Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367191
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

In reply to by हाडक्या

बाहेर अगदी मी देवेंद्र फडणवीस असेन (नाहीये! आधीच सांगतो)
आयला, देवेंद्र फडणवीस मिपावर आले का काय म्हणून लै भारी वाटलं होतं. पण हे कंसातलं वाचून क्ल्प्ड झाला. ;)

In reply to by हाडक्या

मी ही इथे एक आयडी म्हणून आहे, बाहेर अगदी मी देवेंद्र फडणवीस असेन (नाहीये! आधीच सांगतो)
मी पण देवेन्द्र फडणवीस नाहीये! टोलविषयी चौकश्या करु नयेत.

In reply to by आजानुकर्ण

ह्या ह्या ह्या .. हीच मिपड्यांची खासियत.. मुद्दा अल्लगद बाजूल ठेवायचा आणि उदाहरणावर काथ्या कुटायला सुरुवात करायची.. :))))

In reply to by हाडक्या

हाड्क्यासाहेब मला पण नंतर वाटले कि तो प्रतिसाद टाकायला नको होता. परंतु मिपावर स्व्सम्पादनाचा पर्याय नाही म्हणून मी शांत बसलो. नाहीतरी कोणी त्याकडे लक्ष दिलेले नाही तर खाजवून खरुज का काढा. असो आपल्याला ते लागले असेल तर मनापासून माफी.

दोन अफलातुन किस्से (सत्यघटनेवर आधारीत) एक जण (लग्न न झालेला) दुसर्‍या मित्राला सांगत होता, लग्न करताना बायको हडकुळी पाहीजे म्हणजे पहिले बाळंतपण झाले की बायकोची अंगकाठी एकदम सुंदर होते. नाहीतर सामान्यतः बायका जाड होतात बाळंतपणानंतर. या शहाण्यानेपण मित्राचे ऐकुन अशीच पाप्याचे पितर असलेली बायको केली. पहिल्या बाळंतपणानंतर बायकोची अ‍ॅनॅमिक कंडीशन झाली आणि तिला काही महिने अंथरुणावरुन उठणे पण अवघड झाले आणि नंतर तर ती अत्यंत रोगट दिसु लागली. भरपुर जिवन्सत्वे, टोनिक्स दिल्यावर परत लग्नाच्या वेळेसारखी हडकुळी झाली. आता दुसरा किस्सा गावाकडे २१ वर्षाच्या एकाने १४ वर्षाच्या मुलीशी लग्न केले. मुलगी दिसायला सुंदर मात्र दोघांच्या उंचीत ०.५/१ इंचाचाच फरक होता. लग्नानंतर १ वर्षात मुलगी नवर्‍यापेक्षा १ इंचाने उंच झाली.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आमच्या मावसभावाला एक मुलगी दाखवायला आणली होती ती त्याच्या पेक्षा दुप्पट आडवी होती. तिला वाकून नमस्कार सुद्धा करता येत नव्हता. आणि वडील म्हणाले होइलहो लग्नानंतर "बारीक". अशी उदाहरणे फार कमीच.

५००

In reply to by अजया

पूस्प्गुच हा शब्द आठवणीने लिहिल्याबद्दल तुमचाही डब्बल सत्कार. वरिजिनल पूस्प्गुच वाल्या बैंची आठवण झाली.

काथ्या कुटून कुटून एक निष्कर्श निघाला कि थवुन केलेले असो कि प्रेमविविवाह लग्न म्हणजे फक्त

अ‍ॅड्जस्ट्मेंट

अ‍ॅड्जस्ट्मेंट

अ‍ॅन्ड

अ‍ॅड्जस्ट्मेंट


मंद्या, आदुबाळ, क्लिंटन कोणतरी विश्लेषण करा रे! आणि मानाचे गणपती कोण ते सांगा जरा! बॅटमॅन, टवाळ कार्टा, हाडक्या, काळापहाड, आजानुकर्ण, डॉ. खरे यातले कोण कोण आहेत ते! एक गोष्ट लक्षात आली का भो? एक पियुषा सोडता लग्नाच्या मुलींनी आपली मतं मांडलेली दिसली नैत फारशी. कन्क्लुजन काय काढावं? ;) :-/

In reply to by पैसा

तै मला माझ्या तिकडल्या धाग्याची आठवण आली जे तिकडे टाकले आहे तेच् पेस्टू का इकडे पण.. ;) कारण विचार अजुन तरी नैत बदललेले..

In reply to by पैसा

पै तै.. बादवे, ही एक खरी गोष्ट की अनाहीता झाल्यामुळे मुलींना विरोधी मतांना तोंड न देता (तिकडे चित्र वेगळेही असेल कदाचित) या बद्दल बोलता येत असेल पण मुलांना मात्र अजूनही इथे उघड्यावरच यावे लागते. ;) जर मुलींनी पण इथे मते मांडली तर इतर लग्नाळू मुलांना कळेल ना ते कुठे चुकतायत किंवा दुसरी बाजू काय विचार करतेय.

In reply to by हाडक्या

अनाहिताचा काय संबंध नाही! स्पेशल तिथले विषय वेग़ळे असतात. मला वाटते, त्या इथे जो काय धुमशान काथ्या कुटला त्याची मजा बघतायत फांदीवर बसून! वाद घालण्यापेक्षा गप्प बसून माहिती घेणे जास्त हुषारीचे नाही का!!

In reply to by पैसा

वाद घालण्यापेक्षा गप्प बसून माहिती घेणे जास्त हुषारीचे नाही का!!
माहिती घेतायत की मज्जा घेतायत, त्यांनाच म्हैत. ;)

In reply to by हाडक्या

अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी लावते चला . आम्ही मजा नाही घेतो आहोत . दोन चार गोष्टी सगळ्यांनाच माहिती आणि मान्य आहेत हे आपण धरून चालू : १. अनाहीतांतर्फ़े च आलेल्या काही कीस्स्यांवरून आणि प्रतिसादांवरून आपण हे मान्य करू की काही गोष्टी या सरसकट मंजूर अथवा नामंजूर आहेत : उदा: मुलीच्या (किंवा मुलाच्या ) आईने प्रमाणाबाहेर दोघांच्या संसारात चब ढब करणे . प्रमाणाबाहेर हा मुद्दा प्लीज ध्यानात घ्या. मुलीकडचे जर काही युक्तीच्या चार गोष्टी सांगत असतील अननुभवी वय म्हणून तर केवळ मुलीकडचे म्हणून सल्ले झिडकारू नये. लहान मुलांना वाढवताना आपण सतत त्यांना स्पून फीडिंग करत नाही अन्यथा त्यांची निर्णयक्षमता कधीच प्रगल्भ होणार नाही , त्यांना आत्मविश्वास येणार नाही वगैरे. नवीन लग्नाला सुद्धा हा मुद्दा लागू पडतो असं माझं मत आहे आणि काही प्रमाणात पालक आणि नवरा बायको यांनी तारतम्याने हे अंतर जोपासलं पाहिजे . एकदा मुलं झाली की मग दोघांच्या राज्यात आजी आजोबांना अनन्यसाधारण महत्त्व येतं , तसं ते यावं पण. आणि तो पर्यंत चा प्रवास जर साधारण गोडीने किंवा सुज्ञ पणे झाला असेल तर बाळाच्या अंगी लागतं आणि सुनेच्या पण ! त्यामुळे मुलीची आई आणि तिची चब ढब हा एक अत्यंत व्यक्तीसापेक्ष विषय आहे. पण blanket statement ज्याला म्हणतात ते साधारण सगळ्यांना मान्य व्हायला हरकत नाही. २. मुली पैसा घर वगैरे गोष्टींना जास्त महत्त्व देतात , मुलाच्या कर्तृत्वाकडे नाही बघत वगैरे संदर्भ सुद्धा पुन्हा पुन्हा आले आहेत . धागा सुरूच झाला साधारण त्या मुद्द्यावरून . अनेकींच्या आणि अनेकांच्या प्रतिसादांवरून पण मला वाटतं आत्ता पर्यंत हे पुराव्यानिशी शाबित झालंय की ही गोष्ट सरसकटिकरण करण्याजोगी नाहीये. ३. शिक्षण , वैचारिक पातळी साधारण जुळणे हा सुद्धा मुद्दा सगळ्यांना मान्य आहे त्यामुळे अजून त्यात काय बोलायचं ? मला सगळ्यात जास्त वेधक आणि वाद - क ( :P ) मुद्दे वाटले ते म्हणजे साधारण एक सूर आहे की मुलींच्या आणि त्यांच्या आई बाबांच्या अपेक्षा वाढल्यात आणि दुसरं म्हणजे पुरुष लग्न करताना sex चा विचार करतात , "at least" पुरुष असं कुणी तरी लिहिलंय . ज्या मुली स्वतः कमी शिकलेल्या आहेत पण अपेक्षा निवडणुकीत जेमतेम पास झालेल्या शिवसेनेच्या वरताण आहेत त्यांचा आणि कुठे तरी एक किस्सा वाचला की MSCIT करून मास्टर्स केलंय सांगतात वगैरे त्याचे किस्से आपण सोडून देऊ . कारण ते वागणं मुळात च चुकीचं आहे . प्रतारणा मग ती किती ही छोटी आणि सकृतदर्शनी निरुपद्रवी (खोटे दात वाला किस्सा ) वाटली तरी प्रतारणाच . पूर्वीच्या काळी शेजारणीने केलेले अभ्रे पहिल्या मुली च्या लग्नात तिने केलेत पासून ते सातवीच्या लग्नात पण सातवीने च केलेत सांगणे या मागची मानसिकता आणि वरच्या गोष्टीं मधली मानसिकता यात फार फरक नाही . आज च्या काळात पण अशा गोष्टींवरून न्यूनगंड आणि तो लपवण्यासाठी अशी सारवासारव का असावी , असावी का नसावी हा एक वेगळा विषय होईल . अशाच प्रकारचे मुलांचे किस्से ही आहेत ते पण यावर काडीच टाकायची असेल तर सांगत बसता येईल . पण आपण एक साधारण एकमेकांना जमणारं शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी या सगळ्याचा विचार करून एकमेकांना भेटणारी मुलं मुली विचारात घेऊ . साधारण भारतातली गेल्या २-३ दशकांमधली वाढत्या वेगाने अगोदर च बदललेली म्हणजे सुधारलेली आर्थिक स्थिती किंवा बदलण्याची भरपूर शक्यता असलेली कुटुंबं बघता आर्थिकदृष्ट्या स्थिर असणं हा आज काल आटोक्याबाहेरचा प्रकार राहिलेला नाहीये . ज्या कुटुंबांची आर्थिक स्थिती आत्ता अपवादात्मक चांगली नाहीये , किंवा फार चांगली नाहीये ते सुद्धा मुलींना किंवा मुलांना शिकवतात , गरज पडली तर कर्ज काढतात पण मागच्या पिढी पेक्षा दोन पावलं पुढे जाण्याची क्षमता यावी या करता सगळ्यांचे प्रयत्न असतात च . मुद्दा हा आहे की शिक्षण आई वडिलांनी करून दिलं आहे , आई वडिलांची जबाबदारी नाहीये पण तरी सुद्धा म्हणावं तितकं स्थैर्य नाही . आत्ता जे २८-३५ वर्षांचे आहेत ते सगळे कदाचित हे मान्य करतील की आपल्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांचे निम्मे संसार केले गरज पडली तेंव्हा आणि आपला संसार सांभाळला . त्या मानाने आज च्या आमच्या पिढीवर काहीच जबाबदाऱ्या नाहीत . असं असताना आणि आज काल व्यवहार चातुर्य दाखवलं तर गाठीशी थोडा फार पैसा बाळगून असणं हे फारसं कठीण नसताना सुद्धा जर एखादा मुलगा २८-२९ व्या वर्षी पुरेसं स्थैर्य बाळगून नसेल तर तो एक प्रसाद १९७१ म्हणतात तसा "दिसणारा " भाग म्हणून दखलपात्र का असू नये ? आता पुरेसं शब्दाची व्याख्या कुणाची काय आणि कुणाची काय . पण ती व्याख्या असणार च . माझं लग्न झालं तेंव्हा नवऱ्याचा घरात पगार यायचा १८ हजार , माझी नोकरीच नव्हती कारण नुकतंच BE झालं होतं . माझं वय होतं २२ आणि नवर्याचं २४ . आता जर कुणी माझ्याच एखाद्या चुलत , मावस बहिणीला ज्या २८ वर्षांच्या आहेत त्यांना म्हणलं की १८ हजार वाल्या माणसाशी लग्न कर तर कसं चालेल ? त्या बघतात तो मुलगा किमान २९-३० , तो या वयात जर १८हजार कमवत असेल तर अवघड आहे .आता यात त्यांचं आणि माझं सारखं शिक्षण आणि त्या बघत असलेल्या मुलांचं पण तेवढं शिक्षण गृहीत धरलेलं आहे . प्रत्येकाचं वय , प्रत्येकाची लग्नाच्या वेळेची स्थिती या वरून ही व्याख्या ठरते . ते लक्षात घ्यायलाच हवं . माझा प्रेमविवाह आणि त्यांचा अरेंज याचा तसा अर्था अर्थी काही संबंध नाही . मी २८ व्या वर्षी लग्न केलं असतं याच नवऱ्याशी तर पगार अर्थात च १८ हजाराच्या किती तरी पटीने जास्त असणार होता . म्हणजे मी त्याचा पगार तेवढा मोठा होई पर्यंत लग्न केलं नाही असा ही अर्थ एखाद्याने काढला असता . आत्ता पर्यंत आलेल्या सगळ्या मुलींच्या आणि ज्यांचा प्रेमविवाह किंवा दाखवून विवाह , पण सुखी समाधानी लग्न आहे अशा प्रतिसादांमध्ये मला एक च समान सूत्र दिसतंय : आत्ता आर्थिक स्थिती २ लाख घरात आणण्याची नाहीये पण ती क्षमता निर्विवाद आहे , या न त्या निमित्ताने ते विश्वासार्ह पद्धतीने समोर आलेली आहे आणि बायकोने ती जाणते पणाने ओळखून लग्न केलेलं आहे . पगार हा फक्त एक उदाहरणार्थ घेतलेला घटक आहे . यात सगळंच येतं , मधुरा किंवा पिरा म्हणाल्या तसं शिक्षणाची पात्रता येणार आहे अथवा त्यात कमी जास्त असलं तरी अहंकार मध्ये येणार नाही याची शक्यता प्रत्येकीला मनापासून अपील झालेली आहे . आता हे अपील होण्यासाठी मुलांनी आपले अहंकार बाजूला ठेवायला हवेत आणि मुलींनी पण डोळसपणा दाखवायला हवा . असा मुलगा किंवा अशी मुलगी मिळेपर्यंत थांबायची तयारी पण हवी . आपल्या समाजात अनेकदा आपलं वैवाहिक आयुष्य कसं असायला हवं , जोडीदार कसा हवा याबद्दल वैचारिक गोन्धळ दिसतो . म्हणजे इडली डोसा करणारी बायको हवी तर मग स्वैपाकीण ठेव असं म्हणणं पण अयोग्यच आहे कारण एखाद्याला बायकोच्या हाताला चव असावी , मुलांना घरचं प्रेमाने वाढलेलं अन्न मिळावं, सहचारिणी सुगरण असावी असं वाटणं यात काही चूक नाही पण त्या साठी तिने नोकरी न केलेलीच बरी किंवा जास्त शिकलेली नको बाबा मग फार डोकं चालतं असं म्हणलं की आला वैचारिक गोंधळ . न झालेल्या मुलांच्या जेवण खाण्यासाठी आत्ता होणाऱ्या बायकोचे पंख छाटायची थोडीशी पुरुषी (:P) मानसिकता आहे ही . आणि ही बऱ्याचदा घरच्यांच्या दबावातून येते , नको ती उदाहरणं नको त्या दृष्टीकोनातून बघण्याने येते, पर्यायाने स्वतःचे असे स्वतंत्र विचार नसल्याने येते . अशांना एखादी कमी शिकलेली मुलगी सुद्धा नको म्हणत असेल तर मी तिचं समर्थन च करेल . शिक्षणाने बऱ्याच गोष्टी सोप्या होत असल्या तरी माणसाची ओळख बनते त्याच्या कामावरून . कमी शिकलेल्या पण एखादी कला हातात असलेल्या किंवा केवळ स्वैपाकाच्या जोरावर कुटुंबांना कठीण परिस्थितीतून बाहेर काढणाऱ्या स्त्रिया आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतात . कळीचा मुद्दा आहे तो लग्न झालं म्हणून जोडीदारावर किती जोर गाजवता येतो या ज्याच्या त्याच्या मताबद्दल , एखादीने आपली ओळख बनवण्याच्या शक्यतेवर च घाला घालणाऱ्या मानसिकतेबद्दल . sex या विषयाबद्दल पण तेच , नैसर्गिक गरज मुलांची आणि मुलींची वेगळी कशी ? अपेक्षा पण वेगळी कशी असणार ? आता तो अनुभव एकमेकांबरोबर घेतल्याशिवाय आणि अनेकदा घेतल्याशिवाय परस्परपूरक आहेत का हे समजणं अवघड आहे पण मुलाचं टक्कल जर एखादी साठी टर्न ऑफ असेल तर त्यांचा अनुभव सुंदर बनण्याची शक्यता किती तरी पटीने कमी होते . अशा वेळी मुलीने टकलावरून नाकारलं एव्हड्या चांगल्या मुलाला असं म्हणणं एकांगी ठरू शकतं . वैवाहिक जीवनाचा पाया जर शारीरिक नातं असेल तर त्याला कमी का लेखायचं ? मुलींच्या अशा अपेक्षा असतात आणि त्या रेटण्या इतक्या किंवा त्यावरून एखादा मुलगा नाकारण्या इतक्या आता त्या धाडसी झाल्या आहेत हे चांगलंच आहे न? घरच्यांच्या दबावाला किंवा असं कसं नाही म्हणायचं म्हणून एखादीने केलं लग्न आणि नाही ती समरस होऊ शकली तर आयुष्यभर दोघं नाखूष . त्यापेक्षा हे बर नाही का ? मुली आता बोलून दाखवतात आणि त्यांच्या अपेक्षा वाढल्यात असं म्हणण्यापेक्षा जी मुलगी अशा वातावरणात वाढून सुद्धा तुमच्याशी लग्न करायला तयार असेल ती अगदी मनापासून तयार आहे यात दिलासा नाही का वाटत ? किंबहुना तो तसा वाटण्याइतकं प्रगल्भ आता मुलांनी आणि समाजानी पण व्हायला हवं . पैसा, शिक्षण, रूप, मालकीचं घर , परदेशी प्रवास किंवा तिथेच राहणं या सगळ्यांना अत्यंत अनाठायी महत्त्व आलंय कारण अनेकांना त्यांच्या सहजीवनात काय हवंय हेच नक्की माहिती नसतं .निदान आजू बाजूच्या तथाकथित सुखी संसारांमध्ये जे काही आहे ते एकत्रितरीत्या मला मिळावं असा एक सर्वसाधारण भाव दिसतो अनेकदा . हे माहिती नसणं हा आपल्या कौटुंबिक संस्थेचं माझ्या मते अपयश किंवा मर्यादा अथवा दोन्ही आहे . जो पर्यंत हे नीट काळात नाही की जोडीदार कसा हवा आणि तो तसा का हवा आणि तो मिळेपर्यंत थांबण्याची तयारी येत नाही आणि समाज तशी परवानगी देत नाही तो पर्यंत लग्न जमून सुद्धा तो जुगार राहण्याचीच शक्यता जास्त . सगळ्यांनीच काही प्रेमविवाह करण्याची गरज नाही आणि शक्यता पण नाही . खरं सांगायचं तर दाखवून लग्न करतात त्यामुळे एक मानसिक स्थैर्य आपल्याकडे वयाच्या विशीत येतं बऱ्यापैकी. त्यामुळे अरेंज म्यारेज मोडीत काढण्याच्या मताची मी तरी नाही . पण त्या मुला मुलीना मात्र श्वास घ्यायला मिळावा आणि त्यांच्या छोट्या मोठ्या अपेक्षा बोलून दाखवल्या म्हणून त्यांना ओशाळं करू नये , त्या इच्छा आकांक्षांचा मान ठेवावा सगळ्यांनीच असं वाटतं . फार मोठा झाला प्रतिसाद :)

In reply to by आनन्दिता

खरा "हत्ती" तुम्ही शोधला आणि आम्हाला दाखवला.सुरेख विवेचन. बाकी सगळे "सोंड","पाय" "शेपूट" इथेच अडकून पडले होते.

In reply to by नाखु

विचारात पाडणारे विचार मांडले आहेत स्रुजा यांनी.

In reply to by स्रुजा

सुरेख प्रतिसाद. चला हा धागा १००० कडे नेउयात. नाहितर व्यनिमनि वरुन त्याची सोय झाली असणारच

In reply to by स्रुजा

बर्‍याच महत्वाच्या गोष्टींचा समतोल आढावा घेणारा उत्तम प्रतिसाद ! *good*

In reply to by स्रुजा

>>असं कसं नाही म्हणायचं म्हणून एखादीने केलं लग्न आणि नाही ती समरस होऊ शकली तर आयुष्यभर दोघं नाखूष . त्यापेक्षा हे बर नाही का ?
हे मात्र खरं!! काही वेळा बायका हे असलं मनात साठवून ठेवतात आणि ज्या वेळी बोलून दाखवतात त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. ऐकणार्‍याच्या मनात मात्र कायमचं उरतं ते. संतुलित प्रतिसाद हेवेसांनल !!

In reply to by पिलीयन रायडर

म्हणजे सगळ्या अनाहितांमधून फक्त एकच अनाहिता अशी संयत प्रतिसाद लिहू शकते ... तुमच्या प्रतिसादाचा असा अर्थ निघू शकतो =))

In reply to by टवाळ कार्टा

(स्रुजा) एकच (प्रतिसाद) लिहील, पण (तो) प्रतिसाद नवा धागा म्हणुन वेगळा काढावा लागेल इतका सुंदर लिहील.. समजलं का? उठलं की सुटलं तुम्हाला अनाहिताच का वो आठवतं?

In reply to by पिलीयन रायडर

उठलं की सुटलं तुम्हाला अनाहिताच का वो आठवतं?
समजा त्यांना आठवतं तर तुम्हांला का ओ दुखतं? कितीही आठवलं तरी तिकडे काय आहे ते बघता येणार नाही हे सर्वांना माहितीच्चे की. मग प्रॉब्लेम काय आहे?

In reply to by बॅटमॅन

वा वा.. कुणी सारखं अनाहिताची आठवण काढत असेल तर अनाहितांना लक्ष घालावं लागणार की नाही?!! आणि बघता येणार नाही हे मान्य आहे.. पण तसा कुणी प्रयत्न तर करत नाही ना ह्यावर चौफेर लक्ष ठेवावं लागतं बाबा...

In reply to by पिलीयन रायडर

खिक्क...नेहमी तुम्हाला"च" का लागत येव्हड...का अनाहितांच्या तुम्ही front warrior आहात :)

In reply to by टवाळ कार्टा

मी अनाहिताची कोण हा प्रश्न वेगळाच आहे.. तुमच्यासाठी "मी अनाहिता आहे" हे कारण पुरेसं आहे.. नाही का?!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्याट्याच्या इडिपसचं जहाज कुठे अडकलंय कई म्हैत. जरा धका द्या की राव.

In reply to by टवाळ कार्टा

नाय पण तुम्हाला अनाहिताची सारखी एवढी आठवण का येते ह्याच उत्तर राहिलच्चे बर का.. ;) नाय म्हन्जे कळात नाहीये आम्हाला असं नाही... पण.. असोच..!!

In reply to by सूड

म्हणून म्हणतो पिच्चर न बघता इतिहास वाचत चला ओ. झ्यूस हा तिथला इंद्र. त्याने जितकी मजा केली (बादवे संस्कृतात केलि म्हणजे 'मज्जा' बरं का ;) ) त्याच्या सहस्रांशही या बिचार्‍या झर्क्सिसने केलेली नाही. त्या बिनडोक पिच्चरमध्ये इतिहासाचा इतका विपर्यास केलाय की ज्याचे नाव ते.

In reply to by बॅटमॅन

म्हणून म्हणतो पिच्चर न बघता इतिहास वाचत चला ओ. झ्यूस हा तिथला इंद्र. त्याने जितकी मजा केली (बादवे संस्कृतात केलि म्हणजे 'मज्जा' बरं का ) त्याच्या सहस्रांशही या बिचार्‍या झर्क्सिसने केलेली नाही. त्या बिनडोक पिच्चरमध्ये इतिहासाचा इतका विपर्यास केलाय की ज्याचे नाव ते.
सांगितलंस ते ठीकाय. पण मी लिहीलं त्यात इतिहासाचा फारसा संबंध नव्हता. पिच्चरमध्ये दाखवलेल्या झर्क्सिससारखी आपली physique असावी अशी माझी फारा दिवसांपासूनची इच्छा आहे, म्हणून झर्क्सिस म्हटलं!! ;)

In reply to by बॅटमॅन

>>आयला. असो. पण तरी फिजिक चांगलंच आहे म्हणा त्याचं. बाकी गोष्टी विचित्र वाटत असल्या तरी.
बाकीच्या गोष्टी मरोत. तसं फिजिक ठेवणं खायची गोष्ट नाही बाप्पा!! खाणं आणि वर्कआऊट जऽऽरा गंडला की संपलं!

In reply to by सूड

पिअर्सिंगचं बघू! हल्लीच एक नविन पिअर्सिंगचा प्रकार कळला आहे ! हे पिअर्सिंग फक्त पाखरंच करुन घेतात ! काय एक एक उध्योग !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर