाही का?
होतोच की.. तेच तर टका पण म्हणतोय ना ब्याट्या. मी म्हणतोय की, फक्त सुंदर, सुडौल मुलगी असली म्हणजे भारी सेक्स असेल हा एक ठोकताळा म्हणून पण येडपट सिद्धांत आहे. समागम अनुरुपता एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याला सगळ्यात कमी महत्त्व दिले जाते. आता आपल्या बाबतीत ते कसे जाणून घ्यायचे, त्याचे रस्ते ज्याचे त्याने शोधावेत. ;)

In reply to by हाडक्या

मी म्हणतोय की, फक्त सुंदर, सुडौल मुलगी असली म्हणजे भारी सेक्स असेल हा एक ठोकताळा म्हणून पण येडपट सिद्धांत आहे.
अगदी डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी ष्ट्राँग कोरिलेशन नाहीच असं म्हणवतं का ओ तुम्हांला या केसमध्ये ;)

In reply to by बॅटमॅन

डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी ष्ट्राँग कोरिलेशन नाहीच
डिरेक्ट कॉजेशन नसलं तरी ष्ट्राँग कोरिलेशन नाहीच असे म्हणता येणार नाही हे मान्य. सुंदर पोरगी दिसली की आपण आकर्षित होतोच की. (अगदी घरी बायको पूर्ण समाधान देत असेल तरीही!) पण ते एक नर म्हणून बाय नेचर आहे. ती सुंदर मुलगी तुम्हाला "सुंदर अनुभव" देऊ शकेल याची त्यात कोणतीही शाश्वती नाही (पण इतर सगळे "फीट" असेल तर तुम्हाला पोरे-बाळे होतील, दॅट इज एक्स्पेक्टेड रिजल्ट बाय नेचर ;) ). म्हणून "ष्ट्राँग कोरिलेशन" असले तरीही ते समागम अनुरुपतेसाठी "कंक्लुजिव" नक्कीच नाही हे म्हणायचेय, जे प्रतिसादकर्त्याला म्हणावयाचे होते. आता तुम्हाला याबद्दल (समागम अनुरुपता) काय वाटतेय ते साध्या शब्दात व्यक्त करा बघू . :)

In reply to by हाडक्या

आपण आकर्षित होतोच
बरोबर आहे सायबा, मी तेच तर म्हणतोय. आकर्षितच होउ शकलो नाही तर कसला नंतर सुंदर अनुभव वगैरे. सुरुवात तर आकर्षणातुनच होणार ना.

In reply to by हाडक्या

डिरेक्ट कॉजेशन नाही हे अगोदरच कबूल केलेय की. :) त्यामुळे बाकी मुद्याशी सहमत आहे हेवेसांनल. :)

In reply to by हाडक्या

फक्त पुरुषांसाठी हा "सर्वात महत्वाचा हेतू" असतो असे म्हणणेच अगदीच गैर आहे.
"फक्त" शब्द तुम्ही टाकलाय. वर मी ते मत माझे आहे असे लिहीले आहेच.
तुम्हाला हवा तसा प्रतिसाद देत असेल, तुम्हाला आनंद देत असेल तर "८०-९० किलोची मुलगी" अप्सरेस लाजवेल. तो समागम असेल.
पुन्हा माझा पुर्वीचाच मुद्दा. जी गोष्ट लग्ना आधी मोजुन बघता येणार नाही त्या गोष्टी पेक्षा जी मोजुन घेता येइल ती बघावी. उदा - ८०-९० किलोच्या मुली पेक्षा ५०-५५ ची ( ज्याच्या त्याच्या आवडी प्रमाणे आकडे बदलुन घ्या ) चालेल. पुढे काय होइल ती रीस्क दोन्ही केस मधे सारखीच आहे. मग at least जे समोर दिसतय ते तेरी बघुन घ्यावे.

In reply to by प्रसाद१९७१

चला, "फक्त" या शब्दावरून तुम्हाला "benefit of the doubt" दिला. तसेही ते तुमचे मत आहे आणि मला मान्य नाही हे मांडून झालेले असल्याने त्याला सोडून देऊ. दुसर्‍या मुद्द्यासाठी मी आधीच म्हणालोय की म्हणून तर मला लिव-इनचा पर्याय ( ज्यात अर्थातच समागम अनुरुपता गृहित धरलीये) जास्त योग्य वाटतोय आणि मी त्याचे समर्थन करतोय.
पुढे काय होइल ती रीस्क दोन्ही केस मधे सारखीच आहे. मग at least जे समोर दिसतय ते तेरी बघुन घ्यावे
हे दोन्ही बाजूंनी लागू होतेय एवढे ( लग्नाच्या बाजारातला एक घटक म्हणून) मान्य. पण तुम्ही ज्या "शरीरसंबंध बाबतीतील कंपॅटीबिलीटी, आवडनिवड" या त्यापेक्षा जास्त व्यापक आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलत होता त्याला माझं उत्तर होते. नुसते वजन आणि दिसणे पाहून या गोष्टी नै जुळत हो (ते काय T मध्ये U बसवायचे काम नाही फक्त की मी ७० चा आणि ती ५५ ची म्हन्जे झाले ;) ). बाकी विषय मोठ्ठा आहे, जाणते/जाणत्या अजून अणुभवाचे बोल सांगतीलच.

In reply to by प्रसाद१९७१

अहो प्रसादराव, सेक्ससाठी लग्न केलेच पाहिजे वगैरे गैरसमज आजच्या पिढीच्या मनात नाहीत. आजच्या पिढीतले जे मनाने अजूनही मागच्या पिढीत आहेत ते संकेतस्थळीय पब्लिक सोडले तर सेक्स आणि लग्नाचा फारसा संबंध आहे असे आजकाल कोणी मानत नाही.

In reply to by आजानुकर्ण

सेक्ससाठी लग्न केलेच पाहिजे वगैरे गैरसमज आजच्या पिढीच्या मनात नाहीत
तुमचा पूर्ण मान राखुन पाहीजे तेंव्हा,पाहीजे तितके, हक्काच्या, भिती मुक्त , सेफ सेक्स साठी ( आणि बिन खर्चाच्या ) लग्न हाच एकमेव पर्याय आहे. लिव्ह इन पण आहे, पण तो भारतात रुजणे अवघड आहे. आणि लिव्ह इन आणि लग्न ह्यात फक्त तांत्रिक फरक आहे. आजच्या पिढीला वर लिहीलेल्या ३-४ गोष्टी पूर्ण करतील असे काय ऑप्शन आहेत हे माझ्यासारख्या मागास माणसाला सांगा तरी.

In reply to by प्रसाद१९७१

भारतात लग्नाचे अॅवरेज वय आता तिशीपर्यंत आले आहे. १४-१५व्या वर्षी पौगंडावस्थेत आल्यापासून भिन्नलिंगी आकर्षणाच्या भावना सुरु होतात. आता लोक १५ वर्षं कळ काढतात असं म्हणायचंय का? जालावर भरपूर सर्वे उपलब्ध आहेत. तब्बल सत्तर-ऐँशी टक्के पब्लिकला लग्नापूर्वी सेक्सचा अनुभव असतो. एवढं कशाला ओळखीच्या कोणत्याही केमिस्ट-फार्मसिस्टला जाऊन विचारा. अमेरिकेच्या तुलनेत भारतातील कुमारीमातांचे नगण्य प्रमाण पाहता हा सर्व सेक्स सेफच असावा असा माझा अंदाज आहे. लग्नानंतरचा सेक्स बिनखर्चाचा असतो असं कुणी सांगितलंय. लग्नाचा वन टाईम प्रीमियम भरतातच की!

In reply to by आजानुकर्ण

मालक - सेक्स च्या अनुभवासाठी मी लोक लग्न करतात असे म्हणले नाही. मी तुम्हाला ४-५ गोष्टींची यादी दीली होती त्या फक्त लग्न ( किंवा लिव्ह इन ) मधेच मिळतात. हे ते बेनिफिट
पाहीजे तेंव्हा,पाहीजे तितके, हक्काच्या, भिती मुक्त , सेफ सेक्स साठी ( आणि बिन खर्चाच्या )
बिन खर्चाचा म्हणजे तुलनात्मक नगण्य. आणि बायको नोकरी करत असेल तर ...

In reply to by आजानुकर्ण

अमेरिकेच्या तुलनेत भारतातील कुमारीमातांचे नगण्य प्रमाण पाहता हा सर्व सेक्स सेफच असावा असा माझा अंदाज आहे. पुराणकालीन भारतातही कुमारी मातांची प्रकरणे अपवादानेच होती. या अर्थी काँडमचा शोध भारतातच लागला हे सिद्ध करता येउ शकेल.

In reply to by मृत्युन्जय

अग्गागा =)) आपल्या पुराणांत बरेच काही आहे...फक्त ते बाहेर तेव्हाच येते जेव्हा दुसर्या कोणत्यातरी देशातले लोक त्याचा शोध लावतात

इथे शिक्षण कमी म्हणजे अगदी दहावी बारावी पास असं नव्हतं म्हणायचं मला.पण बी ए,बि काॅम झालेल्या कितीतरी मुली असतात ज्याना चांगली नोकरी मिळत नसल्याने घरी असतात.अशा मुलींबद्दल लग्नेच्छु मुलं काय म्हणतात? तसंच माझ्या ऒळखीत काही एम बि ए होऊनही त्यांना गृहिणी असणे,स्वयंपाक करणे अावडते.त्या स्वखुशीने नोकरी करत नाहीत.अशी मुलगी सांगुन आल्यास मुलांचे काय म्हणणे असेल जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by अजया

बी ए,बि काॅम झालेल्या कितीतरी मुली असतात ज्याना चांगली नोकरी मिळत नसल्याने घरी असतात.अशा मुलींबद्दल लग्नेच्छु मुलं काय म्हणतात?
त्याच्या आधी त्याच मुली बी ए,बि काॅम झालेल्या मुलांबद्दल काय म्हणतात हे विचारलेत का? मग जरा वस्तुस्थिती समजेल

In reply to by टवाळ कार्टा

मला लग्नेच्छु मुलांना काय वाटते हेच जाणून घ्यायचे आहे.मुलींना अशा मुलांबद्दल काय वाटते याने मुलांच्या मतात फरक पडणार आहे का?सरळ साधा प्रश्न आहे,डिग्री आहे पण नोकरी नाही,कराविशी वाटत नाही अशा मुलीची निवड मुलं करतात का? मुलींचा वेगळा प्रश्न काढुन सहाशे करता येतीलच!!

In reply to by अजया

डिग्री आहे पण नोकरी नाही,कराविशी वाटत नाही
शिकलो तर त्याचा उपयोग केलाच पाहिजे...अश्या मताचा आहे मी

बाकी रूप पैसा कुटुंब इ सर्व गोष्टी दुय्यम आहेत.
डॉक्टर साहेब * - दुय्यम आहेत हे मान्य आहे पण त्या दुय्यमतेला पण एक थ्रेशोल्ड लिमिट असते. पैसा दुय्यम आहे मान्य पण अपेक्षेपेक्षा कीती कमी चालेल? बेसिक गोष्टी साठी पण जर झगडायला लागत असेल तर बायको अ‍ॅक्सेप्ट करेल का? तसेच रुपाबद्दल पण. प्रत्येकाचे थ्रेशोल्ड लिमिट वेगळे असु शकते हे पण मान्य केले पाहीजे. * : तुम्हाला आवडले नाही तरी डॉक्टर बद्दल माझ्या मनात आदराचीच भावना येते, त्यामुळे साहेब म्हणणारच

पत्रिका बघावी कि नको ? असे कंफ्युज झालेले पालक फार दिसतात आणि मुले पण माझा विश्वास नाही पण आइ बाबा साठी ई कारणे देतात

In reply to by टवाळ कार्टा

इंडीड. म्हणजे मनातून स्थळाला श्या घालायच्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र कुंडलीतल्या ग्रहांवर खापर फोडता येते.

In reply to by बॅटमॅन

बट्ट्मन ... स्वानुभव का ? नै , अंमळ ज्यास्तीचा घाव लागलेसा वाटतो ! मला पण एक नकार आला होता ... इचलकरंजीहून ! तेव्हापासून पुन्हा जन्मात इचलकरंजीला गेलो नाही. वाईट वाटले की इचलकरंजी सारख्या गावातून नकार यावा ???? (बाकी स्थळ काय खासं नव्हते म्हणा !)

In reply to by विटेकर

इचलकरंजी सारख्या गावातून नकार यावा ????
म्हणजे काय ?
बाकी स्थळ काय खासं नव्हते म्हणा
कोल्ह्याला....... ह्.घेणे. :)

In reply to by विटेकर

मला पण एक नकार आला होता ... इचलकरंजीहून ! तेव्हापासून पुन्हा जन्मात इचलकरंजीला गेलो नाही. वाईट वाटले की इचलकरंजी सारख्या गावातून नकार यावा ???? (बाकी स्थळ काय खासं नव्हते म्हणा !)
हायला...जाज्वल्य अभिमान फक्त एकाच शहराला असावा? बाकी शहरे पानी कम चाय??? ;)

बापरे ! हा विषय असेल तर १००० पर्यन्त जाणार !

मुनीश्री , हा तुमचा फुल्ल्टॉस वाया जाणार नाही ! अरे , कुणीतरी धोंडोपंताना बोलवा रे ! प्रतिसादासाठी सध्या जागा राखून ठेवत आहे.

घरी डस्ट्बिन्स आहेस का यासारखेच ऐकलेले एक वाक्य एका उपवर मुलीच्या पित्याकडुन बढाई मारताना: आमच्या मुलीला सासु-सासरे हवेत पण भिंतीवरचे (४८९ झाले चला रे आज रेकॉर्ड करुनच टाकु ५०० चे)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

कहर...अशा वेळी आपणही घरातला कोयता घेउन यावे आणि म्हणावे...चला आमच्या मुलाचीसुध्धा हिच इच्छा आहे तेव्हा तुमच्या पासूनच सुरवात करु ;)

४९०. आता तरी थांबा रे मेल्यांनो. सहा पाने पाहिलेला हा मिपावरचा पहिलाच धागा असावा. आज काळे काकांच्या धाग्यावर देखील मात झाली म्हणायची. सुंदरच.

संमंला एक कळकळीची विनंती. प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज ५०० होऊद्या. मग नंतर पायजे तेव्हा बूच मारा.

वैचारिक पातळी वरून एक किस्सा आठवला. पूर्वी पण केंव्हा तरी टंकला होता. आमचा एक मद्रासी( तामिळ) मित्र आहे. ( आमच्या २ वर्षे मागे आहे आणी आता मोठा कॅन्सर सर्जन आहे ). त्याला एकदा त्याच्या वर्गातील ख्रिश्चन मुलीवरून चिडवत होतो. त्यावर तो आम्हाला( मला आणी माझ्या तेलुगु मित्राला) म्हणाला कि मला अशी सोफिस्तीकेटेड मुलगी नको आहे. मला साधी इडली, वडा, डोसा करणारी मुलगी बायको म्हणून पाहिजे. मी त्याला शांतपणे म्हटले मग तुला एखादी तमिळ मोलकरीण पण चालेल. त्यावर आमचा तेलुगु मित्र म्हणाला अरे तू तिला १००० रुपये दिलेस तर ती बेडरूम मध्ये पण येईल( हि १९९० सालची गोष्ट आहे). तो यावर उसळला. मग त्याला आम्ही समजावले कि वैचारिक पातळी काही गोष्ट असते कि नाही तू एवढा डॉक्टर आहेस. तुझ्या मानसिक पातळीवर असलेलीच मुलगी पाहिजे. काय शिकली आहे ते महत्त्वाचे नाही पण केवळ लग्नाचे वय येईपर्यंत "काहि तरी करायचे" म्हणून कॉलेजात जाणारी मुलगी कशी चालेल?

In reply to by सुबोध खरे

मी त्याला शांतपणे म्हटले
तुम्ही नेहमी सगळ्या गोष्टी "शांतपणे" कशा हो सांगता ? उच्चुकता लागलीये जाणून घ्यायची :)))

In reply to by हाडक्या

बहुतेक अजुन तुम्ही डॉ.ना भेटला नाहीत...ते लशकरात होते त्यांची दंबूक नेहमीच जवळ असणार...मग समोरच्याला शांतपणे सांगितले तरी तो ऐकतो ;) (डॉ.सर...कृ.म.न.घे. = कृपया मनावर न घेणे) :)

In reply to by टवाळ कार्टा

ट का शेट ते बाकी दोन जण अजूनही लष्करात आहेत मी फक्त खाली झालो. @ हाड्क्या - एखाद्या माणसाला कोणतीही गोष्ट पटवून द्यायची असेल तर ती शान्तपणेच सांगायला लागते नाहीतर लोक तुम्हाला हलके घेतात.

In reply to by टवाळ कार्टा

मग समोरच्याला शांतपणे सांगितले तरी तो ऐकतो
ह्याबद्दल डॉक्टरीण काकूंकडून ऐकायला आवडेल .. ;)
(डॉ.सर...कृ.म.न.घे. = कृपया मनावर न घेणे)
कित्ती कित्ती तो णम्र णम्र हो टका.. (की दंबूकीला बघून आलाय काय म्हैत) :)))

In reply to by हाडक्या

हाडक्या साहेब आत्ता एवढा वेळ मी शांतपणे एका स्त्रीला समजावत होतो कि तुझ्या कपाळावर कुंकू फार दिवस राहणार नाही. तिच्या यजमानांना यकृताचा कर्करोग आहे आणि त्यासाठी ती माझ्याकडे आलेली होती. तिच्या दुर्दैवाने तो कर्करोग यकृताच्या बाहेर पसरलेला होता आणि ती आपण लिव्हरट ट्रान्सप्लांट करू वगैरे बोलत होती. लोकांनी तिला बरीच खोटी अशा दाखवलेली होती. अशा स्त्रीला वस्तुस्थिती समजावून देण्यासाठी फार शांतपणे बोलावे लागते. एक तर यजमानांची नोकरी सुटलेली वर ती स्वतः नोकरी करत नाही. एक दीर कर्करोगाने गेलेला त्याच्या साठी हिच्या यजमानांनी बराच खर्च केला होता आई ची मूत्रपिंडे खराब झालेली वडिलांना पक्षाघात झाला होता यात त्यांचा पाण्यासारखा पैसा खर्च झालेला होता. अशा परिस्थितीतहि हि स्त्री वेडी आशा मनात ठेवून नवर्याच्या लिव्हर ट्रान्सप्लांट साठी प्राथमिक गोष्टींसाठी १० लाख रुपये खर्च करायला निघाली होती. तिला तुझ्या नवर्याचा लिव्हर ट्रान्सप्लांट होणे शक्य नाही हे समजावून सांगायची पाळी माझ्या वर आली होती. तुझ्या यजमानांकडे( वय ५३ वर्षे) फार तर ६ महिने आहेत हे एखाद्या ४८ वर्षाच्या स्त्रीला समजावून सांगण्यासाठी फार शांतपणेच समजवावे लागते.

In reply to by सुबोध खरे

काका, आपली गंमत आपण फारच मनावर घेतलीत असं दिसतंय. तुमच्या प्रतिसादात जास्त रिपीट होणारा शब्द उचलून चेष्टा करत होतो, त्याचा आणि तुमच्या प्रतिसादाचा तसा काही एक संबंध नाहीये (मला उगीच गिल्ट लावण्याचा हेतू मात्र दिसतोय उगा) बाकी आपण ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्राचे ह्या गोष्टी भाग आहेत. तसेही आपापल्या क्षेत्रात अशा काहीतरी गोष्टींना तोंड द्यायलाच लागतं .. आता उद्या इथे कोणी पोलिस असेल तर तो मला काय काय बघावं लागतं आणि तुम्ही माझी चेष्टा कर्ताय असे म्हणू लागला तर अवघड?, नाही का ? चेष्टा प्रतिसादक आयडीची होती, डॉक्टरची नव्हे, तेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच चांगले काम अगदी "शांतपणे" करत असाल पण त्या क्षेत्राचे संदर्भ नको तिथे वापरु नका असे म्हणेन. मी ही इथे एक आयडी म्हणून आहे, बाहेर अगदी मी देवेंद्र फडणवीस असेन (नाहीये! आधीच सांगतो) अथवा कोणी अजून असेन, मला त्या प्रतिमेचा वापर इथे करायचा नाहीये आणि त्याचे भांडवल पण करायचे नाहीये. आपला डॉक्टर म्हणून आदर आहे पण हा मानभावीपणा पटला नाही असे खेदाने नमूद करतो.